Lokmat Sakhi >Health > रात्रीचे जेवण बंद केल्यानं खरंच वेटलॉस होतो? जेवण बंद करुनही वजन वाढले तर?

रात्रीचे जेवण बंद केल्यानं खरंच वेटलॉस होतो? जेवण बंद करुनही वजन वाढले तर?

Can Skipping Dinner Help You Lose Weight? रात्री जेवायचंच नाही म्हणजे वजन लवकर कमी होते असा अनेकांचा समज असतो, ते किती खरे की खाेटेच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2023 02:06 PM2023-07-27T14:06:18+5:302023-07-27T14:07:01+5:30

Can Skipping Dinner Help You Lose Weight? रात्री जेवायचंच नाही म्हणजे वजन लवकर कमी होते असा अनेकांचा समज असतो, ते किती खरे की खाेटेच?

Can Skipping Dinner Help You Lose Weight? | रात्रीचे जेवण बंद केल्यानं खरंच वेटलॉस होतो? जेवण बंद करुनही वजन वाढले तर?

रात्रीचे जेवण बंद केल्यानं खरंच वेटलॉस होतो? जेवण बंद करुनही वजन वाढले तर?

'अगं खूप लठ्ठ दिसतेस, भात खाणं सोड', 'वेट लॉस करायचं तर, रात्रीचं जेवण करूच नको', असे सल्ले आपल्याला अनेकांकडून मिळाले असतील. आजकाल वजन कमी करणं हे जणू टास्क झाले आहे. वेट लॉस करण्यासाठी लोकं विविध उपाय करून पाहतात. काही लोकं जिममध्ये जाऊन तासंतास घाम गाळतात, तर काही योगभ्यास आणि डाएट फॉलो करून वजन कमी करतात. वजन कमी करण्यासाठी लोकं रात्रीचं जेवण स्किप करतात. पण रात्रीचं जेवण स्किप केल्याने खरंच वजन कमी होते का?(Can Skipping Dinner Help You Lose Weight?).

यासंदर्भात, आहारतज्ज्ञ कामिनी कुमारी सांगतात, ''डिनर आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे निरोगी राहण्यासाठी ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण गरजेचं आहे, त्याच प्रमाणे डिनर देखील करायला हवे. परंतु, डिनर हे ब्रेकफास्ट आणि लंचपेक्षा हलके असावे. ज्यामध्ये प्रोटीन आणि कॅलरीचे प्रमाण कमी असावे. या करणामुळे अन्न लवकर पचते.'' परंतु, डिनर केव्हा करावे? डिनरमध्ये काय खावे काय टाळावे? हे माहित असणं गरजेचं आहे.

दही-कांदा एकत्र खावा का? दह्यात कांदा घालून खाल्ला तर पचन बिघडतं की सुधारतं?

रात्रीचे जेवण स्किप केल्याने वजन कमी होते?

आहारतज्ज्ञ कामिनी यांच्या मते, ''वजन कमी करण्याच्या नादात लोकं रात्रीचं जेवण स्किप करतात. अधिकवेळ उपाशी राहिल्याने शरीरात अशक्तपणा येतो. त्यामुळे डिनर स्किप करू नका. शरीरात उर्जा टिकवून ठेवण्यासाठी जेवण वगळण्याऐवजी हलके पदार्थ खा, जे सहज लवकर पचतील.''

रात्रीच्या जेवणात काय खावे?

- रात्रीच्या जेवणात आपण दलियाचा समावेश करू शकता. यात फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे आपले पोट अधिक काळ भरलेले राहील.

- याशिवाय आपण डिनरमध्ये मसूर डाळीची भाजी आणि भात खाऊ शकता. जर आपली रात्रीची भूक कमी असेल तर, आपण मसूर डाळीचे सूप देखील पिऊ शकता.

काम करत असताना सुस्ती - झोप येते? खा ४ हेल्दी - टेस्टी पदार्थ, वाढेल वर्क प्रॉडक्टिव्हिटी

- जर आपल्याला जास्त भूक नसेल तर, रात्री आपण वेजिटेबल सूप पिऊ शकता. यामुळे शरीराला पोषण मिळेल, व अशक्तपणा देखील जाणवणार नाही.

- तसेच रात्री जास्त मीठ खाऊ नये, मिठात सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन वाढू शकते.

रात्री जेवण कधी करावे?

रात्री झोपण्यापूर्वी ३ ते ४ तास आधी जेवण करावे. कारण आपली रात्रीची हालचाल कमी असते. त्यामुळे झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण केल्याने, अन्न व्यवस्थित पचते.

रात्री जेवण स्किप करण्याचे तोटे

- अचानक भूक लागल्याने मध्येच जाग येणे, झोप मोड होणे.

- शरीरात पोषक तत्वांचा अभाव.

- चयापचय बिघडणे.

- सकाळी जास्त खाणे.

- अशक्तपणा जाणवणे.

- उर्जा कमी होणे.

- सकाळी व्यायाम करताना त्रास.

Web Title: Can Skipping Dinner Help You Lose Weight?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.