सध्या कोरोना लसीकरणसाठी १८ ते ४४ वयोगटातील लोकांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे. लसीकरणाबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. कारण लस घेतल्यानंतर दैनंदिन जीवनात काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं गेलं नाही तर लस निष्क्रिय ठरू शकते. लसीकरणानंतर शरीरसंबंध ठेवावेत की नाहीत. याबाबत आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. तज्ज्ञांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. जेणेकरून लोकांच्या मनातील संभ्रम दूर होईल. वैद्यकीय तज्ज्ञांनी असे सुचवले आहे की दुसरा डोस घेतल्यानंतर पुरुष आणि स्त्रियांनी गर्भनिरोधकाचा वापर करावा.
गाझियाबाद येथील कोलंबिया एशिया हॉस्पिटलमधील डॉ. दीपक वर्मा यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, ''या लसीचे दीर्घकलीन दुष्परिणाम आहेत की नाही आणि शरीर संबंध झाल्यास पुरुष आणि स्त्रीवर त्याचा परिणाम होतो की नाही हे आता सांगणे घाई करण्यासारखे होईल. लसीकरण केलेली व्यक्ती लैंगिक संबंधापासून दूर राहिल हे नेहमीच शक्य होणार नाही."
डॉक्टरांनी मात्र यावर जोर दिला की सद्य परिस्थितीत गर्भनिरोधक ही सर्वोत्तम सुरक्षा आहे. ''दुसरा डोस मिळाल्यानंतर किमान 2 ते 3 आठवड्यांपर्यंत कंडोमसारख्या गर्भनिरोधकांचा वापर पुरुष आणि स्त्रियांना करावा. कारण शरीरसंबंधांदरम्यान शरीरातील द्रव संपर्कात येतात. " असंही ते म्हणाले
महिलांना अधिक काळजी घ्यावी लागणार?
पुढे त्यांनी सांगितले की, ''लसीचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो हे सध्या माहीत नसल्यानं कंडोम वापरणे हे सर्वात चांगले आणि सर्वात प्रभावी प्रतिबंधक असेल. सर्व महिलांची शारीरिक स्थिती आणि आरोग्याचा स्तर हा वेगवेगळा असतो म्हणून लसीसाठी पात्र महिलांनी लस घेण्यापूर्वी स्त्रीरोग तज्ञाचा सल्ला घ्यावा. शासनाकडूनही केवळ गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना लसीकरण न करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.''
एका संशोधनानुसार कोरोना व्हायरस संक्रमित व्यक्तीमध्ये सीमेन जास्त राहात नाही. परिणामी संबंधित व्यक्तीच्या पार्टनरला कोणताही धोका नसतो असं सांगण्यात आलं आहे. चीनमधील वुहानमध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार कोविड - 19 बाधित रूग्णांवर हा अभ्यास करण्यात आला होता. मात्र या शोधात केवळ 34 जण समाविष्ट होते. त्यामुळे यावर अधिक शोधाची गरज आहे. असं तज्ज्ञांचे म्हणणे होते.
फायझरकडून अफवांबाबत स्पष्टीकरण
अफवांमधून असा दावा करण्यात आला की फायझर लसीमुळे अनुवांशिक बदल होतात. आता फाझरच्या लसीमुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्व येत नाही असे विधान प्रसिद्ध करण्यात आले. कारण अफवांबाबत कोणताही पुरावा नाही. काही तज्ज्ञांनी बाळासाठी प्रयत्न करत असलेल्यांनी किंवा गर्भवती महिलांना लसीच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये भाग घेऊ नये, असे सांगितले होते.
सीडीसीने असेही म्हटले होते की एमआरएनए लसीच्या कार्यपद्धतीवर तज्ञांचा असा विश्वास आहे. गर्भवती महिलांना यामुळे विशिष्ट धोका संभवण्याची शक्यता नाही. परंतु गर्भवती महिलांमध्ये एमआरएनए लसींच्या वास्तविक जोखमीबाबत माहिती उपलब्ध नसल्यानं गर्भवती महिलांना क्लिनिकल चाचण्यांमधून वगळले आहे.
कोविड लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर काय खायचं अन् काय नाही?
१) जर तुम्ही दारू पित असाल तर काही दिवस दारूपासून लांब राहा. लस घेतल्यानंतर काही दिवस दारू पिऊ नका. काही लोकांमध्ये लसीचे सामान्य परिणाम आहेत तर काहींमध्ये गंभीर परिणाम दिसून येत आहेत. ताप, डोकेदुखी, थकवा, उलटी असे सामान्य परिणाम जाणवतात त्यात दारू पित असाल तर शरीरातील डिहाइड्रेशन वाढू शकतं त्यामुळे सामान्य परिणामही गंभीर होऊ शकतात.
२) लस घेतल्यानंतर एक दिवस पूर्ण शरीराला आराम द्या. त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते. लस घेण्याच्या एक दिवस आधी रात्री चांगली झोप घ्या, डिनर डायटवर लक्ष द्या. क्लिनीकल स्लीप मेडिसिन पत्रिकेनुसार फायबरची कमी मात्रा आणि सॅचुरेटेड फॅट आणि शुगर शरीराला योग्य मजबुती मिळत नाही. त्यामुळे त्याने झोपही मिळत नाही. रात्री जेवण असं खा ज्याने लवकर झोप येईल आणि चांगली झोप मिळेल. लस घेण्यापूर्वी डिनरमध्ये सूप आणि सलाद खाण्याचा प्रयत्न करा.
३) लस घेण्यापूर्वी आणि त्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय त्यावर तुम्ही हाइड्रेटेड आहात की नाही हे जाणवतं. इंस्टिट्यूट ऑफ मेडिसिननुसार महिलांनी प्रत्येक दिवशी २.७ लीटर(११ कप) आणि पुरुषांनी ३.७ लीटर(१५ कप) पाणी प्यावं. लस घेण्यापूर्वी शरीरात पाण्याची कमी अजिबात नको.
४) लस घेतल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो. अनेकदा हा तणाव अंगदुखीत बदलतो. त्यासाठी लस घेण्यापूर्वी पाणी, लिक्विड डाईट आणि पोटभरून जेवा. त्यामुळे लस घेतल्यानंतर तुम्हाला कमी परिणाम जाणवेल. काही लोकांना ब्लड शुगरमुळे चक्कर येते. लस घेतल्यानंतर प्रोटिन, फायबर आणि हलके फॅटवाले पदार्थ खा.
५) लस घेतल्यानंतर उलटीसारखं जाणवतं. त्यासाठी वाचण्यासाठी असे पदार्थ खा ज्याचं पचन लवकर होईल. सूप, नारळ पाणी प्या. टरबूज, ब्राऊन राईस, बटाटे खाणंही फायदेशीर आहे. जर तुम्हाला भूक लागत नसेल तर थोड्या थोड्या वेळानंतर काहीतरी खा. लस घेतल्यानंतर मटणसारखे जड पदार्थ खाऊ नका.