कोरोना लसीच्या लागोपाठ समोर येत असलेल्या साईड इफेक्ट्सवर सगळ्यांचेच लक्ष आहे. कारण प्रत्येकाला लस घेण्याची इच्छा असून कोरोनाला स्वतःपासून लांब ठेवायचं आहे. डेली मेलनं दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये जवळपास ४००० महिलांना लस घेतल्यानंतर मासिक पाळीशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागत आहे. लसीच्या परिणामांवर लक्ष ठेवून असलेल्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे की साधारपणपणे ३० ते ४९ वयोगटातील महिलांमध्ये लस घेतल्यानंतर साईड इफेक्टस दिसून आले आहेत.
रिपोर्टनुसार महिलांना मासिक पाळीच्या दिवसात सामान्य रक्तस्त्राव न होता जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचं दिसून आलं आहे. तर काही महिलांमध्ये उशीरा पाळी येण्याची समस्या दिसून आली. मेडिसिन एंड हेल्थकेयर प्रॉडक्ट्स रेगुलेटरी एजेंसी (MHRA) नुसार १७ मे पर्यंत एक्स्ट्राजेनका शॉटशी निगडीत २ हजार ७३४ प्रकरणं नोंदवण्यात आले आहेत.
दरम्यान हा दावा फक्त एक्स्ट्राजेनकाच्या लसीबाबत करण्यात आलेला नाही. फायझरच्या लसीमुळेही मासिक पाळीत बदल झाल्याचे १ हजारांपेक्षा प्रकरणात दिसून आली आहेत. तर ६६ प्रकरणांमध्ये मॉडर्नाची लस जबाबदार असल्याचं दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या म्हण्यानुसार ही संख्या अधिक जास्त असू शकते. कारण मासिक पाळीशी निगडीत समस्यांचा कोणताही आकडा नमूद करण्यात आलेला नाही.
ब्रिटनचे वृत्तपत्र दी संडे टाईन्सनं MHRA च्या कोरोनाच्या साईड इफेक्ट्सच्या यादीत पिरिएड्सशी संबंधित समस्या नमुद केल्याप्रकरणी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. दरम्यान समोर आलेल्या निष्कर्षानुसार लसीकरण झालेल्या महिलांमध्ये ही समस्या व्यापक स्वरूपात दिसून आलेली नाही. यावर अधिक संशोधन आणि तपासणी केली जाणार आहे.
MHRA प्रमुख डॉ. जून रायने यांनी सांगितले की, ''आम्ही आरोग्य तज्ज्ञांच्या मदतीनं मासिक पाळीतील आजार, अनियमित वजायनल ब्लिडिंग तसंच लसीकरण साईड इफेक्टसच्या रिपोट्सचा रिव्ह्यू तयार केला. ब्रिटनमध्ये लावल्या जात असलेल्या तिन्ही लसींच्या आकडेवारीनुसार जास्त प्रमाणात धोका निर्माण होईल असं वाटत नाही.''
पुढे त्यांनी सांगितले की, ''अशा महिलांची संख्या खूप कमी आहे. ज्यांना लसीकरणानंतर मेंस्ट्रुअल डिसॉर्डरर्सचा सामना करावा लागला आहे. या संकेतांना समजण्यासाठी रिपोर्ट्सची बारकाईनं पाहाणी करणं गरजेचं आहे.'' रिपोर्टनुसार ३० ते ४९ या वयोगटातील जवळपास २५ टक्के महिलांना मासिक पाळीशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागला होता. या महिलांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होणं, पाळी उशीरा येणं, पोटाशी निगडीत समस्यांचा समावेश होता. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे असा बदल झाला असावा. याशिवाय काही मेडिकल कंडिशन्सही कारण असू शकतात.
ब्रिटनप्रमाणे अमेरिकेतही लसीकरणाशीसंबंधीत अशा समस्या पाहायला मिळाल्या. आता जगभरातील वैज्ञानिकांच्यामते मासिक पाळीतील साईड इफेक्टसबाबत लगेचच काही अंदाज बांधणं घाई केल्यासारखं होईल. ऑर्गेनाइजेशनच्या वेबसाईटवर एका ब्लॉगमध्ये पोस्ट करण्यात आलं आहे की, HPV (ह्यूमन पैपिलोमावायरस) लस आणि फ्लू ची लस घेतल्यानंतरही महिलांच्या मासिक पाळीवर परिणाम झाला होता. आता कोरोनाची लस घेतल्यानंतरही असे परिणाम दिसत असतील तर यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही.
मासिक पाळीदरम्यान इम्यूनिटी सेल्स गर्भाशयाची लायनिंग तयार करून ती तोडण्याचे काम करतात. लस इम्यून सेल्सना उत्तेजित करत असलेल्या इन्फ्लेमेटकी मॉलिक्यूल्स सायटोकिन्स आणि इंटरफेरॉन उत्पादित करतातत. या प्रक्रियेत अनेकदा लायनिंग प्रभावित झाल्यामुळे मासिक पाळीत बदल घडून येतात.