अंग दुखणे, अंग जड पडणे डोकं दुखणे, पायांना गोळे येणे, थोडसं जास्त काम झालं की थकवा येणे हा त्रास बहुतांश महिलांना जाणवतो. पण त्या त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. सगळ्या घराची काळजी घेताना स्वतःच्या आहाराकडे मात्र त्यांचं अजिबात लक्ष नसतं. त्यामुळे मग शरीरात वेगवेगळ्या घटकांची कमतरता निर्माण होते. त्यातूनच मग अंगदुखी, पाय दुखणे, हातापायांना मुंग्या येणे असा त्रास सुरू होतो. आता सणासुदीचे दिवस येत आहेत. तुम्हाला होत असणारा हा त्रास पळवून लावायचा असेल तर डॉक्टरांनी दिलेला हा उपाय एकदा बघा.. (are you suffering from Body pain, muscle cramps, numbness?)
अंग दुखतं, हात- पाय आखडून जातात?
बहुतांश महिलांना हा त्रास होतो. यामागचं कारण काय आणि त्यावर काय उपाय करावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी drsaleem4u या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
गौरी-गणपतीसाठी वस्त्रमाळा करायच्या? बघा नव्या प्रकारचे सुंदर डिझाईन्स, पारंपरिकतेला नाविन्याची झालर
यामध्ये ते असं सांगत आहेत की जर तुमचं अंग नेहमीच दुखत असेल, ठणकत असेल तर तुमच्या शरीरात पोटॅशियमची कमतरता आहे. ती दूर करण्यासाठी तुम्ही एखादं केळ नियमितपणे खायला पाहिजे.
हातापायांत गोळे येत असतील, हात- पाय आखडून गेल्यासारखे होत असतील तर तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता आहे. ती भरून काढण्यासाठी पालक नियमितपणे खा.
जर तुम्हाला वारंवार बर्फ खावा वाटत असेल तर तुमच्या शरीरात लोह कमी प्रमाणात आहे. लोहाचं प्रमाण वाढविण्यासाठी हिरव्या पालेभाज्या आठवड्यातून ३ ते ४ वेळेस तरी खाव्या.
कुंडीतल्या रोपांना द्या ५ प्रकारचे 'जादुई' पाणी; रोपं बहरून जातील- फुलंही भरपूर येतील
जर तुमच्या हातापायांना नेहमीच थोड्या मुंग्या आल्यासारखं होत असेल, तर तुमच्या शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता आहे. त्यासाठी बदाम, पनीर, दूध, दही हे पदार्थ आहारात नियमितपणे घ्या.