Lokmat Sakhi >Health > कांदा-लसूण- कोबी खाल्ले की पोटात गुडगुड होतं? तज्ज्ञ सांगतात, ५ उपाय-गॅसेसचा त्रास कमी

कांदा-लसूण- कोबी खाल्ले की पोटात गुडगुड होतं? तज्ज्ञ सांगतात, ५ उपाय-गॅसेसचा त्रास कमी

Easy Remedies for Gases Problem : आहारातील कोणत्या घटकांमुळे आपल्याला गॅसेसची समस्या उद्भवते याविषयी आहारतज्ज्ञ सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2023 10:12 AM2023-03-28T10:12:50+5:302023-03-28T14:06:22+5:30

Easy Remedies for Gases Problem : आहारातील कोणत्या घटकांमुळे आपल्याला गॅसेसची समस्या उद्भवते याविषयी आहारतज्ज्ञ सांगतात...

Easy Remedies for Gases Problem : Did you eat cabbage, onion-garlic ? Experts say, 5 easy ways to get rid of gas... | कांदा-लसूण- कोबी खाल्ले की पोटात गुडगुड होतं? तज्ज्ञ सांगतात, ५ उपाय-गॅसेसचा त्रास कमी

कांदा-लसूण- कोबी खाल्ले की पोटात गुडगुड होतं? तज्ज्ञ सांगतात, ५ उपाय-गॅसेसचा त्रास कमी

गॅसेस ही अशी समस्या आहे की जी कोणाला सांगता येत नाही आणि लपवूनही ठेवता येत नाही. आपल्या आहारात असे काही पदार्थ असतात ज्यामुळे पोट फुगणे, गॅसेस होणे अशा समस्या निर्माण होतात. एकदा गॅसेसचा त्रास सुरू झाला की आपल्याला काही सुधरत नाही. अनेकदा हे गॅसेस शरीराच्या बाहेर न पडता पोटात किंवा छातीत फिरत राहतात आणि मग आपल्याला अस्वस्थ होते आणि पोटात कळा येतात. अशावेळी आपण गॅस ढेकरच्या माध्यमातून बाहेर पडावा यासाठी सोडा किंवा तत्सम पेय घेतो आणि गॅस मोकळा होण्यासाठी प्रयत्न करतो. अगदीच नाही तर डॉक्टरांकडे जाऊन यासाठी औषधही घेतो (Easy Remedies for Gases Problem). 

गॅसेस, अॅसिडीटी, अपचन या एकामागे एक येणाऱ्या समस्या आहेत. त्यासाठी जीवनशैलीत बदल करणे सर्वात उत्तम. योग्य आणि समतोल आहार घेणे, नियमित व्यायाम करणे यांमुळे अपचन किंवा गॅसेसचा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा आपल्या आहारातील कोणत्या घटकांमुळे आपल्याला गॅसेसची समस्या उद्भवते याविषयी सांगतात. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये पदार्थांची यादी देतानाच गॅसेसच्या समस्येसाठी ५ सोपे उपायही त्या शेअर करतात. हे उपाय कोणते याबाबत समजून घेऊया...

(Image : Google)
(Image : Google)

कोणत्या पदार्थांमुळे गॅसेस होतात...

१. बिन्स - फरसबी 

२. कोबी-फ्लॉवर

३. कांदा-लसूण

४. कोल्ड्रींक

५. राजमा किंवा छोले यांसारखी कडधान्ये

६. कच्च्या भाज्या - सॅलेड

उपाय काय? 

१. आहारात सोडीयम जास्त प्रमाणात घेत असाल तरी गॅसेस होतात. त्यामुळे सोडीयम म्हणजेच मीठ आणि पॅकेज फूडचे प्रमाण कमी करावे.

२. जेवणानंतर अर्धा तासाने बडीशोप, जीरे आणि ओवा यांचे पाणी प्यावे. यामुळे गॅसेसचा त्रास निश्चितच कमी होतो. 

३. आपण अनेकदा घाईत किंवा कामाच्या नादात खूप वेगाने खातो. मात्र तसे न करता शांतपणे आणि व्यवस्थित चावून अन्न खायला हवे. यामुळे गॅसेसचा त्रास नक्की कमी होऊ शकतो. 

४. जास्तीत जास्त पाणी आणि द्रव पदार्थांचा आहारात समावेश ठेवावा. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होते आणि पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर आराम मिळू शकतो. 

५. सकाळी उठल्यावर धण्याचे पाणी प्या. यामुळे शरीरातील अनावश्यक सोडीयम निघून जाईल आणि शरीरात पाणी टिकून राहण्यास मदत होईल. यामुळे गॅसेसची समस्या आपोआपच कमी होईल. 

 

 

 


  

 

Web Title: Easy Remedies for Gases Problem : Did you eat cabbage, onion-garlic ? Experts say, 5 easy ways to get rid of gas...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.