आजकाल बरेच लोकं शुगर आणि हाय ब्लड प्रेशरच्या समस्येने त्रस्त आहे. यामुळे हृदच्याच्या निगडीत समस्या वाढतात. शिवाय स्ट्रोकचा धोकाही वाढतो. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यायला हवे. अन्यथा कमी वयात गंभीर रोग झपाटू शकतात. बिघडलेली जीवनशैली, वेळेवर जेवण न करणे, अरबट-चरबट खाणे या कारणांमुळेही शुगर आणि बीपीची समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून आपण काही घरगुती उपायही करू शकता.
अनेक आयुर्वेदिक औषधी वनस्पती, मसाले आणि फळे यांचा आहारात समावेश केल्याने रक्तदाब आणि मधुमेहावर सहज नियंत्रण मिळवता येऊ शकते. आहारात कस्टर्ड अॅप्पल म्हणजेच सीताफळाचा समावेश केल्याने शुगर आणि ब्लड प्रेशरवर नियंत्रण मिळवता येते. सीताफळाचा आहारात समावेश कसा करावा याची माहिती आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी दिली आहे(Custard apple benefits in reducing risk of diabetes and blood Pressure).
शुगर आणि ब्लड प्रेशरवर नियंत्रण मिळवण्यासाठी खा सीताफळ
- सीताफळ डायबिटिजग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. आयुर्वेदानुसार या फळाचा आहारात समावेश केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
- सीताफळात अॅनोनॉकिन नावाचे घटक असते. जे टाईप-२ मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. शिवाय इन्शुलिनची पातळीही नियंत्रणात राहते.
दिवाळीत तेलकट-मसालेदार खूप खाणं झालं? पोट फुगलं-अपचनाचा त्रास? ४ स्पेशल ड्रिंक-पोट साफ
- ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी नियमित सीताफळ खावे. आपण आपल्या आहारात सालीच्या पावडरचा देखील समावेश करू शकता.
डायबिटिजग्रस्त रुग्णांनी सीताफळ कसे खावे?
- अनेकदा आपण सीताफळ खाताना त्याची साल फेकून देतो. पण त्याच्या सालीतही बहुगुण आढळतात. त्यातील गुणधर्मांमुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते. यासाठी एका भांड्यात एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात १० ग्रॅम सीताफळाची पावडर घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. चहाच्या गाळणीने पाणी गाळून घ्या, व दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. आपण त्याऐवजी फळ देखील खाऊ शकता. यामुळे ब्लड प्रेशर आणि शुगरची पातळी नियंत्रित राहते.
सीताफळ खाण्याचे इतर फायदे
- सीताफळामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी आढळते. जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरते. शिवाय दमा आणि हृदय रोग असलेल्या रुग्णांसाठी उत्तम मानले जाते.
कमीत कमी तेलात उजळतील दिवाळीत दिवे, खरे नाही वाटणार लावा पाण्यातले दिवे.. पाहा आयडिया
- आहारात सीताफळाचा समावेश केल्याने बॅड कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते. यासह रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास व अॅनिमिया दूर करण्यासही फायदेशीर ठरते.
- सीताफळामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे स्नायूंना सक्रिय करण्यास मदत करते आणि शारीरिक कमकुवतपणा दूर करते. यासह यात फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनाचा त्रास होत नाही.