Join us   

..म्हणून अमेरिकेत अचानक वाढली गर्भनिरोधक गोळ्यांना मागणी, गोळ्या घेऊन जीवावर बेतण्याचं भय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 4:27 PM

Abortion Pills in Demand in America after Roe versus Wade Case : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भनिरोधके वापरणे आरोग्यासाठी हानिकारक असले तरी तो सगळ्यात सोपा आणि स्वस्त पर्याय असल्याने अनेक देशांत महिला गर्भनिरोधक गोळ्या सर्रास घेताना दिसतात.

डॉ. वैजयंती पटवर्धन

अमेरिकेत एकाएकी गर्भपात निरोधक गोळ्यांच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली आणि याचे कारण काय असा प्रश्न जगभरात अनेकांना पडला. तर  अमेरिकेसारख्या प्रगत समजल्या जाणाऱ्या देशात नुकताच सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय गर्भपात अवैध ठरवणारा कायदा मंजूर केला. त्यामुळे महिलांनी गर्भधारणा राहिल्यास आणि ती नको असल्यास त्यातून सुटका करुन घेण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात गर्भनिरोधक औषधांची खरेदी केली. (Contraceptive Pills) अशाप्रकारे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भनिरोधके वापरणे आरोग्यासाठी हानिकारक असले तरी तो सगळ्यात सोपा आणि स्वस्त पर्याय असल्याने अनेक देशांत महिला गर्भनिरोधक गोळ्या सर्रास घेताना दिसतात (Abortion Pills in Demand in America after Roe versus Wade Case). 

(Image : Google)

काय आहे या कायद्याची पार्श्वभूमी? 

स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून हा कायदा अत्यंत महत्त्वाचा मानला जाऊ शकतो. भारत चीन यांसारख्या देशांमध्ये वैद्यकीय गर्भपात कायदेशीर आहे. कुटुंबनियोजन हा त्यामागील मूळ हेतू असला तरी स्त्रियांच्या प्रगतीत विशेषतः गरोदरपण आणि त्यापुढील जबाबदाऱ्या या दृष्टीने अशाप्रकारे संतती नियमन करता येणे आवश्यक आहे. भारतात १९७२ पासून हा कायदा लागू करण्यात आला असून २०२१ मध्ये त्यामध्ये काही बदल करण्यात आले. तर अमेरिका १९७३ पासून आपल्या इच्छेप्रमाणे गर्भपात करायला मान्यता असणारा एक देश आहे.

(Image : Google)

म्हणून वाढली गर्भनिरोधक औषधांना मागणी...

आता वैद्यकीय गर्भपात अवैध ठरवल्यानंतर नागरिकांकडे औषधे घेऊन गर्भपात करणे हा एकच सोपा मार्ग शिल्लक उरतो, त्यामुळे हा निर्णय झाल्यानंतर काही तासांत अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांचा विक्रमी खप झाला आणि त्याच्या जगभरात चर्चा झाल्या. स्त्री-पुरुष संबंधांमध्ये नकळत गर्भ राहणे, अनैतिक संबंधांतून राहिलेला गर्भ, लग्नाआधी होणारी गर्भधारणा अशा अनेक कारणांमुळे गर्भधारणा नाकारण्यात येते. गर्भधारणा नको असणे मात्र ठराविक आठवड्यांनंतर गर्भपात करणे कायद्याने अवैध असल्याचा निर्णय अमेरिकन सरकारने नुकताच जाहीर केला. त्यामुळे शस्त्रक्रिया किंवा अन्य वैद्यकीय मार्गाने गर्भपात करता येत नसेल तर गर्भपाताची औषधे घेणे हा सोपा पर्याय असल्याने महिलांनी घाईने गर्भनिरोधक गोळ्यांची खरेदी केली. मात्र अशाप्रकारे वैद्यकीय सल्ल्याशिवाय गोळ्या घेणे महिलांच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. 

(लेखिका पुण्यात प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सप्रेग्नंसीअमेरिकाऔषधं