Lokmat Sakhi >Health >Family Planning > बर्थ कंट्रोलसाठी उत्तम पर्याय ठरतंय IUD; वाचा प्रकार, वापराची पद्धत अन् फायदे

बर्थ कंट्रोलसाठी उत्तम पर्याय ठरतंय IUD; वाचा प्रकार, वापराची पद्धत अन् फायदे

IUD birth control : तुम्हीसुद्धा बर्थ कंट्रोल पर्यांयांचा शोध घेत असाल तर आईयूडी म्हणजेच इंट्रा यूटेरीन डिवाइस सध्याच्या स्थितीत एक उत्तम गर्भनिरोधक पर्याय मानला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 06:55 PM2021-07-19T18:55:11+5:302021-07-19T19:26:59+5:30

IUD birth control : तुम्हीसुद्धा बर्थ कंट्रोल पर्यांयांचा शोध घेत असाल तर आईयूडी म्हणजेच इंट्रा यूटेरीन डिवाइस सध्याच्या स्थितीत एक उत्तम गर्भनिरोधक पर्याय मानला जात आहे.

IUD birth control : IUD best birth control option for women and know its types | बर्थ कंट्रोलसाठी उत्तम पर्याय ठरतंय IUD; वाचा प्रकार, वापराची पद्धत अन् फायदे

बर्थ कंट्रोलसाठी उत्तम पर्याय ठरतंय IUD; वाचा प्रकार, वापराची पद्धत अन् फायदे

Highlightsकॉपर आययूडीला हार्मोन्सची आवश्यकता नसते आणि जे लोक हार्मोनल गर्भनिरोधक वापरू शकत नाहीत त्यांच्यासाठी वापरणे सुरक्षित आहे.दोन्ही प्रकारचे आययूडी विश्वसनीय आहेत. दोन्ही आययूडी गर्भधारणा रोखण्यात 99% पर्यंत यशस्वी ठरतात..

महिलांना हेल्दी आणि सुखी आयुष्य जगण्यासाठी फॅमिली प्लॅनिंग करणं गरजेचं असतं. तुम्हीसुद्धा बर्थ कंट्रोल पर्यांयांचा शोध घेत असाल तर आययूडी म्हणजेच इंट्रा यूटेरीन डिवाइस सध्याच्या स्थितीत एक उत्तम गर्भनिरोधक पर्याय मानला जात आहे. यामागे अनेक कारणं आहेत. याच्या वापरानं तुम्हाला सतत ओरल कॉन्ट्रासेप्टिव टॅबलेट घेण्याची गरज लागणार नाही. डॉ. कुणाल दोषी (एमबीबीएस, एफसीपीएस, डीजीओ, डीएफपी) यांनी एका वेबसाईडशी बोलताना  आययूडीशी निगडीत महत्वपूर्ण माहिती दिली आहे. 

आययूडी काय आहे?

आययूडी एक टी-आकाराचा इंट्रायूटरिन डिव्हाइस आहे, जो गर्भाशयाच्या आकाराच्या चतुर्थांशपेक्षा जास्त असतो. हे डिव्हाइस गर्भाशयात बसविले जाते आणि ते बाहेरून त्याचे कार्य करते.

आययूडी कसे काम करते?

आययूडी गर्भधारणा रोखण्यास मदत करते. हे शुक्राणू गर्भाशयात पोहोचू देत नाही. त्यामुळे एग्स फर्टिलायजेशन होत नाही. त्यामुळे इंप्लांटेशनची प्रक्रिया होण्याची संभावना कमी नसते. 

आययूडीचे प्रकार

बाजारात दोन प्रकारचे आययूडी उपलब्ध आहेत, एक हार्मोनल आणि दुसरा नॉन-हार्मोनल (कॉपर डिव्हाइस) आययूडी.

