कोरोनापासून बचावासाठी सर्वच पातळीवर मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. कोरोना विषाणूची दुसऱ्या लाटेचा उद्रेक होत असताना लोकांना आवश्यक काम नसता घराबाहेर न जाण्याचा सल्ला देण्यात येत असून मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मास्कच्या वापरामुळे अर्धा चेहरा झाकला जातोय? त्यामुळे मेकअप कसा करायचा? मग खूप गुदमरल्यासारखं वाटतंय असं अनेकांचं म्हणणं असतं. दुसरीकडे अमेरिकेत ज्या लोकांना लसी देण्यात आल्या आहेत. त्यांना मास्कशिवाय वावरण्यास परवानगी दिली आहे. अशा स्थितीत भारतात मास्कपासून कधी सुटका मिळणार असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे.
अमेरिकेत कोरोनाच्या 25 कोटीहून लोकांना लसीचे डोस मिळाले आहेत. परंतु भारतात आतापर्यंत केवळ 18 कोटी लोकांना लसी देण्यात आली आहे. आपल्या देशातील कोरोना प्रकरणं कमी होण्यासाठी जवळपास 50 टक्के लोकांनी लस दिली जायला हवी. जुलैपासून लसीकरणात वाढ होण्याचा अंदाज वर्तवली जात आहे.
वर्षाच्या शेवटापर्यंत मास्कपासून सुटका मिळणार का?
या वर्षाच्या शेवटापर्यंत कोरोनापासून सुटका मिळू शकते. असं मानलं जात आहे. कारण डिसेंबरपर्यंत भारतात 2 बिलियन लसी असतील. जुलैपासून 90 कोटी लोकांना लस दिली जाऊ शकते. म्हणजेच डिसेंबरपर्यंत जवळपास 100 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण होईल. परिणामी संक्रमणाचा वेग कमी होईल. त्यामुळेच मास्कच्या वापरापासून सुटका मिळू शकते, अशा चर्चा आहेत. पण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं फार महत्वाचं आहे.
सद्यस्थिती काय आहे?
आपण सध्याच्या काळाबद्दल बोललो तर सद्यस्थिती पाहून आपण मास्क काढण्याचा विचारही करू शकत नाही. जर आपल्याला अशी परिस्थिती गाठायची असेल तर त्यासाठी दररोज पन्नास ते साठ लाख लोकांना लसीसाठी अर्ज करावे लागतील. एका महिन्यात दीड कोटी लोक लस घेण्याची गरज आहे आणि डिसेंबरपर्यंत ही संख्या १०० कोटी होईल. मग कदाचित अमेरिकेप्रमाणे भारतातही मास्क काढून वावरण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.
मास्क लावणं का गरजेचं आहे?
कोरोनाच्या प्रसाराची सुरूवात झाल्यापासून, डॉक्टर, वैज्ञानिक, जागतिक आरोग्य संघटना आणि सरकार असे म्हणत आहेत की तुम्हाला कोरोना विषाणू टाळायचा असेल तर घराबाहेर, गर्दीच्या ठिकाणी, एखाद्याला भेटताना मास्क घालणं आवश्यक आहे.
एवढेच नाही तर आता आपल्याला डबल मास्कही घालायला सांगितले जात आहे. जेणेकरून आपण कोरोनापासून दूर राहू शकू. कोरोना विषाणू आपल्या तोंडात आणि नाकातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. अशा परिस्थितीत मास्क हे शस्त्र आहे जे आपल्याला विषाणूपासून वाचवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे सध्या कोरोनाला हरवण्यासाठी मास्कच्या वापराशिवाय पर्याय नाही.