खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमध्ये झालेला बदल यामुळे जगभरातच मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर हृदयरोग आणि कोलेस्टराॅल हे देखील कमी वयातच गाठू लागले आहेत. एकतर हा आजार होऊ द्यायचाच नसेल आणि आजार मागे लागला तरी तो नियंत्रणात ठेवायचा असेल, तर त्यासाठी कांद्याचा रस उपयुक्त ठरतो, अशी माहिती काही अभ्यासकांनी दिली आहे. या अभ्यासावर काही तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या प्रतिक्रियाही नोंदविल्या आहेत (How to control diabetes and cholesterol).
सैन डिएग्रो येथील एण्डोक्राईन सोसायटीतर्फे हा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये नायझेरिया येथील डेल्टा स्टेट युनव्हर्सिटीचे प्रमुख लेखक एंथनी ओजिह यांनी सांगितलं की कांद्यामध्ये डायबिटीस आणि कोलेस्टरॉल नियंत्रणात ठेवणारे अनेक घटक आहेत.
करवा चौथनिमित्त मौनी रॉयने काढलेल्या मेहंदीचे फोटो झाले जबरदस्त व्हायरल, बघा कसं होतं खास डिझाईन
याचा प्रयोग आधी उंदरांवर करण्यात आला. यामध्ये काही डायबेटिक उंदरांना त्यांच्या वजनानुसार कांद्याच्या रसाचा डोस देण्यात आला. यात असं आढळून आलं की उंदरांची शुगर लेव्हल ५० ते ३५ टक्क्यांपर्यंत कमी झाली होती. काही नॉन डायबेटिक उंदरांनाही हा डोस देण्यात आला आणि त्यातून त्यांचे कोलेस्टरॉल नियंत्रणात राहत आहे, असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला.
या अभ्यासाविषयी दिल्ली फोर्टिस सीडीओसी सेंटरचे तज्ज्ञ डॉ. अनुप मिश्रा यांनी इंडियन एक्स्प्रेस यांच्याकडे प्रतिक्रिया व्यक्त केली.
मी गरोदर आहे आजारी नाही, असं आलिया भटसारखंच आजकाल तरुण मुलींना वाटतं कारण..
त्यावेळी ते म्हणाले की भारतात सर्वात जास्त कांदा खाल्ला जातो. जवळपास प्रत्येक स्वयंपाक घरातला हा एक महत्त्वाचा घटक आहे. पण तरीही असे असूनही भारतात मधुमेहाचे खूप जास्त रुग्ण आहेत. अशा कोणत्याही एका अभ्यासावर अवलंबून न राहता, त्यावर आणखी संशोधन करण्याची गरज असल्याचे, त्यांनी नमूद केले.