स्त्रिया त्यांच्या प्रायव्हेट पार्टस संदर्भातले आजार अनेकदा संकोच म्हणून लपवतात. मात्र वाढत्या वयानुसार शरीरात अनेक बदल घडतात. त्यातलाच एक त्रास म्हणजे काहीजणींना स्तनाग्रांभोवती लहान फोड येतात. हे बम्प्स मुरुमांसारखे दिसतात. ही नक्की कशाची लक्षणं त्यानं काय त्रास होतो हे सारं नीट समजून घ्यायला हवं.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर तनया उर्फ क्युटेरस यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. हे बम्प्स किंवा फोड खरंतर, स्तनाग्रांच्या एरोला भागात तयार होतात. एरोला म्हणजे स्तनाग्र जवळील गडद भाग. यावर तयार होणाऱ्या बम्प्स यांना माँटगोमेरी ग्रंथीचे ट्यूबरकल्स म्हणतात(Is it normal to have bumps around the nipple?).
स्तनाग्रवर बम्प्स तयार का होतात?
या बम्प्समुळे स्तनाग्रांमध्ये द्रवपदार्थ राहते. ज्यामुळे ती जागा मॉइश्चराइज होते. या बम्प्समधून विचित्र वास देखील येतो. ब्रेस्ट बम्प्स प्रत्येकीच्या छातीवर असते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या स्तनाग्रांवर अधिक ठळक दिसून येते. मासिक पाळीच्या दरम्यान, त्याचे स्वरूप कमी - अधिक प्रमाणावर बदलते.
मासिक पाळीच्या चार दिवसात शारीरिक संबंध ठेवावेत का? डॉक्टर सांगतात, आरोग्यसाठी योग्य काय...
काही लोकांना हे मुरूम वाटतात, परंतु हे मुरूम नसून ग्रंथी आहेत, त्यामुळे त्यांना वाईट किंवा त्वचारोग समजणे चुकीचे ठरेल. काही महिलांच्या ब्रेस्टवर केस देखील येतात. ही गोष्ट देखील ग्रंथीमुळे तयार होते. जे कमी किंवा जास्त झालेल्या हार्मोनल पातळीमुळे होऊ शकते.
पिरिअड पॅण्ट हा प्रकार काय असतो? महिलांना आरोग्याच्या दृष्टीने ते वापरणे फायद्याचे की तोट्याचे?
काहींच्या स्तनाग्रांवरील बम्प्स गुलाबी दिसतात, जे प्रचंड वेदना देतात. यासह ते आवश्यकतेपेक्षा मोठे दिसतात. काही वेळा स्तनाग्रांमधून द्रव गळतो. असे काही निदर्शनास आल्यास प्रथम, डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा.