नको असलेली गर्भधारण रोखण्याासाठी पुरूषांच्या तुलनेत महिलांकडे बरेच पर्याय असतात. पुरूष नसबंदी किंवा कंडोमचा वापर करतात. अलिकडेच वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यानुसार पुरूष आता नवीन मार्गानं बर्थ कंट्रोल करू शकतात. चीनच्या वैज्ञानिकांनी पुरूषांसाठी एक गर्भनिरोधक उपाय शोधला आहे. हा नवीन उपाय सुरक्षित आणि टिकाऊ असल्याचं सांगितलं जात आहे.
अमेरिकन वैज्ञानिक जर्नल नॅनो लेटर्समध्ये वैज्ञानिकांनी नमुद केले की, त्यांनी पुरूषांसाठी रिवर्सिबल चुंबकीय बायोडिग्रडेबल नॅनोमटेरिअल विकसित केलं आहे. कमीत कमी ३० दिवसांपर्यंत याद्वारे गर्भनिरोधकाचं काम केलं जाऊ शकतं. या नवीन पर्यायाचे उंदरांवरील परिक्षण यशस्वी झाल्याचं सांगितलं जात आहे.
तज्ज्ञांच्यामते उच्च तापमानात स्पर्म्स प्रोडक्शन होऊ शकत नाही. म्हणून नर उंदरांच्या बाहेरील त्वचेवर हा प्रयोग करण्यात आला. याआधीची सगळीच संशोधनं नॅनोमटेरिअल्सवर करण्यात आली होती. उंदरांना बर्थ कंट्रोलच्या स्वरूपात इन्जेक्शन देण्यात आले होते. ही प्रकिया वेदनादायक असून त्यामुळे मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला होता. कारण नॅनोमटेरिअल्स बायोडिग्रेडेबल नव्हते.
नवीन संशोधनासाठी तज्ज्ञांनी उत्तम तंत्राचा वापर केला आहे. संशोधकांनी बायोडिग्रेडेबल आयरन नॅनोपार्टिकल्सचे परिक्षण केले. नॅनोपार्टिकलवर पॉलिइथायलीन ग्लायकॉल (PEG) आणि सायट्रिक एसिडचा लेप लावला होता. माणसांवर कोणतीही चाचणी करण्याआधी उंदरांवर ट्रायल करणं गरजेचं असतं.
वैज्ञानिकांनी उंदरांना सायट्रिक एसिडचे नॅनोपार्टिकल्सचे इंजेक्शन अनेकदा दिले. त्यानंतर चुंबकासह परिक्षण करण्यात आले. संपूर्ण प्रयोगानंतर तज्ज्ञांना दिसून आलं की शुक्राणू जवळपास ३० दिवसांसाठी जखडले. नंतर हळूहळू स्पर्मच्या उत्पादनात सुधारणा झाल्याचं दिसून आलं.
६० व्या दिवसानंतर उंदरांमध्ये गर्भधारणेची क्षमता पुन्हा पूर्वरत होऊ लागली. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार नॅनोपार्टिकल्सचा पर्याय हानीकारक नाही. कुटुंब नियोजन करत असलेल्या जोडप्यांसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. जोडपी गरजेनुसार या पर्यायाचा वापर करू शकतात.