Lokmat Sakhi >Health > सेक्सनंतर लगेच लघवीला गेल्यास प्रेंग्नसी टळते? स्पर्म आणि सिमेन यात काय फरक-तज्ज्ञ सांगतात...

सेक्सनंतर लगेच लघवीला गेल्यास प्रेंग्नसी टळते? स्पर्म आणि सिमेन यात काय फरक-तज्ज्ञ सांगतात...

Does Peeing After Sex Prevent Pregnancy : सेक्शुअल कॉन्टॅक्ट नंतर लघवी केल्याने नको असलेली गर्भधारणा टळते. या समजामुळे बऱ्याच महिला सेक्सनंतर लघवीला जातात. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंजना सिंह सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 12:22 PM2023-11-01T12:22:51+5:302023-11-01T12:45:33+5:30

Does Peeing After Sex Prevent Pregnancy : सेक्शुअल कॉन्टॅक्ट नंतर लघवी केल्याने नको असलेली गर्भधारणा टळते. या समजामुळे बऱ्याच महिला सेक्सनंतर लघवीला जातात. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंजना सिंह सांगतात...

Can urinating immediately after sex prevent pregnancy doctor says expert openion | सेक्सनंतर लगेच लघवीला गेल्यास प्रेंग्नसी टळते? स्पर्म आणि सिमेन यात काय फरक-तज्ज्ञ सांगतात...

सेक्सनंतर लगेच लघवीला गेल्यास प्रेंग्नसी टळते? स्पर्म आणि सिमेन यात काय फरक-तज्ज्ञ सांगतात...

सेक्शुअल एक्टिव्हीजनंतर लघवीला जाण्याबाबत अनेक प्रकारे समज-गैरसमज लोकांच्या मनात आहेत.  अनेकांचा असा समज आहे यामुळे लैंगिक आजारांपासून बचाव होतो तर काहीजणांचे म्हणणे असते की यामुळे काहीच फायदा होत नाही. (Will peeing after sex kill the sperm) पुरूषांच्या तुलनेत महिला संबंधांनंतर लघवीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे.  सेक्शुअल कॉन्टॅक्ट नंतर लघवी केल्याने नको असलेली गर्भधारणा टळते, या समजामुळे बऱ्याच महिला लघवीला जातात.  स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंजना सिंह यांनी एका  वेब पोर्टलशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Can peeing immediately after sex prevent pregnancy) 

सेक्शुअल इंटरकोर्सनंतर लघवी करायलाच हवी का? (Is Peeing After Sex Really Necessary)

डॉक्टर सांगतात, सेक्सनंतर लघवी करायला हवी असं काही नाही. तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर लघवीला जा किंवा जाऊ नका. पुरूषांना यामुळे खास फायदा होत नसला तरी महिलांसाठी हे अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरते. सेक्शुअल एक्टिव्हिटीज दरम्यान अनेक बॅक्टेरिया युरिनरी ट्रॅक्ट आणि युरेथ्राच्या माध्यमातून ब्लॅडररपर्यंत पोहोचतात.  जे युटीआय इन्फेक्शनचं कारण ठरू शकतात.  लघवी केल्यानं युरिनर ट्रॅक्ट स्वच्छ होतो आणि युटीआयचा धोका टाळता येतो.

 

प्रोटीन्स, व्हिटामीन्सनी खच्चून भरलेत १० वेगन पदार्थ; रस्त्यावर मिळेल २० रूपयांना वाटा-रोज खा

सेक्सनंतर लघवीला गेलं की गर्भधारणा टळते का?  (Can Peeing After Sex Reduce Your Chances of Getting Pregnant)

सेक्सनंतर लघवी केल्याने प्रेग्नंसी रोखण्यास कोणतीही मदत होत नाही. तज्ज्ञांच्यामते पुरूषांच्या  लिंगाच्या एका इजॅक्युलेशनमध्ये  ४-५ मिली वीर्य निघते.  यातील वीर्याचा काही भाग सेक्शुअल एक्टिव्हिटीनंतर व्हजायनाच्या बाहेर येतो तर काही भाग आत राहतो. आत गेलेला भाग पुन्हा बाहेर येत नाही त्यामुळे गर्भधारणा होणार असेल तर ते टाळता येत नाही.

वीर्य आणि शुक्राणू यांत फरक काय? (Difference Between Semen and Sperm)

वीर्य (सिमेन)आणि शुक्राणू (स्पर्म्स) यातील फरक समजून घ्यायला हवा. वीर्य पांढरा घट्ट पदार्थ असतो जो सेक्शुअल एक्टिव्हिजीनंतर लिंगाच्या बाहेर निघतो. शुक्राणू त्यातीलच एक भाग आहे. प्रेग्नंसीसाठी शुकाणूंसह वीर्य जबाबदार असते. शुक्राणू व्हजायनाच्या भितींना चिकटतात. यामुळे लघवी करताना सिमेनचा काही भाग बाहेर येतो. पण स्पर्म बाहेर येतीलच असं नाही. म्हणूनच सेक्सनंतर लघवी करणं हा गर्भनिरोधकासाठी योग्य  पद्धत नाही.

लघवीला गेल्यानं आजार टळतात का? (Peeing after sex STI prevention)

ही पद्धत सेक्शुअल एक्टिव्हिजीमधून होणाऱ्या आजारांना रोखत नाही.  यातून व्हायरस पसरू शकतात. लघवी केल्याने ट्रान्सफर झालेले व्हायरस बाहेर निघत नाहीत. त्यामुळे असुरक्षित यौन संबंधानंतर लघवी केल्याने सेक्शुअली प्रसार होणाऱ्या आजारांचा धोका टळतो असं म्हणता येत नाही.

STD पासून बचावासाठी कंडोम हा उत्तम पर्याय आहे. सेक्सनंतर महिलांना लघवी केल्यानंतर व्हजायलन एरियाची व्यवस्थित स्वच्छता करावी. ज्या महिलांमध्ये युटीआयचा धोका जास्त असतो त्यांच्यासाठी  हा उपाय फायदेशीर ठरू शकतो. 

Web Title: Can urinating immediately after sex prevent pregnancy doctor says expert openion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.