Lokmat Sakhi >Health > सुकामेवा आणि ताकद वाढवणारे लाडू खाऊन वजन वाढतं का? पोटात आग-पित्त वाढले तर..

सुकामेवा आणि ताकद वाढवणारे लाडू खाऊन वजन वाढतं का? पोटात आग-पित्त वाढले तर..

हिवाळ्यात घरोघर लाडू केले जातात, पण ते खाऊन ताकद वाढण्यापेक्षा त्रासच वाढण्याचा अनेकांना अनुभव येतो. नक्की चुकतं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2023 03:47 PM2023-11-25T15:47:04+5:302023-11-25T16:51:07+5:30

हिवाळ्यात घरोघर लाडू केले जातात, पण ते खाऊन ताकद वाढण्यापेक्षा त्रासच वाढण्याचा अनेकांना अनुभव येतो. नक्की चुकतं काय?

Does eating dry fruits and energy boosting ladoo in winter lead to weight gain? acidity, constipation? | सुकामेवा आणि ताकद वाढवणारे लाडू खाऊन वजन वाढतं का? पोटात आग-पित्त वाढले तर..

सुकामेवा आणि ताकद वाढवणारे लाडू खाऊन वजन वाढतं का? पोटात आग-पित्त वाढले तर..

Highlightsखाऊन बसून राहू नका. व्यायाम करा. हालचाल वाढवा, लाडू पचवा.

दिवाळीचा किराणा भरताना थोडा थोडा आणलेला सुकामेवा. दिवाळनंतरच्या महिन्यात मात्र पुढे सरकतो. लाडवाचं सामान भरलं जातं. घरोघरी एकमेकांना प्रश्न विचारला जातो की लाडू केले का? सुकामेव्याचे, डिंकाचे लाडू थंडीत खाल्ले की तब्येत चांगली राहते ही आपली परंपरा. लाडवाचं सामानही मग दळून आणलं जातं.  खारीक- खोबरं दळून आणतात.  काहीजण उडदाच्या डाळीचे पीठ लाडूंमध्ये घालतात. कुणी १५ दिवस मेथ्या तुपात भिजवून ठेवतात. मेथ्याचे लाडू हवे पण मेथ्यांचा कडूपणा कमी केला जातो. वर्षाला मेथ्याचे, डिंकाचे लाडू करणं म्हणजे मोठा सोहळाच. आणि यासोहळ्यात आघाडीवर कोण तर महिला? लाडू करायचा उत्साह फार, पण रोज नेमानं एक लाडू तुम्ही खाता का असं विचारलं तर हजार कारणं सांगतात. 

(Image :google)

बायकांनी सुकामेवा खाऊ नये असा काही नियम नाही. पण त्या वजनाचं रडगाणं गातात आणि स्वत:ला पाेषणापासून वंचित ठेवतात. पोषण नाही, हिमोग्लोबिन कमी, पाठ दुखते, कंबर दु खते अशा सगळ्या हजार तक्रारी असतात. आणि एक समजही की घरच्यांनी खाल्लं ना मग माझं पोट भरलं. पण आपलं आजारपण आपल्यालाच काढावं लागतं हे त्या विसरतात. 
आणि मग आजार मागे लागतात. 


(Image :google)

महिलांनी खायलाच हवा सुकामेवा कारण आहारतज्ज्ञ वैशाली सोनवणे सांगतात..

१. एक छोटासा डिंकाचा लाडू, मेथ्याचा लाडू खा. लाडवाचा आकार लहान करा.
२. भिजवून बदाम, अंजीर, मनूका खा.
३. लाडू करतानाही काळया मनुका, खजूर, अंजीर,खारीक यांचं प्रमाण जास्त ठेवा.
४. हाडं ठणकत असतील तर तीळ, अळशी, उडीद, खोबरं यांचंही प्रमाण वाढवा.

५. डिंक जरा जपून, नीट तळून ‌थोडा घाला. संडासला त्रास होत असेल तर जपून खा.
६ हाडं ठिसूळ असतील , कॅल्शियम कमी असेल तर तीळ, खोबरं,उडीद,गहू यांचं प्रमाण जास्त घ्यावं
७. गायीचं तूप शक्यतो वापरा.
८. लाडू लहान खा. पोट साफ होते आहे ना याकडे लक्ष द्या.
९. खाऊन बसून राहू नका. व्यायाम करा. हालचाल वाढवा, लाडू पचवा.

 

Web Title: Does eating dry fruits and energy boosting ladoo in winter lead to weight gain? acidity, constipation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.