Lokmat Sakhi >Health > डायबिटीस असेल तर आंबा खावा का? ब्लड शुगर वाढेल म्हणून खाणं टाळत असाल तर, तज्ज्ञ काय सांगतात पाहा..

डायबिटीस असेल तर आंबा खावा का? ब्लड शुगर वाढेल म्हणून खाणं टाळत असाल तर, तज्ज्ञ काय सांगतात पाहा..

Can you eat mangoes if you have diabetes : मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला, आंबे खा पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2024 02:31 PM2024-04-26T14:31:13+5:302024-04-26T14:32:13+5:30

Can you eat mangoes if you have diabetes : मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला, आंबे खा पण..

Can you eat mangoes if you have diabetes? | डायबिटीस असेल तर आंबा खावा का? ब्लड शुगर वाढेल म्हणून खाणं टाळत असाल तर, तज्ज्ञ काय सांगतात पाहा..

डायबिटीस असेल तर आंबा खावा का? ब्लड शुगर वाढेल म्हणून खाणं टाळत असाल तर, तज्ज्ञ काय सांगतात पाहा..

उन्हाळा सुरु होताच, सर्वांना रसाळ आंब्याचे वेध लागते. गोडसर, केशरी आंबा खाताच, जीवाला गारवा मिळतो. हापूस ते दशहरीपर्यंत भारतात १,५०० हून अधिक प्रजातींचे आंबे आढळतात (Mango Season). आंब्याच्या प्रत्येक जातीला एक अनोखी चव असते. उगाच आंब्याला फळांचा राजा म्हणत नाहीत (Diabetes). पण याच फळांच्या राजाचा आस्वाद प्रत्येक जण घेऊ शकेलच असे नाही.

बरेच मधुमेहग्रस्त लोक आंबा खाण्यापासून वंचित राहतात (Health Care). इच्छा असूनही खाणं टाळतात. पण खरंच मधुमेहग्रस्त रुग्णांनी आंबा खाऊ नये का? रक्तातील साखरेची पातळी वाढू नये म्हणून मधुमेहग्रस्त लोक मिठाई, कोल्ड्रिंक्स, केक, पेस्ट्री आणि काही फळं खाणं टाळतात. पण त्या फळांमध्ये आंब्याचा समावेश करावा का? याबाबत अनेक लोकांमध्ये संभ्रम आहे(Can you eat mangoes if you have diabetes?).

२ बटाटे-कपभर रवा, चमचाभर तेलामध्ये करा बटाट्याचे अप्पे; १० मिनिटात क्रिस्पी नाश्ता रेडी

यासंदर्भात, जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ सुषमा पीएस सांगतात, 'आंब्याचा आहारात समावेश करताना, मधुमेही रुग्णांनी कितीप्रमाणात आंबा खावा हे पाहावे. साधारण अर्धा ते एक कप चिरलेला आंबा खाण्यास हरकत नाही. परंतु त्यासोबत रक्तातील साखरेची पातळी देखील तपासा, जेणेकरून आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो हे कळून येईल. आंबा जेव्हा प्रोटीन किंवा गुड फॅट्ससोबत खाल्ले तर उत्तम. यामुळे साखरेचे शोषण कमी होऊन, रक्तातील साखर वाढण्यास प्रतिबंध करते.

अरंरं लईच खतरनाक! गुटखा आईक्रीम- हा काय नवीन प्रकार? पठ्ठ्याने आईस्क्रीममध्ये घातलं गुटखा आणि..

तर, फरीदाबादस्थित एशियन हॉस्पिटलचे हेड डायटीशियन, कोमल मलिक सांगतात, 'आंब्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आणि फॅटचे प्रमाण कमी असते. शिवाय आंबा हृदायाच्या समस्यांसोबतच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासूनही बचाव करते. जर आपण योग्य प्रमाणात आंबे खाल्ले तर, त्यात आढळणाऱ्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारेल. परंतु, मधुमेहग्रस्त रुग्णांनी आंबा कमी प्रमाणात खावा.

याबाबत आहारतज्ज्ञ ज्योती गुप्ता सांगतात, 'आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ५१ आहे. त्यामुळे मर्यादित प्रमाणात लोक आंबे खाऊ शकतात. फळांचा गोडवा त्यातील फ्रक्टोजमुळे असतो, आणि फ्रक्टोजमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. आंब्यात अनेक पौष्टीक गुणधर्म आढळतात. त्यात कार्ब्स, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, के, बी६, बी१२ आणि इतर अनेक पोषक तत्वे असतात. त्यामुळे मधुमेहग्रस्त रुग्ण आंबे खाऊ शकतात. पण मर्यादित प्रमाणात खायला हवे. पण बटाटे, इतर धान्य, फ्राईड पदार्थ, यासह हाय कार्ब्सयुक्त पदार्थांसोबत शक्यतो आंबा खाणं टाळावे.

Web Title: Can you eat mangoes if you have diabetes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.