Lokmat Sakhi >Health > दीर्घायुष्यासाठी दररोज किती फळे आणि भाज्या खाव्यात? संशोधन सांगते, धडधाकट तब्येत हवी असेल तर..

दीर्घायुष्यासाठी दररोज किती फळे आणि भाज्या खाव्यात? संशोधन सांगते, धडधाकट तब्येत हवी असेल तर..

Eat fruit and vegetables, live longer : निरोगी राहण्यासाठी नियमित 'इतके' फळे आणि भाज्या खा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 08:13 PM2024-10-10T20:13:40+5:302024-10-10T20:15:03+5:30

Eat fruit and vegetables, live longer : निरोगी राहण्यासाठी नियमित 'इतके' फळे आणि भाज्या खा..

Eat fruit and vegetables, live longer | दीर्घायुष्यासाठी दररोज किती फळे आणि भाज्या खाव्यात? संशोधन सांगते, धडधाकट तब्येत हवी असेल तर..

दीर्घायुष्यासाठी दररोज किती फळे आणि भाज्या खाव्यात? संशोधन सांगते, धडधाकट तब्येत हवी असेल तर..

दीर्घायुष्यासाठी (Live Longer) काय खावे? जीवनशैलीत कोणते बदल केले पाहिजे? असा प्रश्न साहजिक तुमच्याही मनात आला असेल (Health Tips). आजकाल लोकांना इन्स्टंट गोष्टी हव्या असतात. फास्ट फूडपासून ते इन्स्टंट गोष्टींपर्यंत; याचा थेट दुष्परिणाम आरोग्याला सहन करावा लागतो (Health Care). मुख्य म्हणजे फास्ट फूडमुळे वजन वाढते आणि गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. गंभीर आजार शरीराभोवती घेराव घालतात. जर आपल्याला आरोग्यदायी आयुष्य जगायचं असेल तर, जीवनशैलीत काही बदल करणं गरजेचं आहे.

अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, जे लोक दररोज पाच फळे आणि भाज्या खातात. ते हेल्दी पदार्थ न खाणाऱ्या लोकांपेक्षा तीन वर्षे जास्त जगतात. इम्पीरियल कॉलेज लंडनच्या एका अभ्यासात असेही दिसून आले आहे की, दररोज १० फळे आणि भाज्या खाल्ल्याने अकाली मृत्यूचा धोका ३१ टक्क्यांनी कमी होतो(Eat fruit and vegetables, live longer).

ब्लू झोनमध्ये १०० वर्षे जगणारे लोक काय खातात?

ब्लू झोन भागात राहणारे लोक, जे १०० वर्षांहून अधिक जगतात. हे लोक त्यांच्या जीवनात ९०-९५ टक्के हेल्दी आणि मातीत उगवणारे पदार्थ खातात. त्यामुळे आहारात बीन्स, हिरव्या भाज्या, धान्ये आणि ड्रायफ्रुट्स असावे.

कितीही खाल्लं तरी शरीर हाडकुळं? रोज खा ४ पैकी १ पदार्थ; निरोगी वजन वाढवण्यासाठी सोपा उपाय

फळे आणि भाज्या हेल्दी ठेवतात

जे लोक जास्त काळ जगतात त्यांच्या खाण्यावर आणि निरोगी आहारावर बरेच संशोधन झाले आहे.  यूएस कृषी विभागाच्या मते, १४ % पेक्षा कमी अमेरिकन दररोज पुरेशा प्रमाणात फळे आणि भाज्या खातात. जे लोक जास्त फळे आणि भाज्या खातात,  जास्त काळ जगतात. त्यांच्यामध्ये गंभीर आजारांचा धोका कमी असतो.

दररोज किती फळे आणि भाज्या खाव्यात

अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, 'जे लोक पाच फळे आणि भाज्या खातात, ते अनहेल्दी पदार्थ खाणाऱ्या लोकांपेक्षा तीन वर्षे जास्त जगतात. न्यूट्रिशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, जर लोकांनी ५० टक्के भाज्या आणि फळांवर खर्च केला तर, नक्कीच याचा फायदा आरोग्याला होईल.

जान्हवी कपूरसारखा फिटनेस आणि फिगर हवी? कॉफीमध्ये १ सोनेरी गोष्ट मिसळून रोज प्या; मेंदूलाही मिळेल चालना

गंभीर आजारांचा धोका कमी

फळे आणि भाज्या फक्त आयुष्य वाढवत नाही तर, गंभीर आजारांचा धोकाही कमी करतात. नियमित फळे आणि भाज्या खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका १६%, कर्करोगाचा धोका ४% आणि अकाली मृत्यू होण्याचाही धोका कमी होतो. आपण कोणतीही ७ फळे आणि भाज्या खाऊ शकता. पण सात ही मर्यादा नाही. आपण जितकी जास्त फळे आणि भाज्या खाल तितके जास्त फायदे शरीराला मिळतील. 

Web Title: Eat fruit and vegetables, live longer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.