शरीरातील कोणत्याही अवयवांमध्ये असामान्य पेशींची वाढ झाल्यानंतर कॅन्सरचा आजार होऊ शकतो. वेळीच म्हणजेच सुरूवातीच्या स्टेजला उपचार सुरू केले नाही तर या आजारामुळे मृत्यू येऊ शकतो. लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यानं अनेकदा असे जीवघेणे आजार वाढत जातात. ब्लॅडर कॅन्सर त्यापैकीच एक आहे. या प्रकारचा कॅन्सर महिलांसह पुरूषांमध्ये ही दिसून येतो. (Bladder cancer symptoms should be identified and treated know here)
ब्लॅडर कॅन्सर या आजारात नक्की काय होतं?
ओटीपोटाच्या खालच्या भागात त्रिकोणी आकाराचा स्नायूचा अवयव असतो. याला मूत्राशय (ब्लॅडर) म्हणतात. या ठिकाणी लघवी जमा होते. जेव्हा मूत्राशयाच्या भिंती मूत्र गोळा करतात, तेव्हा ते काहीसे सैल होतात आणि पसरतात. लघवी होताच ते लहान, सपाट होतात. मूत्राशयाचा कर्करोग हा यूरोलॉजिकल मॅलिग्नेंसीचा एक प्रकार आहे. हा कर्करोग मूत्राशयाच्या आत असलेल्या पेशींमध्ये सुरू होतो. या प्रकारच्या कर्करोगात अनियंत्रित पेशींची वाढ दिसून येते.
ब्लॅडर कॅन्सरची लक्षणं
1) कंबरदुखी, सतत लोअर बॅकमध्ये वेदना जाणवत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
२) लघवीतून रक्त येणं, रक्ताच्या गुठळ्या तयार होणं
३) लघवी करताना वेदना किंवा जळजळ जाणवणं हे सुद्धा ब्लड कॅन्सरचं लक्षण आहे.
४) रात्री सतत लघवी लागणं, शुगर आणि किडनी पेशंट्सना हा आजार जाणवतो. ब्लॅडर कॅन्सरमध्येही ही लक्षणं जाणवतात.
५) लघवी करण्याची इच्छा असूनही लघवी येत नाही, अर्थवट युरीन बाहेर येते. अशी लक्षणं दिसत असल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.
ना डाएट- ना जीम; फक्त 5 रिफ्रेशिंग पदार्थ रोज घ्या; झरझर घटेल पोट, कंबरेची वाढलेली चरबी
कारणं
हा आजार कोणत्याही वयोगातील व्यक्तीला होऊ शकतो. पण ज्यांच्या कुटुंबात एखाद्याला व्यक्तीला कॅन्सर आहे, धूम्रपान अति प्रमाणात करणं, रसायनांचा संपर्क, मूत्राशयात सूज येण्याचा त्रास असल्यास लोकांमध्ये हा आजार पसरतो. गर्भधारणेदरम्यान येणाऱ्या समस्यांमुळे स्त्रियांमध्ये मूत्राशयाच्या कॅन्सरचा धोका वाढतो.
उपाय
कॅन्सरच्या इतर प्रकारांप्रमाणेच या कॅन्सरवरही उपचार केले जातात. ही उपचार पद्धती खूपच कठीण आणि महाग आहे. केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि शस्त्रक्रिया करून उपचार केले जातात. मूत्राशयाचा कॅन्सर झाल्यास जागा नाजूक असल्यानं उपचार करणं कठीण होतं. आजकाल इंट्राव्हेसिकल थेरपीद्वारेही या आजारावर उपचार केले जातात.