Lokmat Sakhi >Health > पोटात गॅस होतो-नीट पोट साफ होत नाही? रात्री 'हा' १ उपाय करा, सकाळी पोट साफ

पोटात गॅस होतो-नीट पोट साफ होत नाही? रात्री 'हा' १ उपाय करा, सकाळी पोट साफ

Constipation Home Remedies Milk And Ghee :

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 09:34 PM2024-09-11T21:34:18+5:302024-09-12T18:53:57+5:30

Constipation Home Remedies Milk And Ghee :

Constipation Home Remedies Milk And Ghee or Constipation What To Do To Fight With Constipation | पोटात गॅस होतो-नीट पोट साफ होत नाही? रात्री 'हा' १ उपाय करा, सकाळी पोट साफ

पोटात गॅस होतो-नीट पोट साफ होत नाही? रात्री 'हा' १ उपाय करा, सकाळी पोट साफ

गॅस, पचनक्रियेशी निगडीत समस्या उद्भवल्यास पोट साफ होण्यास त्रास होतो. गॅसमुळे मलत्याग होणं कठीण होतं आणि तासनतास टॉयलेटमध्ये बसून राहावं लागतं तरी पोट साफ होत नाही. गॅसची समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं लागतं, खाण्यापिण्यात फायबर्सची कमतरता, जीवनशैली एक्टिव्ह नसणं यामुळे गॅस, कॉन्स्टीपेशनची समस्या उद्भवू शकते.  काही आयुर्वेदीक उपाय करून तुम्ही पोटाचे त्रास टाळू शकता. ज्यामुळे मलत्याग होणं सोपं जातं. गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. (Constipation Home Remedies Milk And Ghee or Constipation)

गॅसचे घरगुती उपाय

कफ, एसिडिटी झाल्यास  दूध आणि तूप एकत्र मिसळून पिऊ शकता. हा आयुर्वेदीक उपाय आहे जो नॅच्युरल लॅक्सेटिव्ह प्रमाणे काम करतो आणि मल सॉफ्ट होण्यास मदत होते. रात्रीच्यावेळी गरम दुधात एक चमचा तूप घालून प्या. ज्यामुळे सकाळी मलत्याग करणं सोपं जातं आणि पोट साफ होण्यास मदत होते.

घरातले बल्ब-ट्युबलाईटला धूळ लागलीये? १ ट्रिक, लख्ख चमकतील बल्ब, दुप्पट प्रकाश येईल

खाण्यापिण्याच्या अनेक पदार्थांचे सेवन केल्यास गॅस,  एसिडिटीच्या त्रासापासून आराम मिळतो. गॅसच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस पिऊ शकता. रात्री झोपण्याच्याआधी  लिंबू एक ग्लास पाण्यात पिळून प्या. या पद्धतीनं लिंबू पाणी प्यायल्यास गॅसेसचा त्रास होत नाही.

नाश्त्याला पोहे खा-५ किलो वजन कमी करा; डॉक्टर सांगतात पोहे खाऊन वजन कमी करण्याची ट्रिक

ऑलिव्ह ऑईलचे सेवन गॅसेसच्या त्रासावर गुणकारी ठरते. एक चमचा ऑलिव्ह ऑईल सकाळी उठून रिकाम्या पोटी प्या. ज्यामुळे गट हेल्थ चांगली राहते. हे तेल ल्युब्रिकेंटप्रमाणे काम करते ज्यामुळे मल मऊ बनतो आणि मलत्याग करणं सोपं जातं. 

आलं हा घरगुती उपाय या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी  उत्तम उपाय आहे. एक कप पाण्यात थोडं आलं घालून कुटून घ्या नंतर हे पाणी गरम करून प्या. ज्यामुळे ब्लॉटींग, मासिक पाळीच्या वेदना, गॅसेससारख्या समस्यांपासून आराम मिळतो. जर तुम्हाला सतत गॅस होत असेल फायबर्सचे प्रमाण कमी असते. सफरचंदाव्यतिरिक्त पिअर, पेरू खाऊ शकता. 

Web Title: Constipation Home Remedies Milk And Ghee or Constipation What To Do To Fight With Constipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.