Lokmat Sakhi >Health > ब्लड सर्क्युलेशन कायम उत्तम राहण्यासाठी आहारात हव्या ४ गोष्टी, रक्तदाबही ठेवा नियंत्रणात

ब्लड सर्क्युलेशन कायम उत्तम राहण्यासाठी आहारात हव्या ४ गोष्टी, रक्तदाबही ठेवा नियंत्रणात

Eat these foods to enhance blood circulation in your body आपलं ब्लड प्रेशर वाढल्यावर उपाय करण्यापेक्षा आधीच आहार सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 05:20 PM2023-08-11T17:20:01+5:302023-08-11T17:25:23+5:30

Eat these foods to enhance blood circulation in your body आपलं ब्लड प्रेशर वाढल्यावर उपाय करण्यापेक्षा आधीच आहार सांभाळा

Eat these foods to enhance blood circulation in your body | ब्लड सर्क्युलेशन कायम उत्तम राहण्यासाठी आहारात हव्या ४ गोष्टी, रक्तदाबही ठेवा नियंत्रणात

ब्लड सर्क्युलेशन कायम उत्तम राहण्यासाठी आहारात हव्या ४ गोष्टी, रक्तदाबही ठेवा नियंत्रणात

मानवी शरीराची रचना ही खरंच अद्भुत आहे. अगदी छोट्या गोष्टीही एकमेकांशी जोडलेल्या असतात. शरीराच्या कोणत्याही भागात समस्या असल्यास त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो. उत्तम आरोग्य यासह दिवसभर काम करण्याची उर्जा मिळावी, यासाठी रक्ताभिसरण सुरळीत सुरू राहणे अत्यंत गरजेचं आहे. जर ब्लड सर्क्युलेशनमध्ये काही अडथळे येत असतील तर, हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो.

यासंदर्भात, हेल्थ शॉट्स या वेबसाईटला माहिती देताना सीनियर कन्सल्टंट क्लिनिकल हेमॅटोलॉजिस्ट, डॉ विजय रामनन सांगतात, ''बिघडलेल्या जीवनशैलीत काही बदल करणे अत्यंत गरजेचं आहे. ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणावर वाईट परिणाम होतो. स्ट्रेस, धुम्रपान, तळलेले पदार्थ खाणे, या गोष्टी टाळायला हव्या. यामुळे शरीरात सुन्नपणा, सूज येणे, रक्तदाब, वजन वाढणे, मधुमेह यांसारख्या समस्या वाढतात. त्यामुळे खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यायला हवी.'' ब्लड सर्क्युलेशन सुरळीत राहावे यासाठी कोणते पदार्थ खावे हे पाहूयात(Eat these foods to enhance blood circulation in your body).

टोमॅटो

जेवणाची रंगत वाढवण्यासाठी आपण टोमॅटोचा वापर करतो. टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते, जे हृदयासाठी चांगले मानले जाते. त्याच वेळी, यामध्ये असलेले व्हिटॅमिन के रक्त परिसंचरण सुधारते.

सुकामेवा

आपल्या रोजच्या आहारात बदाम - अक्रोडसारख्या सुक्या मेव्यांचा समावेश करा. यामध्ये असलेले ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. व रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मदत करतात. त्यात अनसॅच्युरेटेड फॅट्स आढळते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

खूप जड जेवण झाल्यावर पोटात गुडगुड, अपचनाचा त्रास होतो? जेवताना होणारी १ चूक टाळा

भाज्या खा

खराब रक्ताभिसरणाची समस्या टाळण्यासाठी बीटरूट, लसूण व्यतिरिक्त, पालेभाज्या खा. यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी खूप मदत होते. यासह आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ

व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ जसे की, लिंबू, संत्री यांचा आहारात समावेश करा. यामुळे रक्ताभिसरणात काही अडचण येत नाही. व काम करण्याची उर्जा मिळते.

१ महिनाभर चपाती खाणं पूर्णपणे बंद केलं तर काय होईल? तज्ज्ञ सांगतात, काय काय बदलेल..

या गोष्टी लक्षात ठेवा

रक्ताभिसरण सुरळीत राहण्यासाठी शरीराची काळजी घ्यायला हवी. यासाठी आहारामध्ये बदल करणे आवश्यक आहे, तसेच योगासना आणि व्यायाम नियमित करा. ज्यामुळे शरीरातील रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत होईल.

Web Title: Eat these foods to enhance blood circulation in your body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.