Lokmat Sakhi >Health >  गर्भाशय मुखाचा कॅन्सर : आजार अंगावर काढत, लक्षणं लपवू नका, अनेकजणी हीच चूक करतात आणि..

 गर्भाशय मुखाचा कॅन्सर : आजार अंगावर काढत, लक्षणं लपवू नका, अनेकजणी हीच चूक करतात आणि..

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर टाळता येण्याजोगा असतो. एचपीव्ही इन्फेक्शन होऊ नये म्हणून आवश्यक लस घेणं हा ही प्रतिबंधात्मक उपाय. वेळच्यावेळी स्क्रीनिंग करण्यातून या कॅन्सरबाबतीतलं निदान लवकर करता येणं व लवकर बरं होणं शक्य असतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 07:29 PM2021-05-21T19:29:04+5:302021-05-22T12:55:15+5:30

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर टाळता येण्याजोगा असतो. एचपीव्ही इन्फेक्शन होऊ नये म्हणून आवश्यक लस घेणं हा ही प्रतिबंधात्मक उपाय. वेळच्यावेळी स्क्रीनिंग करण्यातून या कॅन्सरबाबतीतलं निदान लवकर करता येणं व लवकर बरं होणं शक्य असतं.

Cervical Cancer: - Although the disease is difficult, treatments are also effective narikaa! |  गर्भाशय मुखाचा कॅन्सर : आजार अंगावर काढत, लक्षणं लपवू नका, अनेकजणी हीच चूक करतात आणि..

 गर्भाशय मुखाचा कॅन्सर : आजार अंगावर काढत, लक्षणं लपवू नका, अनेकजणी हीच चूक करतात आणि..

Highlights गर्भाशयाच्या मुखाभागात होणार्‍या कॅन्सरचं वेळेत निदान झालं व त्याप्रमाणं उपचार सुरू झाले की तो आटोक्यात येतो, बरा होतो . एचपीव्ही म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस मुळात लैंगिक संबंधातून झालेल्या इन्फेक्शनमधून हा आजार शरीरात पसरतो.एचपीव्ही व्हायरसचे काही उपप्रकार आहेत. त्यातले विशिष्ट उपप्रकार हे गर्भाशयाच्या मुखाला होणार्‍या कॅन्सरशी संबंधित आहेत.

गर्भाशयाच्या मुखाभागात होणार्‍या कॅन्सरचं वेळेत निदान झालं व त्याप्रमाणं उपचार सुरू झाले की तो आटोक्यात येतो, बरा होतो . हा कॅन्सर आपल्या शरीरात होऊ घातला असेल तर सर्वसाधारणपणे खालील लक्षणं असतात :

- वेळीअवेळी व अनैसर्गिक रक्तस्राव होणं हे पहिलं लक्षण. हा रक्तस्राव पुढची पाळी सुरू व्हायच्या मध्यावर, रजोनिवृत्तीनंतर अथवा संभोगादरम्यान असा केव्हाही होतो.
- योनीतून होणारा डिस्चार्ज नेहमीपेक्षा जास्त होतो, त्याचा वास जाणवतो, स्वरूपही निराळं असतं.

हा आजार कसा होतो? 

एचपीव्ही म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस मुळात लैंगिक संबंधातून झालेल्या इन्फेक्शनमधून शरीरात पसरतो. गर्भाशयाच्या मुखाचा, व्हजायना/वल्वा, गुद्द्वाराचा, पुरूषलिंगाचा व घशाचा कॅन्सर बरेचदा याच व्हायरसमधून झालेल्या इन्फेक्शनमधून होतो.

एचपीव्ही व्हायरसचे काही उपप्रकार आहेत. त्यातले विशिष्ट उपप्रकार हे गर्भाशयाच्या मुखाला होणार्‍या कॅन्सरशी संबंधित आहेत. बाकीच्या घटकांनी होणारे कॅन्सर थोडे सौम्य प्रकारातले आहेत. एचपीव्ही 16, एचपीव्ही 18 या उपप्रकारांमुळे गर्भाशयाच्या मुखाला कॅन्सर जडतो. अर्थात कॅन्सरला कारण ठरणार्‍या या स्ट्रेनचं अस्तित्व सापडलं म्हणून संबंधित स्त्रीला गर्भाशयाचा कॅन्सर होणार असं सरसकटीकरण करता येणार नाही. माणसाची प्रतिकारशक्ती या स्ट्रेनवर आपलं काम सुरू करते व दोनेक वर्षात त्याच्या लक्षणांचा नायनाट करते असंही घडतं.

आजार ओळखण्याच्या पध्दती
गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ओळखण्याच्या स्क्रीनिंग पद्धती खालीलप्रमाणे 
1. पॅप स्मिअर
2. एचपीव्ही डीएनए टेस्टिंग
3. गर्भाशयाच्या मुखाचे व्हिज्युअल इन्स्पेक्शन
कॉल्पोस्कोपी : कॉल्पोस्कोप या साधनाने गर्भाशयाच्या बाधित भागाची बारकाईनं तपासणी करून गर्भाशयाचा  असामान्य भाग रेखून ठेवला जातो. त्यातील विशिष्ट भागाचा पापुद्रा बायोप्सीसाठी निवडला जातो.

उपचार
जिवावर बेतणारा आजार म्हणून कॅन्सरकडे पाहिलं जायचं ते दिवस आता इतिहासजमा झालेले आहेत. कॅन्सरच्या काही स्थितींबाबतीत तर उपचाराचे फारच चांगले पर्याय आता उपलब्ध आहेत. 

 - सर्जरी : गर्भाशय, गर्भाशयाचं मुख, बिजवाहक नलिका, ओव्हरीज आणि निंफ नोड्स असे संबंधित कॅन्सरबाधित भाग सर्जरीने समूळ काढून टाकले जातात.

- रेडिएशन थेरपी : उच्च दाबाचे व ऊर्जेचे क्ष किरण वापरून कॅन्सर सेल्स जाळल्या जातात, नष्ट केल्या जातात.

-किमोथेरपी : शरीरात असणार्‍या कॅन्सरच्या पेशी विशिष्ट प्रक्रियेतून औषधं देऊन मारल्या जातात.
गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर टाळता येण्याजोगा असतो. एचपीव्ही इन्फेक्शन होऊ नये म्हणून आवश्यक लस घेणं हा ही प्रतिबंधात्मक उपाय. वेळच्यावेळी स्क्रीनिंग करण्यातून या कॅन्सरबाबतीतलं निदान लवकर करता येणं व लवकर बरं होणं शक्य असतं.
 

Web Title: Cervical Cancer: - Although the disease is difficult, treatments are also effective narikaa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.