Lokmat Sakhi >Health > जेवताना पाणी प्यावे की जेवल्यानंतर? आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती, पाहा...

जेवताना पाणी प्यावे की जेवल्यानंतर? आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती, पाहा...

5 Ayurvedic Rules To Drink Water : तुम्ही जेवताना पाणी पित असाल तर त्यासंबंधीत नियमही माहीत असायला हवेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 03:23 PM2023-12-23T15:23:25+5:302023-12-23T15:57:12+5:30

5 Ayurvedic Rules To Drink Water : तुम्ही जेवताना पाणी पित असाल तर त्यासंबंधीत नियमही माहीत असायला हवेत.

Expert Shares 5 Ayurvedic Rules To Drink Water : Right Way To Drink Water According To Ayurveda | जेवताना पाणी प्यावे की जेवल्यानंतर? आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती, पाहा...

जेवताना पाणी प्यावे की जेवल्यानंतर? आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती, पाहा...

जेवल्यानंतर किती वेळ पाणी प्यायचं नाही, किती पाणी प्यावे याबाबत अनेक लोकांच्या मनात अनेक शंका आहे. पण योग्य माहितीच्या अभावामुळे रोज जेवताना चुका होतात. (Rules Of Drinking Water) ज्याचा तब्येतीवरही परिणाम होतो. आयुर्वेदानुसार चांगल्या पचनासाठी पाणी पिणं फार महत्वाचे आहे. पण जेवणाच्या आधी किंवा नंतर पाणी पिणं अपचनाचे कारण ठरू शकते. (Right Way to Drink Water According to Ayurveda)

जेवताना मध्ये मध्ये पाणी पिऊ शकतो का? याबाबत आयुर्वेद तज्ज्ञ वरलक्ष्मी यांनी इंस्टाग्रामवर अधिक माहिती दिली आहे. पाणी पिताना  काही गोष्टीत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असते. जर तुम्ही जेवताना पाणी पित असाल त्यासंबंधीत नियमही माहीत असायला हवेत. (According to Ayurveda When to Drink Water after Meal)

आयुर्वेदानुसार जेवणाबरोबर पाणी पिण्याचे नियम काय आहेत? (Right Time to Drink Water After Meals as Per Ayurveda)

जर तुम्ही जेवणाच्या आधी पाणी पित असाल तर यामुळे पचन रस पातळ होऊ शकतो आणि पचन अग्नी मंद होते. ज्यामुळे अन्नाचे व्यवस्थित  पचन होत नाही आणि शरीरात पोषक तत्वांचा अभाव होतो. या सवयीमुळे वजनही वाढू शकते. जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानं शरीरात कफ वाढणं इतर टॉक्सिन्स तयार होतात ज्यामुळे अतिरिक्त वजन वाढ होते. 

सकाळी वॉक करता तरी पोट कमी होईना? वेट लॉससाठी वॉक करताना खाऊन जायचं की नाही-तज्ज्ञ सांगतात...

पाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती? (Rules for Drinking Water as Per Ayurveda)

तहान लागणं पाणी पिण्याचे मुख्य संकेत आहे. दुसरं म्हणजे एकाचवेळी जास्त पाणी पिणंही चुकीचं आहे. एकाचवेळी भरपूर पाणी पिणं टाळायला हवं. जर तुम्हाला पचनक्रिया चांगली ठेवायची असेल जेवताना २ ते ३ घास घाल्ल्यानंतर तर एक ते दोन घोट पाणी पिऊ शकता. यामुळे जेवण घश्याखाली उतरण्यास मदत होते आणि पचनक्रियाही चांगली राहते. 

नेहमीच घोटून पाणी प्यायला हवे. एकाचवेळी ग्लासभर पाणी पिऊ नये. जेवताना तुम्ही कोमट पाणी प्यायलात तर पचनाचे विकार उद्भवणार नाहीत.  पण कोल्डड्रिंक्स, लस्सी असे पदार्थ पिणं टाळायला हवं. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास  हार्मोनल इंब्लेन्सचे त्रासही उद्भवत नाहीत. 

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन करा. कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होते. दिवसभरात ८ ते १० ग्लास पाण्याचे सेवन करा. डिहायड्रेशन झाल्यास त्वचा कोरडी पडणं, ओठ काळे पडणं, लघवीला  त्रास होणं अशी लक्षणं दिसू शकतात. 

Web Title: Expert Shares 5 Ayurvedic Rules To Drink Water : Right Way To Drink Water According To Ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.