वाढत्या वयात जीवनशैलीतील बदल, खाण्यापिण्यातील अनियमितता, वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव, पाणी कमी पिणं, झोपेचा अभाव या गोष्टींवर वेळीच लक्ष दिलं नाही तर जीवघेणे आजार होण्याची शक्यता असते. ब्लॅडर माणसाच्या शरीरातील पोटाच्या खालील भागातील अवयव आहे. हा अवयव युरिनरी सिस्टिमचा एक भाग असतो. मुत्राशयाच्या पेशींमध्ये जेव्हा असामान्यरित्या वाढ होते तेव्हा मुत्राशयाची भिंत टिश्यूज इंन्फेक्टेड करून रक्ताच्या गुठळ्या तयार करते. त्यावेळी या कॅन्सरची लागण होते.
ब्लॅडर कॅन्सर काय आहे?
ब्लॅडर कॅन्सर मुत्राशयाच्या आतल्या पेशींमधून पसरायला सुरूवात होते. कोणत्याही वयात हा आजार होऊ शकतो. जास्तीत जास्त पुरूषांमध्ये वयस्करपणात हा आजार उद्भवतो. तर काही प्रमाणात महिलांनाही या आजाराचा सामना करावा लागू शकतो. मुत्र विसर्जन करताना त्रास होणं, पेल्विक भागात वेदना, पाठीत वेदना सुरूवातीला अशी सामान्य लक्षणं या आजारात दिसून येतात.
कारणं काय?
साधारणपणे हा आजार कोणालाही होऊ शकतो. परंतु ज्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कॅन्सर आहे, धूम्रपान अति प्रमाणात करणं, रसायनांचा संपर्क, मूत्राशयात सूज येण्याचा त्रास असल्यास लोकांमध्ये हा आजार पसरतो. गर्भधारणेदरम्यान येणाऱ्या समस्यांमुळे स्त्रियांमध्ये मूत्राशयाच्या कॅन्सरचा धोका वाढतो.
ज्यांना मूत्राशयात स्टोन आहेत त्यांनाही मूत्राशयाच्या कॅन्सरचा धोका असतो, ज्या स्त्रिया वारंवार गर्भपात करतात त्यांना देखील मूत्राशयाच्या कॅन्सरला बळी पडू शकतात. कॅन्सरसारख्या रोगाचा उपचार अत्यंत वेदनादायक आहे आणि जगण्याची शक्यता फारच कमी आहे. म्हणूनच या आजारांपासून बचावासाठी वेळीच काळजी घ्यायला हवी.
ब्लॅडर कॅन्सरची लक्षणं
लघवी करताना जळजळ आणि रक्तस्त्राव
सतत ताप येणं
खोकला आणि खोकल्यातून रक्त बाहेर येणं
स्त्रियांच्या स्तनामध्येही गुठळ्या होऊ शकतात
स्त्रियांमध्ये, मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव हे देखील एक प्रमुख लक्षण आहे.
उपचार पद्धती
मूत्राशयाच्या कॅन्सरचे उपचारही इतर प्रकारच्या कॅन्सरप्रमाणेच केले जातात. ही उपचार पद्धत खूप कठीण आणि महाग आहे. केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि शस्त्रक्रिया करून उपचार केले जातात. मूत्राशयाचा कॅन्सर झाल्यास जागा नाजूक असल्यानं उपचार करणं कठीण होतं. मूत्राशयाच्या कॅन्सरचे उपचार आजकाल इंट्राव्हेसिकल थेरपीद्वारेही केले जातात.