Lokmat Sakhi >Health > ऐन तारुण्यात हाडं कडकड वाजतात? कॅल्शियम शरीराला आवश्यक? हाडांची झीज होऊ नये म्हणून...

ऐन तारुण्यात हाडं कडकड वाजतात? कॅल्शियम शरीराला आवश्यक? हाडांची झीज होऊ नये म्हणून...

Bone health: Tips to keep your bones healthy after 30s : तिशीनंतर ५ गोष्टी आवश्यक करा; नाहीतर तारुण्यातच हाडं पोकळ होतील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2024 01:01 PM2024-05-20T13:01:32+5:302024-05-21T09:53:36+5:30

Bone health: Tips to keep your bones healthy after 30s : तिशीनंतर ५ गोष्टी आवश्यक करा; नाहीतर तारुण्यातच हाडं पोकळ होतील..

Bone health: Tips to keep your bones healthy after 30s | ऐन तारुण्यात हाडं कडकड वाजतात? कॅल्शियम शरीराला आवश्यक? हाडांची झीज होऊ नये म्हणून...

ऐन तारुण्यात हाडं कडकड वाजतात? कॅल्शियम शरीराला आवश्यक? हाडांची झीज होऊ नये म्हणून...

वय वाढत गेलं, आजारपण शरीरात घर तयार करतात (Health Tips). अनुवंशिकता, दीर्घकालीन आजार, औषधोपचारांमुळे हाडांची दुखणी वाढतात. हाडांसाठी कॅल्शियम गरजेचं (Calcium). कॅल्शियम आणि इतर पौष्टीक घटकांच्या कमतरतेमुळे, हाडांची झीज होणे किंवा गुडघेदुखी होणे अशा अनेक समस्या निर्माण होतात (Bones Health). मुख्य म्हणजे तिशीनंतर ही समस्या अधिक त्रासदायक ठरते. एक विशिष्ट वयानंतर गुडघेदुखी, सांधेदुखी इत्यादी समस्या उद्भवू लागतात.

तज्ज्ञांच्या मते, तिशीपर्यंत आपल्या शरीरात हाडांची वाढ होते. मात्र, त्यानंतर ही प्रक्रिया थांबते. त्यामुळे हाडांची विशेष काळजी घ्यायला हवी. अशावेळी तिशीनंतर हाडांची नेमकी कशी काळजी घ्यावी?  तिशीनंतर हाडं मजबूत ठेवण्यासाठी काय करावे? पाहूयात(Bone health: Tips to keep your bones healthy after 30s).

तिशीनंतर हाडं कशी मजबूत ठेवावी?

कॅल्शियम किती गरजेचं

द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शियम सर्वात महत्वाचे आहे. प्रत्येकाची गरज वय आणि लिंगानुसार वेगळी असते. पुरुषांपेक्षा महिलांना कॅल्शियमची जास्त गरज असते. पन्नाशीपर्यंत महिलांनी सुमारे १००० मिलीग्राम कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करावे.

आईबाबा, आपले मूल वाया जाऊ नये अशी भीती वाटते? घरात वेळीच करा ५ गोष्टी..

तर सत्तरीपर्यंत, पुरुषांनी १०००  मिलीग्राम कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करायला हवे. यासोबतच जर एखाद्या महिलेचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त असेल आणि पुरुषाचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त असेल तर, त्यांनी दररोज सुमारे १२०० मिलीग्राम कॅल्शियमचा आहारात समावेश करावा.

व्हिटॅमिन डी गरजेचं

व्हिटॅमिन डी हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असते. हाडे तयार करण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले हे एक महत्वाचे खनिज आहे. व्हिटॅमिन डी हाडं तयार करणाऱ्या पेशींची क्रिया वाढवते, म्हणजे ऑस्टिओब्लास्ट्स, ज्यामुळे नवीन हाडांची निर्मिती होते. त्यामुळे व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थांचा आहारात नक्कीच समावेश करा.

व्यायाम करा

नियमित व्यायाम करणाऱ्यांची हाडे व्यायाम न करणाऱ्यांपेक्षा मजबूत असतात. त्यामुळे रोजच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश करावा. चालणे, धावणे, वजन उचलणे इत्यादीद्वारे हाडांना मजबुती मिळू शकते.

रोज चहा पिण्याची सवय घातक? त्यात घाला चिमुटभर 'ही' पांढरी गोष्ट; आरोग्य सुधारेल..

प्रोटीनयुक्त आहार खा

प्रोटीनयुक्त आहारामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. मुख्य म्हणजे प्रोटीनमुळे हाडांना मजबुती मिळते. त्यामुळे रोजच्या आहारात प्रथिनांचा समावेश करावा. कडधान्ये, चीज, सोयाबीन, डाळी इत्यादी पदार्थांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. 

Web Title: Bone health: Tips to keep your bones healthy after 30s

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.