दात पिवळे झाले (Teeth care tips at home)असतील तर आपला आत्मविश्वासही कमी होतो. कारण चारचौघात हसताना किंवा बोलताना दात पिवळे दिसून आले तर अवघडल्यासारखं वाटतं. ब्रश केल्यानंतरही दातांचा पिवळेपणा निघत नाही. अनेकदा मनमोकळेपणाही हसणंही कठीण होते. (How to Naturally Whiten Your Teeth at Home) दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय केले तर आठवड्याभरातच दातांचा पिवळेपणा निघालेला दिसेल. (Oral Health Tips)
डेंटिस्टकडे जाऊन दात स्वच्छ करण्यासाठी जवळपास ५ ते १० हजार खर्च होतात. (Pivle dat pandhare karnyache upay) हे टाळण्यासाठी रोजच्यारोज दातांची काळजी घ्यायला हवी. (Teeth Whitening Tips) जसं की काहीही खाल्लं की ब्रश करा. बाहेर असाल तर कमीत कमी २ वेळा चूळ भरा. रात्री झोपण्याआधी ब्रश करा आणि दातांना इजा होणार नाही अशी टुथब्रश निवडा.
पिवळ्या दातांना चमकवण्याचे उपाय
1) तुळशीची पानं
तुळशीची पानं उन्हात सुकवण्यासाठी ठेवा. ही पानं सुकल्यानंतर बारीक पावडर बनवून घ्या आणि ही पावडर टूथपेस्टमध्ये मिसळून दिवसातून २ ते ३ वेळा ब्रश करा. तुळशीतील प्राकृतिक ब्लिचिंग गुण कमीत कमी ७ दिवसांत दातांना पांढरेशुभ्र बनवतात.
बारीक व्हायचंय पण डाएट नको वाटतं? जेवणात 'ही' डाळ खा; भराभर घटेल पोटाची चरबी-स्लिम दिसाल
2) कडुलिंबाची काडी
कडुलिंबाच्या काड्या दातांना लावणं हा अत्यंत पारंपारीक उपाय आहे. यात अनेक औषधी गुणधर्म असतात जे टुथपेस्टमध्येही दिसून येत नाही. जिवाणूविरोधी आणि सूजविरोधी गुणधर्म असल्यामुळे दातांचा पिवळेपणा दूर करण्यास मदत होते. हिरड्यासुद्धा मजबूत राहतात आणि बॅक्टेरिया दूर होतात. पाण्यात बुडवलेल्या मऊ कडुलिंबाच्या काड्यांचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी करा.
3) लिंबू आणि संत्र्याचे साल
दात स्वच्छ आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही लिंबू आणि संत्र्याचे साल वापरू शकता. या सालीने रगडून दात स्वच्छ करा. यामुळे दातांवरील खाद्यपदार्थांमुळे आलेला चिकट थर निघून जाईल आणि पांढरेशुभ्र दात होतील. तुम्ही या सालीची पावडर करून या पावडरनेही दात घासू शकता.
कॅल्शियम हवं पण दूध-दही आवडत नाही? ५ पदार्थ खा- कॅल्शियम मिळेल भरपूर, फॅक्चरचा टळेल धोका
4) बेकिंग सोडा
दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी चुटकीभर बेकिंग सोडा फायदेशीर ठरू शकतो. यामुळे दातांवर जमा झालेला पिवळा थर निघेल. ही क्रिया तुम्ही आठवड्यातून २ वेळा करू शकता.