Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > योग्य इनरवेअर्स वापरण्याचे ४ नियम, व्हजायनल इन्फेक्शन-युरीन इन्फेक्शन टाळण्यासाठी आवश्यक खबरदार

योग्य इनरवेअर्स वापरण्याचे ४ नियम, व्हजायनल इन्फेक्शन-युरीन इन्फेक्शन टाळण्यासाठी आवश्यक खबरदार

4 Underwear Rules to Live by for a Healthy Vagina : योग्य कापडाचे, मापाचे इनरवेअर्स न वापरल्याने नाजूक जागेची अनेक दुखणी ओढावतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 07:37 PM2023-02-12T19:37:54+5:302023-02-13T13:13:50+5:30

4 Underwear Rules to Live by for a Healthy Vagina : योग्य कापडाचे, मापाचे इनरवेअर्स न वापरल्याने नाजूक जागेची अनेक दुखणी ओढावतात.

4 Underwear Rules to Live by for a Healthy Vagina How to pick the right underwear for a vaginal health | योग्य इनरवेअर्स वापरण्याचे ४ नियम, व्हजायनल इन्फेक्शन-युरीन इन्फेक्शन टाळण्यासाठी आवश्यक खबरदार

योग्य इनरवेअर्स वापरण्याचे ४ नियम, व्हजायनल इन्फेक्शन-युरीन इन्फेक्शन टाळण्यासाठी आवश्यक खबरदार

शरीर निरोगी ठेवण्यासाठी  डाएट, व्यायाम, खाण्यापिण्याचे बरेच नियम पाळावे लागतात. (Women's Health) त्याचप्रमाणे प्रायव्हेट पार्ट्सचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी अंडरगारमेंट्सच्या वपराचे नियम माहीत असणं गरजेचं आहे.  (How to pick the right underwear for a vaginal health)

मागच्या काही दिवसात समोर आलेल्या रिसर्चनुसार जर अंडरवेअरच्या वापराची योग्य पद्धत लक्षात ठेवली व्हजायनल  हेल्थ चांगली राहण्यास मदत होते.  इतकंच नाही तर  चुकीचे अंडरगारमेंट्स घातल्यानं लाईफस्टाईल, मूडवरही परिणाम होतो. (4 Underwear Rules to Live by for a Healthy Vagina )

व्हजायना शरीराचा संवेदनशील भाग आहे म्हणून ते कव्हर करण्यासाठी कॉटनच्या कपड्यांचा वापर करा. कॉटनचे कापड इन्फेक्शन होण्यापासून वाचवते आणि घाम येणं टळते. नायलॉन आणि स्पॅन्डेक्ससारख्या सिथेंटिक फॅब्रिक्सपासून बनलेले अंडरविअर अनेकदा खाज,  घाम येण्याचं कारण ठरतात. फॅशनेबल, स्टायलिश दिसण्यासाठी महिला  सिंथेटीकच्या लॉन्जरी विकत घेतात. यामुळे लालसरपणा, रॅशेज येऊ शकतात.

१) अंडरगारमेंट्स रोज बदलायला हवे

उन्हाळा असो की हिवाळा, अंडरवेअर रोज बदलणे खूप गरजेचे आहे. अनेक दिवस वारंवार तिच अंडरवेअर परिधान केल्याने योनी मार्गाला इजा होऊ शकते. घाणेरडे अंडरवेअर घालणे हे स्वच्छतेच्या दृष्टीने हानिकारक मानले जाते. एकदा अंडरवेअर घातल्यानंतर त्यामध्ये घामाचे कण, विष्ठा आणि लघवीचे कण जमा होतात, जे पुन्हा घातल्यावर त्वचेला लागू शकतात आणि त्यामुळे अनेक प्रकारे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका असतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ओपन पोर्समुळे चेहरा खूपच डल, वयस्कर वाटतोय? १ उपाय, ग्लोईंग, क्लिन चेहरा दिसेल

२) आकार, कट लक्षात घ्या

अंडरवेअर खरेदी करताना लक्षात घ्या की त्याच्या गुणवत्तेसोबतच त्याची रचना तुमच्या योनीच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते. अंडरवेअर खरेदी करताना, स्ट्रेचबिलिटीकडे लक्ष द्या. जर तुम्ही ब्रीफ्स किंवा कट्ससह अंडरवेअर घालत असाल तर योग्य फिटिंगनुसार ते खरेदी करा.

३) सॉफ्ट साबणाचा वापर

अंडरवेअर धुण्यासाठी मऊ साबण वापरावा. जर अंडरवेअर कडक साबणाने धुतली तर ते योनीला हानी पोहोचवू शकते. अंडरवेअर कडक साबणाने धुतल्यास त्यातील रसायनांमुळे योनीमार्गात खाज सुटणे, ऍलर्जी, जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

पिरिएड्समध्ये स्तन खूप जड वाटतात? ३ प्रकारच्या ब्रा वापरा, स्तन राहतील सुरक्षित, दिसतील मेंटेन

प्रत्येक अंडरवेअरला एक केअर लेबल जोडलेले असते, त्यानुसार टिप्स फॉलो करा. बाजारात उपलब्ध असलेले कॉटनचे अंडरवेअर तुम्ही घातल्यास ते धुताना थोडेसे ब्लीच वापरा. कपडे धुताना ब्लीच वापरल्याने जंतू नष्ट होतात. जर तुमचे अंडरवेअर रंगीत असेल तर तुम्ही जंतूपासून मुक्त होण्यासाठी गरम पाणी आणि डिटर्जंट वापरू शकता. या नियमांचे पालन करून अंडरवेअर घातल्यास योनी मार्गात होणारे संक्रमण आणि इतर समस्यांपासून बचाव करता येईल.

Web Title: 4 Underwear Rules to Live by for a Healthy Vagina How to pick the right underwear for a vaginal health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.