कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर सध्या उपचार उपलब्ध असले तरी मृत्यूचा धोका पूर्णपणे टळत नाही. कॅन्सरच्या सुरूवातीच्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत व्यक्तीला अनेक शारिरीक मानसिक त्रासांमधून जावं लागतं. सध्याच्या जीवनशैलीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना हा आजार उद्भवत आहे. कोलोरेक्टल कॅन्सरला कोलन कॅन्सर असंही म्हटलं जातं. याचा सहसा वृद्धांवर परिणाम होतो असे मानले जाते, परंतु त्याचा परिणाम तरुण मुलांवरही होऊ शकतो. (Colon cancer cases rising in young adult do not ignore 5 early signs and symptoms)
अमेरिकन कॅन्सर सोसायटीद्वारे अलिकडेच एका अभ्यासात प्रकाशित करण्यात आलं की, पाचपैकी एक कॅन्सर रुग्ण ५५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील होता. याचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. पण संशोधकांच्यामते अनुवांशिक कारणांमुळे हे उद्भवू शकते. (Do not ignore 5 early signs and symptoms
शास्त्रज्ञ आणि लेखिका रेबेका सिगेल यांच्या मते कोलन कॅन्सरच्या सुमारे एक तृतीयांश प्रकरणे कौटुंबिक इतिहासाशी संबंधित आहेत. जास्त वजन वाढणं हे देखिल याचे मुख्य कारण आहे. याशिवाय वजन जास्त असल्याने पोटाच्या उजव्या बाजूला ट्यूमर होऊ शकतो. कोलन कॅन्सरच्या इतर कारणांमध्ये साखर-गोड पेये आणि प्रक्रिया केलेले मांस यांचा जास्त प्रमाणात वापर होतो.
या जोखीम घटकांचा मायक्रोबायोमवर परिणाम होतो. हे जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीव आहेत, जे मानवी पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करतात. आतड्याच्या किंवा गुदाशयाच्या निरोगी पेशी बदलतात आणि नियंत्रणाबाहेर वाढतात, ट्यूमर बनतात तेव्हा कोलन कॅन्सर होतो.
तरूणांमध्ये दिसणारी कॅन्सरची लक्षणं
तरुण रुग्णांमध्ये पोटदुखी हे कोलोरेक्टल कर्करोगाचे सर्वात सामान्य लक्षण आहे. यामुळे अनावश्यक वजन कमी होते मलाचा रंग, आकार आणि पोत बदलणे गुदाशयात रक्तस्त्राव. हार्वर्ड मेडिकल स्कूमझील प्रोफेसर आणि वाईस चेअर एंड्रयू चैन यांनी सांगितले की जास्तीत जास्त तरूण लोक स्वत:ला निरोगी समजतात. लक्षणांच्या गंभीरतेकडे लक्ष देत नाहीत. वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्यानं तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येतात. पोटाशी संबंधित आजार असल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.