हार्मोनल आययूडी

हार्मोनल आययूडी प्रोजेस्टेरोनचे सिंथेटिक वर्जन रिलीज करते. ज्याला प्रोजेस्टिन असं म्हणतात. प्रोजेस्टिनला levonorgestrel  असंही म्हटलं जातं. अनेक बर्थ कंट्रोल पिल्समध्ये या हार्मोनचा वापर केला जातो. प्रोजेस्टिनमुळे सर्विक्समध्ये  म्यूकस वाढण्यास मदत होते. त्यामुळे स्पर्म्स अंड्यापर्यंत पोहोचत नाहीत. 

प्रोजेस्टिन अजून काही प्रकारे काम करतं. ते म्हणजे गर्भाशयाची लाइनिंग पातळ करता येते. त्यामुळे गर्भाशयात  एग इंप्लांट करणं कठीण होतं. त्यामुळे स्पर्म्स गर्भाशयापर्यंत पोहोतच नाहीत. परिणामी एग्स फर्टिलाईज होत नाहीत. हार्मोनल आययूडी ५ वर्षांपर्यंत काम करते. 

कॉपर किंवा नॉन हॉर्मोनल आययूडी

कॉपर आययूडीमध्ये कोणतेही हार्मोन्स वापरले जात नाहीत. त्याऐवजी, तांबे वापरला जातो. ज्यामुळे स्पर्मेटोजोआ डॅमेज होतो आणि अंड्यात पोहोचण्यापासून प्रतिबंधित करता येते. ही पद्धत इंप्लांटेशन रोखण्यास देखील मदत करते. इमरजेंसी कॉन्ट्रासेप्शन आवश्यक असल्यास बरेच डॉक्टर ही पद्धत वापरण्याचा सल्ला देतात. कॉपर आययूडी 3, 5 किंवा 10 वर्षे ठेवतात. यामध्ये तांब्याच्या वेगवेगळ्या रचना वापरल्या जातात.

हार्मोनल आईयूडीजच्या वापराचे फायदे आणि नुकसान

दोन्ही प्रकारचे आययूडी विश्वसनीय आहेत. दोन्ही आययूडी गर्भधारणा रोखण्यात 99% पर्यंत यशस्वी ठरतात. २००१ च्या अभ्यासानुसार, हार्मोनल आययूडी तांबे आययूडीपेक्षा किंचित प्रभावी असल्याचे सिद्ध होते. हे एंडोमेट्रियल कॅन्सरचा धोका कमी करते.

ज्या स्त्रियांना पेल्विक संक्रमण, गर्भाशयाचा कॅन्सर आहे, योनीतून रक्तस्त्राव (ज्याचे कारण माहित नाही) होतो किंवा गर्भाशयाचे विकार असलेल्या स्त्रियांसाठी हार्मोनल आययूडी सुरक्षित नाहीत. घरात ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री असल्यास अशा स्त्रियांना या उपायाचा  सावधगिरीने अवलंब करावा लागतो. 

कॉपर आययूडीचे फायदे

इमरजेंसी कॉन्ट्रासेप्शन 

या प्रकारची आययूडी त्वरित कार्य करण्यास सुरवात करते, म्हणून हा उपाय गर्भनिरोधक म्हणून वापरला जातो.

कोणत्याही हॉर्मोन्सची गरज नसते

कॉपर आययूडीला हार्मोन्सची आवश्यकता नसते आणि जे लोक हार्मोनल गर्भनिरोधक वापरू शकत नाहीत त्यांच्यासाठी वापरणे सुरक्षित आहे. कॉपर आययूडीच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार ते दीर्घकाळ गर्भधारणा रोखण्यास सक्षम असतात.

आययूडी लक्षणीय संरक्षण प्रदान करते. हे प्रभावी, सुरक्षित असून त्याचे कमी दुष्परिणाम आहेत. आपण आययूडी वापरण्याबद्दल विचार करत असल्यास त्याबद्दल आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, जेणेकरून आपण आपल्या गरजेनुसार योग्य आययूडी निवडू शकता.

Web Title: IUD birth control : IUD best birth control option for women and know its types

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.