Lokmat Sakhi >Health > वजन कमी व्हावे म्हणून उपवासाला फक्त फळच खाता? डॉक्टर सांगतात, हे योग्य का अयोग्य...

वजन कमी व्हावे म्हणून उपवासाला फक्त फळच खाता? डॉक्टर सांगतात, हे योग्य का अयोग्य...

Eating only fruit during fasting to lose weight : Eating only fruit during fasting can lead to weight loss : What happens if you eat fruit while fasting : वजन कमी करण्यासाठी अनेकजण उपवासाला फक्त फळचं खातात हे चूक की बरोबर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2024 08:01 PM2024-10-03T20:01:57+5:302024-10-03T20:15:33+5:30

Eating only fruit during fasting to lose weight : Eating only fruit during fasting can lead to weight loss : What happens if you eat fruit while fasting : वजन कमी करण्यासाठी अनेकजण उपवासाला फक्त फळचं खातात हे चूक की बरोबर...

Eating only fruit during fasting to lose weight Eating only fruit during fasting can lead to weight loss What happens if you eat fruit while fasting | वजन कमी व्हावे म्हणून उपवासाला फक्त फळच खाता? डॉक्टर सांगतात, हे योग्य का अयोग्य...

वजन कमी व्हावे म्हणून उपवासाला फक्त फळच खाता? डॉक्टर सांगतात, हे योग्य का अयोग्य...

नवरात्रीच्या सणाला सुरुवात झाली आहे यानिमित्त अनेकजण उपवास करतात. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांचे अनेक प्रकार असतात. काहीजण संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात तर काही पहिल्या आणि शेवटच्या अशा दोनच दिवशी उपवास करतात. याचबरोबर बरेचजण आपले वाढलेले वजन कमी व्हावे यासाठी उपवास करतात. नवरात्रीचे नऊ दिवस उपवास केल्याने आपले वजन कमी होईल असा कित्येकांचा समज असतो. यासाठीच वजन कमी करण्याच्या हेतूने अनेकजण उपवास करतात(Eating only fruit during fasting to lose weight).

वजन कमी करण्यासाठी उपवास करणाऱ्यांपैकी अनेकजण उपवासाला फक्त फळचं खातात. आपण दिवसभर उपाशी राहून फक्त नऊ दिवस फळचं खाल्ली तर आपले वजन झपाट्याने कमी होईल, असा विचार करून काहीजण उपवासाला दिवसदिवसभर काहीच खात - पित नाहीत. खरंच उपवसा दरम्यान असे काही न खाता उपाशी राहिल्याने वजन कमी होते का ? किंवा उपवासाला फक्त फळचं खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते का ? वजन कमी करण्यासाठी उपवासाला फक्त फळचं खाणे कितपत योग्य आहे? या सगळ्या प्रश्नांबाबत अधिक माहिती घेऊयात. दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयातील आहारतज्ज्ञ मनीषा वर्मा उपवास आणि उपवासा दरम्यान काय आणि कितीवेळा खावे याबद्दल अधिक माहिती देत आहेत(Eating only fruit during fasting can lead to weight loss).

वजन कमी करण्यासाठी उपवासाला फक्त फळंच खाताय ?

दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयातील आहारतज्ज्ञ मनीषा वर्मा सांगतात की, उपवासाने आपले शरीर शुद्ध होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. याचबरोबर मनही शांत होते आणि शरीराच्या अवयवांनाही आराम मिळतो. उपवास केल्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे होत असले तरीही तो उपवास योग्य पद्धतीनेच केला पाहिजे. उपवास करताना पूर्णवेळ उपाशी न राहता अमुक एका ठराविक वेळेनंतर काहीतरी खाणे गरजेचे असतेच. याचबरोबर त्या सांगतात की, आपल्या शरीराला दररोज पोषणाची गरज असते. जर आपण दिवसांतील खूप जास्तवेळ काही न खाता तसेच उपाशी राहिलात तर शरीरात आधीच साठवून ठेवलेली ऊर्जा आणि पोषक तत्व वापरली जातात. यामुळे आपल्या शरीरात साठवून ठेवलेली ऊर्जा आणि पोषक तत्व यांचा वापर झाल्यानंतर आपल्या शरीरात काहीच न उरल्याने आपल्या अशक्तपणा, थकवा येऊ शकतो. अशा परिस्थितीत, उपवासाच्या दिवशी, हायड्रेटेड राहण्यासाठी फळे, सुका मेवा आणि पेये पिणे आवश्यक आहे.    

