Lokmat Sakhi >Health > दिवाळीत घराची साफसफाई करून आजारी पडाल, ५ गोष्टी लक्षात ठेवा- न थकता करा काम

दिवाळीत घराची साफसफाई करून आजारी पडाल, ५ गोष्टी लक्षात ठेवा- न थकता करा काम

5 Tips For Cleaning House In Diwali: दिवाळीच्या आधी घर स्वच्छ करण्यासाठी खूप काम करायचं आणि ऐन सणात आजारी पडायचं.... असं होऊ नये म्हणून या काही गोष्टी लक्षात ठेवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2023 12:12 PM2023-11-02T12:12:29+5:302023-11-02T12:13:20+5:30

5 Tips For Cleaning House In Diwali: दिवाळीच्या आधी घर स्वच्छ करण्यासाठी खूप काम करायचं आणि ऐन सणात आजारी पडायचं.... असं होऊ नये म्हणून या काही गोष्टी लक्षात ठेवा.

Cleaning tips for diwali, How to take care of health while cleaning house for Diwali? | दिवाळीत घराची साफसफाई करून आजारी पडाल, ५ गोष्टी लक्षात ठेवा- न थकता करा काम

दिवाळीत घराची साफसफाई करून आजारी पडाल, ५ गोष्टी लक्षात ठेवा- न थकता करा काम

Highlights ऐन सणाच्या दिवशी घर तर स्वच्छ होतं पण आपलीच तब्येत मग नरमगरम होऊन जाते.

दिवाळी जवळ आली की घरांघरांत स्वच्छता मोहिम सुरू होते. घरात अगदी कुठे- कुठे ठेवलेल्या जुन्या जुन्या वस्तू उकरून काढल्या जातात. कधी कधी तर आपण स्वच्छता करण्यात एवढे गुंतून जातो की स्वत:कडे लक्षच देत नाही. मग नंतर हे सगळं जाणवायला लागतं आणि ऐन सणाच्या दिवशी घर तर स्वच्छ होतं पण आपलीच तब्येत मग नरमगरम होऊन जाते. त्यामुळे मग ज्यासाठी एवढी तयारी केली, त्या सणाचा आनंदच आपल्याला घेता येत नाही (Cleaning tips for diwali). असं या दिवाळीत होऊ नये, म्हणून साफसफाई करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा. काम करण्याचा उत्साह आणखी वाढेल.(How to take care of health while cleaning house for Diwali?)

 

दिवाळीची साफसफाई करताना स्वत:ची कशी काळजी घ्यायची?

१. कामाचं नियोजन करा

काही जणी एक किंवा दोन दिवसाच्या सुट्टीत सगळं घर आवरून टाकण्याचा चंग बांधतात. पण असं करू नका. कारण सगळं घर आवरून टाकणं हे एक- दोन दिवसाचं काम नाही.

दिवाळीत लाडक्या लेकीसाठी सुंदर फ्रॉक घ्यायचाय? लहान मुलींच्या फ्रॉकचे ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खास पर्याय

असं केल्याने सगळा कामाचा लोड एकदमच अंगावर येतो आणि प्रचंड थकवा येऊन जातो. त्यामुळे आपल्याला काय- काय स्वच्छ करायचं आहे, याची यादी करा आणि रोजचा एक- दोन तासांचा वेळ त्यासाठी राखून ठेवा. असं केल्याने थकवा येणार नाही. 

 

२. खाऊन घ्यायला विसरू नका

काही जणी अगदी सकाळपासूनच साफसफाईच्या मागे लागतात. सकाळी सगळा पसारा आवरायला काढायचा आणि दुपारपर्यंत तो आवरून टाकायचा, असं अनेक जणींचं असतं. त्यामध्ये मग त्या तहान- भूक विसरून जातात.

 पदा‌र्थ खा, केस पांढरेच होणार नाहीत

पण असं करू नका. पसारा आवरताना तुमच्या नाश्ता, जेवण या वेळा विसरू नका. आधी खाऊन घ्या आणि नंतर पसारा आवरा. रिकाम्यापोटी आवरायला गेलात तर खूप थकून जाल शिवाय ॲसिडीटी, अपचन असा त्रास होऊन आजारी पडाल.

 

३. पाणी- ज्यूस प्या

आवराआवरी करताना खूप घाम येतो. थकवा येतो. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊन थकवा येऊ शकतो. असं होऊ नये म्हणून अधूनमधून वारंवार पाणी, ज्यूस, ताक प्या.

 

४. मास्क लावा

आवराआवरी म्हणजे सगळं धुळीचंच काम असतं. अशावेळी धुळीमुळे सर्दी, खोकला असा त्रास होऊ शकतो. तो टाळायचा तर मास्क लावायलाच पाहिजे. तसेच हातात ग्लोज आणि पायात स्लिपर घालायलाही विसरू नका.

पुदिना विकत आणला की वाया जातो? कुंडीत लावा, ३ सोप्या स्टेप्स- हवा तेव्हा ताजा पुदिना मिळेल

५. ओझं उचलू नका

जे जड सामान तुम्हाला उचलणं किंवा ढकलणं शक्यच नाही, त्याच्या नादी लागूच नका. उगाच जड वस्तू उचलल्याने किंवा ढकलल्याने मान- पाठ दुखू शकते. 

 

Web Title: Cleaning tips for diwali, How to take care of health while cleaning house for Diwali?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.