Lokmat Sakhi >Health > बॅड कोलेस्टेरॉल वाढवणारे ४ पदार्थ सोडा - ४ पदार्थ खा, कोलेस्टेरॉल वाढणार नाही

बॅड कोलेस्टेरॉल वाढवणारे ४ पदार्थ सोडा - ४ पदार्थ खा, कोलेस्टेरॉल वाढणार नाही

Foods to Eat and Avoid for High Cholesterol बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आहारात समावेश करायलाच हवा असे ४ पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2023 05:46 PM2023-07-07T17:46:02+5:302023-07-07T17:46:44+5:30

Foods to Eat and Avoid for High Cholesterol बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आहारात समावेश करायलाच हवा असे ४ पदार्थ

Foods to Eat and Avoid for High Cholesterol | बॅड कोलेस्टेरॉल वाढवणारे ४ पदार्थ सोडा - ४ पदार्थ खा, कोलेस्टेरॉल वाढणार नाही

बॅड कोलेस्टेरॉल वाढवणारे ४ पदार्थ सोडा - ४ पदार्थ खा, कोलेस्टेरॉल वाढणार नाही

कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे. कोलेस्टेरॉल वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकते. ज्यामुळे हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या आजारांचा धोका वाढतो. कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असतात. फास्ट फूड, गोड पदार्थांचे सेवन करणे, यामुळे बॅड कोलेस्टेरॉलटचे प्रमाण वाढते. यात अनसॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते. जर आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर, आपल्या डाएटकडे लक्ष द्यायला हवे.

यासंदर्भात, फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर न्यूट्रिशनिस्ट आणि डायटीशियन शिखा अग्रवाल शर्मा यांनी अशा काही पदार्थांबद्दल माहिती दिली आहे. ज्यात त्यांनी दररोज खाण्यात येणाऱ्या पदार्थांऐवजी ४ पदार्थ खाण्याचा सल्ला दिला आहे. ज्याच्या सेवनाने कोलेस्टेरॉल वाढण्याऐवजी कमी होईल(Foods to Eat and Avoid for High Cholesterol).

बटरऐवजी ऑलिव्ह ऑईल वापरा

लोणीचा वापर आपण अनेक पदार्थात करतो. परंतु, लोणीमध्ये सॅचुरेटेड फॅट्स असते, जे हृदयासाठी हानिकारक ठरू शकते. कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी आहारात ऑलिव्ह ऑईलचा वापर करा, कारण त्यात हेल्दी फॅट असते.

वजन कमी करायचं तर आधी पचन सुधारा! करा ४ गोष्टी, झटपट कमी होतील नकोसे फॅट्स

नमकीन स्नॅक्स ऐवजी ड्रायफ्रुट्स खा

वेफर्स, नमकीन, बिस्किट्स ऐवजी, ड्रायफ्रुट्स खा. कारण स्नॅक्समध्ये अनहेल्दी फॅट्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे कोलेस्टेरॉल वाढते. त्यामुळे छोटी भूक भागवण्यासाठी ड्रायफ्रुट्स खा, यामध्ये फायबर व प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

आईस्क्रीम ऐवजी फ्रोजन दही खा 

जे लोकं आईस्क्रीम प्रेमी आहेत, ज्यांना आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय जमत नाही. त्यांनी फ्रोजन दही खावे. यामध्ये कॅलरीज यासह साखरेचे प्रमाणही कमी असते. फ्रोजन दही खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. फ्रोजन दह्यामध्ये आपण ताजी फळे किंवा ड्रायफ्रुट्स मिक्स करून खाऊ शकता.

जिमला जायला वेळ नाही, डाएटचे तीन तेरा? फक्त २० मिनिटं ४ गोष्टी करा, सुटलेलं शरीर होईल सुडौल

मिल्क चॉकलेट ऐवजी डार्क चॉकलेट खा

जर आपल्याला चॉकलेट फार आवडत असतील, पण खाल्ल्यानंतर वजन झपाट्याने वाढत असेल तर, मिल्क ऐवजी डार्क चॉकलेट खा. मिल्क चॉकलेटमध्ये अतिरिक्त साखर आणि अनहेल्दी फॅट्स असतात. ज्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. त्याऐवजी डार्क चॉकलेट खा. कारण त्यात फ्लेव्होनॉइड्स असतात, ज्यामुळे हृदयाच्या संबंधित धोका कमी होतो.

Web Title: Foods to Eat and Avoid for High Cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.