नवरात्र उपवास स्पेशल : प्या ‘ही’ उपवास स्मूदी-पोटही भरेल आणि डिहायड्रेशनही होणार नाही...

 आरोग्याच्या दृष्टिकोनातून, दिवसभरात अमुक एका वेळानंतर थोडे - थोडे खाणे चांगले मानले जाते. जर तुम्ही उपवासा दरम्यान दिवसातून फक्त दोनदाच खात असाल तर या दोन खाण्याच्या मध्ये थोडेसे खाणे गरजेचे आहे. या दोन खाण्याच्या मध्ये आपण दही, ताक, फळांचे ज्यूस असे लिक्विड पदार्थ घेऊ शकता. यासोबतच काजू, बदाम, शेंगदाणे किंवा अक्रोड यांसारखे काही ड्रायफ्रूट्स देखील मध्ये खाऊ शकतात. उपवासा दरम्यान भरपूर पाणी पिऊन स्वतःला कायम हायड्रेटेड ठेवा. 

उपवास सोडताना एकदम एकाचवेळी खाणे योग्य की अयोग्य ? 

काहीजण दिवसभर उपवास करतात आणि उपवास सोडताना एकदम एकाचवेळी भरपूर जेवण जेवतात, हे चुकीचे आहे. जर तुम्हाला असे करायचेच असेल तर सकाळपासून उपाशी असल्यास उपवास सोडताना खूप कमी अन्न खावे किंवा फळं खाऊन उपवास सोडावा. याचबरोबर खूप तेलकट, मसालेदार किंवा जास्त गोड पदार्थ खाऊ नका, यामुळे तुम्हाला अपचन, अ‍ॅसिडिटी यांसारख्या पोटाच्या इतर समस्या उद्भवू शकतात. 

नवरात्र स्पेशल : राजगिऱ्याचा हलवा करा फक्त १० मिनिटांत, १ कप पिठाचा पोटभर खाऊ!

दिवसभर उपाशी राहिल्याने वजन कमी होते का ? 

आहारतज्ज्ञ सांगतात की, जे लोक दिवसभर उपाशी राहून संध्याकाळी तेलकट व मसालेदार पदार्थ खातात त्यांचे वजन कमी होण्याऐवजी वाढतेच. याउलट, जर तुम्ही दिवसभरातून थोड्या थोड्या वेळाने थोडे खात राहिलात तर असे अन्न पचवायला शरीराला देखील ऊर्जेची गरज असते. यामुळेच आपल्या शरीरातील ऊर्जा अन्नपदार्थ पचवण्यासाठी देखील खर्ची केली जाते, यामुळे वजन वाढत नाही. उपवास सोडताना जर एकदम एकाचवेळी भरपूर प्रमाणात खाल्ले तर पचनक्रिया बिघडते व अन्न पचवण्यात अनेक अडचणी येतात, यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. 

आरोग्यतज्ज्ञांच्यामते, उपवास केवळ धार्मिक भावनांसाठी नसून त्याचा आरोग्यावर खोलवर परिणाम होतो, अशा परिस्थितीत उपवास करताना खाण्याच्या सवयींबाबत योग्य दृष्टीकोन अवलंबणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून मन आणि शरीर दोघांनाही व्रताचे पुरेसे परिणाम मिळू शकतील.

Web Title: Eating only fruit during fasting to lose weight Eating only fruit during fasting can lead to weight loss What happens if you eat fruit while fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.