Lokmat Sakhi >Health > रात्रीच्या जेवणात अजिबात खाऊ नयेत असे ५ पदार्थ, वेळीच लक्ष द्या नाहीतर पोटाच्या तक्रारींना मिळेल आमंत्रण...

रात्रीच्या जेवणात अजिबात खाऊ नयेत असे ५ पदार्थ, वेळीच लक्ष द्या नाहीतर पोटाच्या तक्रारींना मिळेल आमंत्रण...

Foods Should not be Eaten in Dinner According to Ayurveda : Foods To Be Avoided Before Sleeping : What Not To Eat Before Sleep : आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. रेखा राधामोनी सांगतात, रात्रीच्या वेळी आहारात कोणते पदार्थ टाळायला हवेत याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2024 06:38 PM2024-12-03T18:38:51+5:302024-12-03T18:54:17+5:30

Foods Should not be Eaten in Dinner According to Ayurveda : Foods To Be Avoided Before Sleeping : What Not To Eat Before Sleep : आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. रेखा राधामोनी सांगतात, रात्रीच्या वेळी आहारात कोणते पदार्थ टाळायला हवेत याविषयी...

Foods Should not be Eaten in Dinner According to Ayurveda Foods To Be Avoided Before Sleeping What Not To Eat Before Sleep | रात्रीच्या जेवणात अजिबात खाऊ नयेत असे ५ पदार्थ, वेळीच लक्ष द्या नाहीतर पोटाच्या तक्रारींना मिळेल आमंत्रण...

रात्रीच्या जेवणात अजिबात खाऊ नयेत असे ५ पदार्थ, वेळीच लक्ष द्या नाहीतर पोटाच्या तक्रारींना मिळेल आमंत्रण...

सकाळचा नाश्ता एखाद्या राजाप्रमाणे, दुपारचे जेवण सामान्य माणसाप्रमाणे तर रात्रीचे जेवण एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे असावे. असे आपल्याकडे म्हटले जाते. याचाच अर्थ सकाळचा नाश्ता खूप हेव्ही पोटभरीचा तर रात्रीचे जेवण हे अगदी कमी असावे. आपले आरोग्य आपल्या लाईफस्टाइलशी निगडीत असते. आहार-विहार चांगला असेल तर आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. नाहीतर आपल्याला कमी वयातच आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी भेडसावण्यास सुरुवात होते. आहाराचे काही नियम असतात आणि ते नियम पाळले तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. रात्रीच्या वेळी झोपताना काही गोष्टी आहारात आवर्जून टाळायला हव्यात असे सांगितले जाते(What Not To Eat Before Sleep).

रात्रीचा आहार हा हलका आणि सहज पचेल असा असावा. रात्री झोपताना जर जड पदार्थ खाल्ले तर ते पचत नाहीत आणि त्यामुळे पचनशक्तीवर ताण येण्याची शक्यता असते. रात्री झोपल्यावर (Foods To Be Avoided Before Sleeping) आपल्यी शरीराची पुरेशी हालचाल होत नाही. अशावेळी आहारात सहज पचणारे पदार्थ घ्यायला हवेत. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. रेखा राधामोनी सांगतात, रात्रीच्या वेळी आहारात कोणते पदार्थ टाळायला हवेत याविषयी (Foods Should not be Eaten in Dinner According to Ayurveda).

रात्रीच्या वेळी जेवणांत कोणते पदार्थ खाणे टाळावे ? 

१. गव्हापासून तयार केलेले पदार्थ :- डॉ. रेखा राधामोनी यांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी गव्हापासून तयार केलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. गहू आणि गव्हापासून तयार केलेले पदार्थ हे पचनास थोडे जड असतात त्यामुळे रात्रीच्या जेवणांत शक्यतो असे पदार्थ खाणे टाळावे. तसेच हे पदार्थ वेळीच पचले नाही तर आपल्याला अपचन, अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे आजार यासंबंधित अनेक आजार होऊ शकतात.  

२. दही :- दह्यामध्ये प्रोटीन असल्याने ते आरोग्यासाठी आवश्यक असते. पण दही पचायला काही प्रमाणात जड असल्याने ते रात्रीच्या वेळी खाणे शक्यतो टाळायला हवे. तसेच दही प्रकृतीने थंड असल्याने त्यामुळे सर्दी-कफ यांसारख्या समस्या होण्याची शक्यता असते. 

उद्यापासून पहाटे लवकर उठायचंय? ६ टिप्स- गजर होण्यापूर्वी जाग येईल-तडक लागाल कामाला...


नेहा भसीनला जगणं मुश्किल करणारा PMDD आजार नेमका आहे काय? मासिक पाळीचं भयंकर दुखणं...

३. मैदा :- रात्रीच्या जेवणांत शक्यतो मैदा आणि मैद्यापासून तयार केलेले पदार्थ खाणे टाळावे. मैदा आणि मैद्यापासून तयार झालेले पदार्थ हे गव्हापेक्षा पचायला अधिकच जड असतात. यासाठी गव्हासोबातच मैदा देखील खाणे टाळावे. 

४. गोड पदार्थ :- काहीजणांना जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते. परंतु ही सवय आपल्या आरोग्यासाठी अपायकारक ठरु शकते. साखर पचायला जड असल्याने ती शक्यतो सूर्यास्त होण्याच्या आत खायला हवीत असे सांगितलेले आहे. जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याच्या सवयीमुळे आपल्या पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो. तसेच पचनक्रियेच्या कार्यात अडथळा येऊ शकतो. यासाठीच जेवणानंतर गोड पदार्थ खाणे टाळावे.  

५. कच्चे सॅलॅड :- रात्रीच्या जेवणासोबत कच्ची कोशिंबीर आणि सॅलॅड खाणे शक्यतो टाळावे. कच्चे सॅलॅड हे कोरडे आणि थंड असते. ज्यामुळे वात अनेक पटींनी वाढू शकतो. त्याऐवजी, आपण शिजवलेले किंवा ग्रील्ड केलेले तसेच वाफवलेल्या भाज्या खाव्यात.

Web Title: Foods Should not be Eaten in Dinner According to Ayurveda Foods To Be Avoided Before Sleeping What Not To Eat Before Sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.