आपल्यासाठी पाणी किती महत्वाचं आहे, हे काही वेगळं सांगायला नको (Drinking Water). आरोग्य सुदृढ, केस, त्वचा आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी नियमित पाणी प्यायला हवेच (Health Benefits). याशिवाय, हे इलेक्ट्रोलाइट संतुलन, रक्तदाब नियंत्रित, शरीराचे तापमान नियंत्रित यासह इतर फायदे प्रदान करते.
तहान लागली की लोक ज्यूस किंवा सोडा पिण्याऐवजी पाण्याला पसंती दर्शवतात. पण पाणी पिण्याचीही एक पद्धत असते. पद्धत जर चुकली तर आरोग्याला फायदे मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकते. बऱ्याचदा तहान लागली की आपण उभं राहून, गटागटा पाणी पितो. हे पाणी पिण्याची योग्य पद्धत नसल्याचं वडीलधाऱ्या लोकांनी सांगितलं असेल. पण उभं राहून पाणी पिण्याची पद्धत का चुकीची?(Do you drink water while standing? Here's why its dangerous for Health).
पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?
- बसून पाणी पिणं उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे पचनक्रिया सुधारते. याशिवाय पाणी सिप करून प्यावे. यामुळे पाणी शरीरात योग्य पद्धतीने पोहोचते.
यंदा दिवाळीच्या स्पेशल साड्यांवर शिवा पफ बाह्यांचे ‘असे’ ब्लाऊज, ७ डिझाइन्स नव्या फॅशनचे
उभं राहून पाणी पिण्याचे नुकसान
- द हेल्थसाईट. कॉम या वेबसाईटनुसार, उभं राहून पाणी प्यायल्याने पाणी थेट पोटात पोहचते. ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. आणि पचनक्रिया विस्कळीत होते. यासह गॅस्ट्रिक ॲसिडची समस्याही निर्माण होऊ शकते. ज्यामुळे पोटात जळजळ आणि अपचन होते.
- उभं राहून पाणी प्यायल्याने किडनीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आरामात बसून पाणी प्या. जर मूत्रपिंडाला हानी पोहचू नये असे वाटत असेल तर, बसून पाणी प्या.
- जर आपल्याला कंबरदुखी आणि सांधेदुखीचा त्रास असेल तर, उभं राहून पाणी पिणं टाळा. उभं राहून पाणी प्यायल्यानं, सांध्यांवर अतिरिक्त दबाव पडतो. ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो बसून, आरामात पाणी प्या.
- जर आपल्याला फुफ्फुसांच्या संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर, उभं राहून पाणी पिणे टाळा. यामुळे ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो. ज्याचा थेट दुष्परिणाम फुफ्फुसांवर आणि हृदयाच्या आरोग्यावर होतो.
- उभं राहून पाणी प्यायल्यानं तहान भागत नाही. सतत पाणी पिण्याची इच्छा होत राहते. जर आपल्याला वारंवार पाणी पिण्याची समस्या असेल तर, उभं राहून पाणी पिणं टाळा.