Lokmat Sakhi >Health > World Diabetes Day 2022 : मधुमेही रुग्णांनी पांढऱ्या तांदळाऐवजी खावा काळा तांदूळ, नियंत्रणात राहील साखर

World Diabetes Day 2022 : मधुमेही रुग्णांनी पांढऱ्या तांदळाऐवजी खावा काळा तांदूळ, नियंत्रणात राहील साखर

Benefits of Black Rice Diabetes Patient पांढऱ्या तांदळात मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असते. म्हणूनच डॉक्टर मधुमेही रुग्णांना ते टाळण्यास सांगतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 12:28 PM2022-11-14T12:28:14+5:302022-11-14T20:01:46+5:30

Benefits of Black Rice Diabetes Patient पांढऱ्या तांदळात मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असते. म्हणूनच डॉक्टर मधुमेही रुग्णांना ते टाळण्यास सांगतात.

Diabetic patients should eat black rice instead of white rice, sugar will be under control | World Diabetes Day 2022 : मधुमेही रुग्णांनी पांढऱ्या तांदळाऐवजी खावा काळा तांदूळ, नियंत्रणात राहील साखर

World Diabetes Day 2022 : मधुमेही रुग्णांनी पांढऱ्या तांदळाऐवजी खावा काळा तांदूळ, नियंत्रणात राहील साखर

भात हा पदार्थ सर्व भारतीयांच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. जेवणाच्या ताटात भात नसेल तर जेवण अपूर्ण झाले आहे असे वाटते. आपण सर्वजण वेगवेगळ्या ग्रेव्हीजच्या आणि रोटीच्या तुलनेत भात खूप आवडीने खात आलो आहोत. मात्र, मधुमेहाच्या रुग्णांना गोड पदार्थ, चरबीयुक्त, मीठ, तेल आणि कार्बयुक्त असलेले पदार्थ खाण्यास मनाई आहे. ज्यात पांढऱ्या तांदळाचा देखील समावेश आहे. पांढऱ्या तांदळात मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असते. म्हणूनच डॉक्टर मधुमेही रुग्णांना ते टाळण्यास सांगतात. परंतु, पांढऱ्या तांदळाच्या ऐवजी आपण काळा तांदळाचा आहारात समावेश करू शकता. हे तांदूळ आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवू शकते. यासह भात खाण्याचा देखील समाधान मिळेल.

मदरहुड हॉस्पिटल्स, चेन्नई येथील आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ हरी लक्ष्मी यांनी, मधुमेहाच्या रुग्णांसाठी काळा तांदूळ आरोग्यदायी आहे की नाही, यासंदर्भात हेल्थ शॉट्ससह बोलताना सांगितले, "काळ्या तांदळात पौष्टिक-समृद्ध घटक आणि धान्याचे कोंडाचे थर आहेत. आणि पांढऱ्या तांदळात फक्त पिष्टमय एंडोस्पर्म असतात, त्यामुळे काळा तांदूळ खाण्याचा सल्ला मधुमेह रुग्णांसाठी दिला जातो, हे तांदूळ शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.” 

काळा तांदूळ उत्तम पर्याय

मधुमेहाच्या रुग्णांसाठी काळा तांदूळ हा एक आरोग्यदायी पर्याय आहे, हे अनेकांना माहीत नाही. काळ्या तांदळात पोषक आणि कोंडा यांचे अनेक थर असतात, तर पांढरा तांदूळ हा पिष्टमय थरांचाच एक प्रकार असतो, त्यामुळे पांढर्‍या तांदळापेक्षा काळा तांदूळ हा उत्तम पर्याय आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी काळा तांदूळ खूप फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर फायबर आणि पोषक तत्वे असतात, आणि मधुमेही रुग्णही ते रोज खाऊ शकतात.

रक्तातील साखर नियंत्रित

काळ्या तांदळात फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास खूप मदत करते. त्यामुळे पांढऱ्या तांदळा ऐवजी काळा तांदळाचा आजच आहारात समावेश करा.

वजन कमी करण्यास मदत

वजन वाढल्याने मधुमेहावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. हे एक मोठे कारण आहे की मधुमेहाच्या रुग्णांना पांढरा भात टाळण्याचा सल्ला दिला जातो. दुसरीकडे, काळा तांदूळ तुमचे वजन संतुलित ठेवण्यास मदत करू शकतो. कारण यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते.

काळा तांदूळ ग्लूटेन मुक्त

मधुमेहाच्या रुग्णांना ग्लूटेन टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे फुगणे आणि पोटदुखीशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. काळा तांदूळ ग्लूटेन मुक्त आहे. आणि हेच मुख्य कारण आपणास शरीरातील साखर नियंत्रित करायला मदत करते.

टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी

आपण मधुमेहाचे रुग्ण नसाल, तरीही आपण काळा भात खाऊ शकता. यामध्ये फायबर आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त आहे. यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रणात राहते. या कारणामुळे आपल्या शरीरातील साखर नियंत्रित राहते. आणि भविष्यात मधुमेह होण्याचा धोका देखील टाळता येतो.

पौष्टिकतेने परिपूर्ण

काळ्या तांदळात पोषक तत्वांचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये प्रथिने, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे.

मधुमेह सोडून इतर

काळा तांदूळ हृदयरोग आणि त्याचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच यामध्ये आढळणाऱ्या कॅरोटीनोइड्समुळे ते डोळ्यांसाठीही चांगले आहे. हे ग्लूटेन-मुक्त आहे, म्हणून सेलिआक (यामध्ये लोकांना ग्लूटेनची ऍलर्जी असते) रुग्ण देखील त्याचे सेवन करू शकतात. यामध्ये भरपूर फायबर असल्याने ते शरीरात चरबी वाढू देत नाही आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते.

कोणी काळा तांदूळ खाऊ नये

ज्यांना पोटाच्या निगडित समस्या आहेत, त्यांनी काळा तांदूळ प्रमाणात खावे. जास्त प्रमाणात काळ्या तांदळाचे सेवन केल्याने पोट बिघडणे, गॅस, फुगणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे संतुलित प्रमाणात खा. जर पोटाची समस्या अधिक प्रमाणावर होत असेल तर त्याचा आहारात समावेश करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Diabetic patients should eat black rice instead of white rice, sugar will be under control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.