Lokmat Sakhi >Health > खोकून खोकून छाती दुखते-कफ कमीच होत नाही? १ घरगुती उपाय- कफ लवकर होईल कमी

खोकून खोकून छाती दुखते-कफ कमीच होत नाही? १ घरगुती उपाय- कफ लवकर होईल कमी

Cough Home Remedy : सतत औषधांची सवय लावण्यापेक्षा काही घरगुती उपाय करून तुम्ही खोकल्याच्या त्रासावर आराम मिळवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 12:48 PM2024-10-07T12:48:18+5:302024-10-07T18:18:58+5:30

Cough Home Remedy : सतत औषधांची सवय लावण्यापेक्षा काही घरगुती उपाय करून तुम्ही खोकल्याच्या त्रासावर आराम मिळवू शकता.

Cough Home Remedy : Top Home Remedies Of Cough And Throat Infection According To Research | खोकून खोकून छाती दुखते-कफ कमीच होत नाही? १ घरगुती उपाय- कफ लवकर होईल कमी

खोकून खोकून छाती दुखते-कफ कमीच होत नाही? १ घरगुती उपाय- कफ लवकर होईल कमी

खोकल्याचा त्रास अनेकांना उद्भवतो. बरेचसे लोक  खोकल्याच्या त्रासाने त्रस्त असतात. यासाठी लोक सुक्या खोकल्यावर घरगुती उपाय शोधत असतात. जर तुम्हालाही खोकल्याची लक्षणं जाणवत असतील तर काही उपाय करू शकता. (Cough Home Remedy) खोकल्यासाठी घरगुती उपाय कोणते ते पाहूया. सतत औषधांची सवय लावण्यापेक्षा काही घरगुती उपाय करून तुम्ही खोकल्याच्या त्रासावर आराम मिळवू शकता. (Top Home Remedies Of Cough And Throat Infection According To Research)

खोकल्याचा त्रास दूर करण्यासाठी आलं फायदेशीर

विनमॅक, इंटरनॅशनल हॉस्पिटलच्या रिपोर्टनुसार  कफ, खोकल्याचा त्रास टाळण्यासाठी तुम्ही आल्याचं पाणी पिऊ शकता.  आल्यात बायोएक्टिव्ह कम्पाऊंड्स असतात. ज्यामुळे शरीराला फायदे मिळतात. यातील बायोएक्टिव्ह कंम्पाऊंड्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अलिकडेच करण्यात आलेल्या अभ्यासात दिसून आले की आल्यात एंटी इफ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे आजारांचा धोका टाळता येतो.  आल्यात एंटी बॅक्टेरीअल गुणधर्म असल्यामुळे घशाचे त्रास उद्भवत नाही (Ref). मध आणि आल्याचं पाणी प्यायल्यास घश्याचा त्रास उद्भवत नाही.  एक ग्लास पाणी उकळवायला ठेवून त्यात मध, लिंबू घालून नंतर  गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर गाळून या पाण्याचे सेवन करा. 

१) खोकल्यावर आराम मिळवण्यासाठी तुम्ही गरम पाणी आणि मीठाचा वापर करू शकता. यासाठी गरम पाण्यात चुटकीभर मीठ घालून गुळण्या करा. असं केल्यानं घश्यातील त्रास, खोकल्यापासून आराम मिळेल.

२) आवळा खोकल्यासाठी उत्तम मानला जातो.  आवळ्यात व्हिटामीन सी असते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. तुम्ही आपल्या आहारात आवळ्याचा समावेश करू शकता. एंटी ऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे इम्यूनिटी चांगली राहण्यास मदत होते. 

वरचे दात पिवळे-आतून किड लागली? दात घास १ छोटा बदल करा, मोत्यांसारखे चमकतील दात

३) अर्धा चमचा मधात एक चिमूट वेलची आणि लिंबाचा रस घाला. दिवसातून  २ ते ३ वेळा या मिश्रणाचे सेवन करा. हा घरगुती उपाय केल्यास खोकल्याचा त्रास दूर होण्यास मदत होईल.

४) डाळिंबाचा रससुद्धा खोकल्यापासून आराम देण्यासाठी फायदेशीर ठरतो. यासाठी तुम्हाला डाळींबाच्या रसात आल्याचा रस घालावा लागेल.

शरीर पोखरून सडपातळ बनवते व्हिटामीन B-12 ची कमी; रोज हे ५ पदार्थ खा, फिट दिसाल

५) लसूणसुद्धा खोकल्याचा त्रास दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो. लसूण तुपात भाजून याचे सेवन करू शकता. 

Web Title: Cough Home Remedy : Top Home Remedies Of Cough And Throat Infection According To Research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.