Lokmat Sakhi >Health > चपाती किंवा भातासोबत १ चमचा ही चटणी खा; कणभरही वजन वाढणार नाही-कोलेस्टेरॉल होईल कमी

चपाती किंवा भातासोबत १ चमचा ही चटणी खा; कणभरही वजन वाढणार नाही-कोलेस्टेरॉल होईल कमी

Flaxseeds Chutney Recipe : जवस तुम्हाला कोणत्याही किराण्याच्या दुकानात सहज मिळतील उरलेलं बेसिक साहित्य प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात असतेच.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 01:53 PM2024-09-26T13:53:47+5:302024-09-26T13:58:32+5:30

Flaxseeds Chutney Recipe : जवस तुम्हाला कोणत्याही किराण्याच्या दुकानात सहज मिळतील उरलेलं बेसिक साहित्य प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात असतेच.

Flaxseeds Chutney Recipe : How To Make Flax Seeds Chutney It Helps Of Weight Loss And Cholesterol Control | चपाती किंवा भातासोबत १ चमचा ही चटणी खा; कणभरही वजन वाढणार नाही-कोलेस्टेरॉल होईल कमी

चपाती किंवा भातासोबत १ चमचा ही चटणी खा; कणभरही वजन वाढणार नाही-कोलेस्टेरॉल होईल कमी

जेवताना तोंडी लावण्यासाठी चटणी (Chutney) खायला अनेकांना आवडते. चटणीमुळे जेवणाला वेगळी चव येते. चपाती असो किंवा वरण भात काही खाल्लं तरी त्यासोबत चटणी उत्तम लागते. जवसाची चटणी चवीला उत्तम असते. (Flaxseeds Chutney Recipe) ही चटणी खाल्ल्यानं फक्त  जेवणाची चव वाढत नाही तर अनेक तब्येतीच्या विकारांपासून बचाव होतो. जवस तुम्हाला कोणत्याही किराण्याच्या दुकानात सहज मिळतील उरलेलं बेसिक साहित्य प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात असतेच. या साहित्याचा वापर करून तुम्ही जवसाची चटणी बनवू शकता. (How To Make Flax Seeds Chutney It Helps Of Weight Loss And Cholesterol Control)

जवसाच्या चटणीसाठी लागणारं साहित्य (How to Make Flax seeds Chutney)

जवस- 1 वाटी

सुकं खोबरं- अर्धी वाटी

घाटी मसाला- 1 चमचा लसूण- ७ ते ८

कढीपत्ता - ९ ते १० पानं

कोथिंबीर- १ चे २ चमचे

जीरं- १ ते २ चमचे

जवसाची चटणी करण्याची सोपी रेसिपी (Recipe Of Flaxseeds Chutney)

सगळ्यात आधी जवस भाजून घ्या नंतर त्यात जीरं भाजून घ्या. नंतर खोबरं  आणि लसूण  भाजून घ्या. धणे आणि कढीपत्ते भाजून घ्या.  हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात भरून मिक्सरमध्ये घाला. नंतर त्यात लाल तिखट घालून मिक्सरमधून वाटून घ्या.  त्यात जीरं आणि मीठ घालू पुन्हा बारीक करून घ्या. तयार चटणी तुम्ही रोजच्या जेवणाबरोबर 1 किंवा 2 चमचे खाऊ शकता. 


जवसाची चटणी खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Flaxseeds Chutney)

1) वजन नियंत्रणात राहतं

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार वेट लॉस मॅनेजमेंटसाठी जवस उत्तम ठरते. जे लोक ओव्हरवेट असतात त्यांच्या वजन कमी करण्यासाठी जवस गुणकारी ठरते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही आळशीच्या बीया भाजून प्रत्येकवेळी जेवताना खाऊ शकता (Ref).  यामुळे  २ फायदे होतील. सगळ्यात आधी यातील प्रोटीनमुळे तुम्हाला भूक लागणार नाही आणि क्रेव्हींग्स कमी होईल. दुसरा फायदा असा की यातील फायबर्स मेटाबॉलिझ्म वाढवतील आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगानं होते. या दोन्ही वस्तू एकत्र करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. 

२) कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते

जर कोलेस्टेरॉल जास्त असेल तर आळशी भाजून एक चमचा सकाळी आणि एक चमचा संध्याकाळी या प्रमाणात खा. या पद्धतीनं खाल्ल्यास कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करण्यास मदत होते. रेग्युलर याचे सेवन केल्यानं एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्टेरॉलचा स्तर कमी होतो. ज्यामुळे ब्लड प्रेशर चांगले राहते आणि हृदयाच्या आजारांपासून बचाव होतो.

पोट लटकलं, मांड्या थुलथुलीत दिसतात? वापरा 5:2 चा वेट लॉस फॉर्म्यूला, वाढलेलं वजन चटकन उतरेल

३) त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

भाजलेल्या आळशीच्या बिया व्हिटामीन ई नं परिपूर्ण असतात. ज्यामुळे स्किन आणि केस दोन्ही चांगले राहण्यास मदत होते. यात  ओमेगा फॅटी एसिड असते केसांची मुळं आणि त्वचेच्या पेशींना पुरेसं पोषण प्रदान करता येते आणि फ्री रॅडिक्स नियंत्रित करून गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे फक्त केसांची रचना सुधारत नाही तर केसांमध्ये कोंडाही होत नाही. चेहऱ्यावर फ्री रॅडिकल्समुळे होणारं डॅमेज टाळता येतं. 

Web Title: Flaxseeds Chutney Recipe : How To Make Flax Seeds Chutney It Helps Of Weight Loss And Cholesterol Control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.