Lokmat Sakhi >Health > ९ ते १४ वयोगटातील मुलींना कर्करोग प्रतिबंधात्मक लस देण्याचा शासनाचा निर्णय, कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी लस का महत्त्वाची?

९ ते १४ वयोगटातील मुलींना कर्करोग प्रतिबंधात्मक लस देण्याचा शासनाचा निर्णय, कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी लस का महत्त्वाची?

Cervical Cancer Vaccine HPV : ९ ते १४ वयोगटातील मुलींना कर्करोग प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत केली. ती लस काय फायद्याची, याविषयी तज्ज्ञांचे विश्लेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2023 05:19 PM2023-03-16T17:19:11+5:302023-03-16T17:54:31+5:30

Cervical Cancer Vaccine HPV : ९ ते १४ वयोगटातील मुलींना कर्करोग प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत केली. ती लस काय फायद्याची, याविषयी तज्ज्ञांचे विश्लेषण

Cervical Cancer Vaccine HPV :Government's decision to give cancer preventive vaccine to girls aged 9 to 14, why is vaccine important to prevent the risk of cancer? | ९ ते १४ वयोगटातील मुलींना कर्करोग प्रतिबंधात्मक लस देण्याचा शासनाचा निर्णय, कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी लस का महत्त्वाची?

९ ते १४ वयोगटातील मुलींना कर्करोग प्रतिबंधात्मक लस देण्याचा शासनाचा निर्णय, कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी लस का महत्त्वाची?

९ ते १४ वयोगटातील मुलींना कर्करोग प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत केली. कर्करोग रुग्ण तपासणीसाठी राज्यात चतु:सूत्री कार्यक्रम आखण्यात आला आहे. सर्व्हायकल कॅन्सरवर प्रभावी असणारी भारतीय बनावटीची लस सिरम इन्स्टीट्यूनने तयार केली असून ती लवकरच सामान्यांना उपलब्ध होणार आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानच्या माध्यमातून महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यात ६२ हजारहून अधिक महिलांना कर्करोगाचे निदान झाले अशी माहितीही आरोग्यमंत्री सावंत यांनी दिली. ही घोषणा उमेद वाढवणारी असली तरी पालक आणि मुलींच्या मनात या लशीविषयी काही समज-गैरसमज असू शकतात. त्याविषयीही योग्य जनजागृती होण्याची गरज आहे.

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या (Cervical Cancer Vaccine)रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटने 'क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' (HPV)ही स्वदेशी लस विकसित केली असून त्याच्या चाचण्या सुरू होत्या. मात्र आता त्या लशीच्या निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून सामान्यांसाठी एप्रिल ते मे २०२३ च्या दरम्यान ही लस उपलब्ध होणार आहे. भारतात गर्भाशय मुखाच्या कर्करोग होणाऱ्या महिलांचे आणि त्यामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही जास्त असल्याने ही लस नक्कीच प्रभावी ठरेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. युरोप, अमेरिकेमध्ये ही लस उपलब्ध असलेल्या लशीची किंमत जास्त असल्याने भारतात त्याचा वापर फारसा होत नव्हता. 

(Image : Google)
(Image : Google)

ही लस का महत्त्वाची याबाबत बालरोगतज्ज्ञ डॉ. कल्पना सांगळे सांगतात... 

आपल्याकडे HPV या विषाणूचे प्रमाण शारीरिक संबंध असलेल्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात आहे. शारीरिक संबंधांमुळे साधारणपणे सर्व्हायकल (cervical), ओरल (oral), घशाचा (throat) आणि गुदद्वाराचा (anal) कॅन्सर होतो. यापैकी स्त्रियांमध्ये होणाऱ्या सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. आपल्याकडे याबाबत नियमित तपासणी केली जात नसल्याने सुरवातीच्या टप्प्यात हा आजार लक्षात येत नाही, मात्र लक्षात येतो तेव्हा तो गंभीर झालेला असतो. काही देशांमध्ये इतर लसींप्रमाणेच सर्व्हायकल कॅन्सरची लस दिली जाते. मात्र आपल्याकडे अद्याप त्याबाबत पुरेशी जागृती नसल्याने शासन आणि खासगी यंत्रणांकडूनही पुरेसे लक्ष दिले जात नाही. आपल्याकडे जेव्हा हे ९ ते १५ वर्षे वयाच्या मुलींना ही लस देण्यात येईल, तेव्हा आपल्याला त्याचा फायदा दिसेल. 

आकडेवारी काय सांगते?

Indian journal of Medical and Pediatric Oncology च्या अभ्यासानुसार, जगातील सर्व्हायकल कॅन्सरच्या एकूण रुग्णांपैकी एक चतुर्थांश रुग्ण हे विकसनशील देशातील असतात आणि भारत देश त्यात आघाडीवर आहे. एकूण कॅन्सरबाधित असलेल्या महिलांपैकी 6 ते 29 टक्के महिला गर्भाशय मुखाच्या कर्करोगाने त्रस्त असतात. भारतात ५३ पैकी एका स्त्रीला या आजाराचा धोका असतो, तर प्रगत देशात 100 पैकी एका स्त्रीला हा धोका असतो.

 भारतात हे प्रमाण जास्त का?

१. गरीब ते मध्यम जीवनमान

२. HPV विषाणूची जास्त प्रमाणात लागण 

३. तपासण्या कमी प्रमाणात होणे 

(Image : Google)
(Image : Google)

HPV लस कोणत्या वर्षी, कशी घ्यायला हवी?

९ ते १५ वर्षाच्या आतील मुलींनी ६ महिन्याच्या अंतराने २ डोस घ्यावेत. तर १५ वर्ष्यावरील मुलींनी पहिला डोस घेतल्यानंतर एक किंवा दोन महिन्यांनी दुसरा आणि त्यानंतर ६ महिन्यांनी तिसरा डोस घ्यायला हवा. 

प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पा चिटणीस सांगतात..

भारतात ही लस निर्माण झाली तर या लशीचची किंमत खूप कमी असेल त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकालाही ही लस घेणे शक्य होईल. कमी वयात लग्न होणे, एकामागे एक मूल होणे, एकाहून अधिक जणांशी शारीरिक संबंध या कारणांमुळे गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे महिलांना या लसीचा खूपच फायदा होईल, मात्र जास्तीत जास्त महिलांपर्यंत याबाबत माहिती पोहोचणे गरजेचे आहे.

Web Title: Cervical Cancer Vaccine HPV :Government's decision to give cancer preventive vaccine to girls aged 9 to 14, why is vaccine important to prevent the risk of cancer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.