Lokmat Sakhi >Health > कोणतं तेल सतत आहारात असेल तर कोलेस्टेरॉल वाढतं? कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कोणतं तेल योग्य?

कोणतं तेल सतत आहारात असेल तर कोलेस्टेरॉल वाढतं? कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कोणतं तेल योग्य?

Cholesterol Lowering Oils - The Best And Worst आपण कोणतं तेल आणि किती प्रमाणात खातो याचा विचार करुन स्वयंपाक करणं जास्त योग्य.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2023 06:17 PM2023-08-04T18:17:15+5:302023-08-04T18:18:04+5:30

Cholesterol Lowering Oils - The Best And Worst आपण कोणतं तेल आणि किती प्रमाणात खातो याचा विचार करुन स्वयंपाक करणं जास्त योग्य.

Cholesterol Lowering Oils - The Best And Worst | कोणतं तेल सतत आहारात असेल तर कोलेस्टेरॉल वाढतं? कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कोणतं तेल योग्य?

कोणतं तेल सतत आहारात असेल तर कोलेस्टेरॉल वाढतं? कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कोणतं तेल योग्य?

धावपळीच्या जीवनात अनेकांना स्वतःसाठी वेळ द्यायला जमत नाही. त्यामुळे कमी वयातच लोकांना मधुमेह, लठ्ठपणा, ब्लड प्रेशर, हृदयाच्या निगडीत समस्या छळतात. शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढलं की या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी.

शरीरातील कोलेस्टेरॉलची सरासरी पातळी 200 mg/dl पेक्षा कमी असायला हवी. ती जर ओलांडली गेली तर, तर आरोग्य बिघडते. आहारासह आपण जेवण करताना कोणतं तेल वापरत आहोत हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण तेलामुळे नसांमध्ये बॅड कोलेस्टेरॉल वाढते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडचण येते, अशा स्थितीत गंभीर समस्या निर्माण होते(Cholesterol Lowering Oils - The Best And Worst).

पोषण तज्ज्ञ 'निखिल वत्स' यांच्या मते, ''तेल आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, पण आपल्या शरीराला कोणते तेल फायदेशीर ठरेल हे तपासून पाहा. कारण काही लोकं रिफाइंड तेलाचा वापर करतात. परंतु, हे तेल आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.''

नखं सांगतात आजारांची लक्षणं, तपासा तुमची नखं-पाहा तुम्ही आजारी तर नाही.

हे कुकिंग ऑइल वापरणे बंद करा

- राइस ब्रान ऑइल

- शेंगदाणा तेल

- हॉट प्रेस्ड सुर्यफुल तेल

- मोहरीचे तेल

- सोयाबीन तेल

- मक्याचे तेल

रिफाइंड तेलाऐवजी हे तेल वापरा

- देशी तूप

-खोबरेल तेल

खूप घाम आला तर वजन कमी होते, फळे खाल्ली तर लवकर घटते? हे समज खरे की खोटे?

- कोल्ड प्रेस - मोहरीचे तेल, शेंगदाणा तेल, तिळाचे तेल

तेल अजिबात खाऊ नये का?

लठ्ठपणा आणि बिघडलेली जीवनशैली सुधारण्यासाठी तेलाचा वापर कमी करावा. पण याचा अर्थ असा नाही की पूर्णपणे तेलविरहित आहार घ्यावा. शरीराला ओमेगा ३ फॅट आवश्यक आहे. यामुळे मेंदूचा विकास, हॉर्मोन सिक्रीशन आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. त्यामुळे कमी प्रमाणात आहारात तेलाचा समावेश करावा.

Web Title: Cholesterol Lowering Oils - The Best And Worst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.