Lokmat Sakhi >Health > सकाळी पोट साफ होत नाही, अस्वस्थ वाटतं? रात्री पाण्यासोबत ‘हा’ पदार्थ घ्या, सहज पोट होईल साफ

सकाळी पोट साफ होत नाही, अस्वस्थ वाटतं? रात्री पाण्यासोबत ‘हा’ पदार्थ घ्या, सहज पोट होईल साफ

Constipation Home Remedies : रात्रीच्यावेळी गरम दूधात तूप घालून प्यायल्यास दुसऱ्या दिवशी पोट चांगले साफ होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 11:12 PM2024-10-02T23:12:57+5:302024-10-03T16:06:34+5:30

Constipation Home Remedies : रात्रीच्यावेळी गरम दूधात तूप घालून प्यायल्यास दुसऱ्या दिवशी पोट चांगले साफ होते.

Constipation Home Remedies Milk And Ghee For Constipation Good For Hut Health | सकाळी पोट साफ होत नाही, अस्वस्थ वाटतं? रात्री पाण्यासोबत ‘हा’ पदार्थ घ्या, सहज पोट होईल साफ

सकाळी पोट साफ होत नाही, अस्वस्थ वाटतं? रात्री पाण्यासोबत ‘हा’ पदार्थ घ्या, सहज पोट होईल साफ

खाण्यापिण्याच्यासंबंधित कारणांमुळे गॅस, एसिडीटी यांसारख्या समस्या उद्भवतात. गॅसेस जास्त प्रमाणात झाल्यास मलत्याग  करण्यास अडचण येते. यामुळे व्यक्ती तासनतास  बाथरूममध्ये बसून राहावं लागते तरीही पोट नीट साफ होत नाही आणि पोटदुखू  लागते. अशा स्थितीत औषधं घेण्यापेक्षा काही घरगुती उपाय केल्यास गॅसेस, कॉन्स्टीपेशच्या त्रासापासून आराम मिळवण्यास मदत होईल. (Constipation Home Remedies) हे उपाय केल्यानं सकाळच्यावेळी पोट साफ होण्यास मदत होईल आणि दिवसभर पोटाचे त्रास उद्भवणार नाहीत.

रिसर्चगेटवर प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार तूप शरीरासाठी लेक्सेटिव्हप्रमाणे काम करते. तुपाच्या सेवनानं पचनक्रिया चांगली राहते. तुपाच्या सेवनानं पोट साफ न होण्याच्या त्रासापासून सुटका मिळते. तुपाशिवाय मनुकेसुद्धा आतड्यांसाठी उत्तम ठरतात. रात्री मनुके भिजवून सकाळी या पाण्याचे मनुक्यांचे सेवन करा. (Constipation Home Remedies Milk And Ghee For Constipation Good For Hut Health)

1) दूध आणि तूप

रात्रीच्यावेळी गरम दूधात तूप घालून प्यायल्यास दुसऱ्या दिवशी पोट चांगले साफ होते. टॉयलेट सीटवर बसून व्यक्तीला जास्त जोर लावाला लागत नाही आणि पोट खाली होते. तुपामुळे पोटात गुड बॅक्टेरियाज तयार होतात ज्यामुळे पोट साफ होणं सोपं होतं.

2) दही आणि  कलौंजीच्या बीया

एक वाटी दह्यात १ ते २ चमचा भाजलेल्या कलौंजीच्या बीया घाला आणि मिसळून खा. या पद्धतीने दही खाल्ल्यानं पोट भरलेलं राहतं आणि शरीराला सोल्यबल फायबर्स मिळतात ज्यामुळे पोट साफ होणं  सोपं होतं. 

रोजच्या वापरासाठी चांदीच्या पैंजणांच्या नाजूक डिजाईन्स; आकर्षक-सुंदर पैंजणांनी पाय उठून दिसतील

3) आवळ्याचा रस

एक ग्लास पाण्यात ३० मिलीलीटर आवळ्याचा रस मिसळून पिऊ शकता. यामुळे  गॅस, एसिडीटीच्या समस्येच्या त्रासापासून सुटका होते. याशिवाय इतर फायदे मिळतात.

4) पाणी पित राहा

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे गॅसेसची समस्या उद्भवते.  पाणी पित राहल्यानं गॅसेसच्या समस्येच्या आराम मिळतो. दिवसभरात पाण्याव्यतिरिक्त ज्यूस आणि नारळपाण्याचे सेवन करू शकता. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. 

साबुदाणा खिचडीचा गोळा होतो-चिकट होते? १ ट्रिक -खिचडी होईल मऊ मोकळी

5) व्यायाम करणं गरजेचं

दिवसभर बसून राहून काम केल्यानं गॅसेसचा त्रास होतो. म्हणून थोडा फार व्यायाम करणं गरजेचा आहे.  जास्तवेळ नको पण कमीत कमी अर्धा ते एक तास अर्धा तास वॉक करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं ज्यामुळे गॅसेससारख्या समस्या उद्भवत नाहीत. 

Web Title: Constipation Home Remedies Milk And Ghee For Constipation Good For Hut Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.