Lokmat Sakhi >Health > तुम्हालाही जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय आहे का ? थांबा.. जेवणे व झोपणे यात असावे अंतर...

तुम्हालाही जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय आहे का ? थांबा.. जेवणे व झोपणे यात असावे अंतर...

Do you gain weight by sleeping after eating lunch or diner ? : जेवल्यानंतर लगेच झोपी जाण्याची ही सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे की वाईट ? त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2023 06:58 PM2023-10-04T18:58:01+5:302023-10-04T19:14:30+5:30

Do you gain weight by sleeping after eating lunch or diner ? : जेवल्यानंतर लगेच झोपी जाण्याची ही सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे की वाईट ? त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो ?

Does sleeping after eating make you gain weight, Does sleeping after a meal lead to weight gain. | तुम्हालाही जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय आहे का ? थांबा.. जेवणे व झोपणे यात असावे अंतर...

तुम्हालाही जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय आहे का ? थांबा.. जेवणे व झोपणे यात असावे अंतर...

दुपारी जेवणानंतर खूप छान झोप येते असे अनेकांचे म्हणणे असते. दुपारी मस्त जेवणावर ताव मारून झोपणे म्हणजे स्वर्गसुखच ! दुपारच्या झोपेपासून अनेकजण स्वत:ला रोखू शकत नाही. अनेक व्यक्तींना दुपारी जेवण झाल्यानंतर झोपण्याची सवय असते, झोप ही निरोगी आरोग्यासाठी अत्यावश्यक तर आहेच. हेल्दी लाईफस्टाइलसाठी चांगला आहार आणि भरपूर झोप आवश्यक असते. जेवल्यानंतर लगेच झोपू नये असे वडिलधारे लोक नेहमी सांगतात. परंतु, सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत लोक रात्री उशिरा घरी परततात आणि सकाळी लवकर निघतात. त्यामुळे झोप पूर्ण करण्याच्या प्रयत्नात ते जेवण केल्यानंतर लगेच झोपी जातात(Do You Get Fat if You Sleep After Eating?).

जेवल्यानंतर लगेच झोपी जाण्याची ही सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे की वाईट ? (Does sleeping after a meal lead to weight gain?) तुम्ही वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहात, परंतु तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपलात तर तुमचे वजन कमी होऊ शकत नाही. जेवल्यानंतर झोपण्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो का? याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी जेवल्यानंतर लगेच झोपी जाण्याची ही सवय चांगली आहे का वाईट ? याबद्दल अधिक माहिती दिली आहे(experts explains why heading to bed immediately after dinner or lunch can make you fat). 

जेवल्यानंतर लगेच झोपणे कितपत योग्य आहे ?

तज्ज्ञांच्या मते, जेवल्यानंतर लगेच झोप येणे किंवा झोपी जाणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. आयुर्वेदानुसार, आपल्या शरीरात वात, पित्त आणि कफ असे तीन दोष सांगितले आहेत. या तिन्ही दोषांमध्ये असंतुलन असल्यास अनेक रोग होऊ शकतात. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने शरीरातील कफ आणि चरबीचे प्रमाण अधिक जास्त वाढते. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या पचनक्रियेचा वेग मंदावतो, त्यामुळे अन्नाचे पचन मंद होते आणि पोटभर जेवून लगेच झोपल्यास अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. एवढेच नाही तर त्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटी होऊ शकते. जर आपण जेवल्यानंतर लगेच झोपलात तर  झोपेच्या दरम्यान आपल्याला छातीत जळजळ होऊ शकते आणि यामुळे आपली झोप खंडित होऊ शकते. कारण अन्न नीट पचले नाही तर पोटात जळजळ आणि आम्लपित्त वाढू शकते. जेवल्यानंतर झोपल्यानेही लठ्ठपणा वाढतो कारण या दरम्यान आपल्या शरीराला कॅलरीज बर्न करायला वेळ मिळत नाही.

मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...

व्यायाम केला तर चेहऱ्यावर चकचकीत ग्लो येतो हे खरं की खोटं ? तज्ज्ञ सांगतात...

जेवणे आणि झोपणे यात नेमके किती तासांचे अंतर असावे ? 

तज्ज्ञांच्या मते खाणे आणि झोपणे यामध्ये किमान ३ तासांचे अंतर असावे. विशेषतः, जर आपण हेव्ही म्हणजेच जास्तच तिखट, तेलकट, मसालेदार अन्न खाल्ले असेल तर ३ तासांपूर्वी अजिबात झोपू नका. जेवल्यानंतर काही वेळ वज्रासनात बसावे, त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. याचबरोबर रात्रीचे जेवण जास्त हेव्ही  घेऊ नका.

Web Title: Does sleeping after eating make you gain weight, Does sleeping after a meal lead to weight gain.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.