महिलांमध्ये ब्रेस्टच्या समस्यांबाबत अनेक गैरसमज असतात. बऱ्याच स्त्रीया प्रायव्हेट पार्ट्स, ब्रेस्टशी निगडीत समस्या खुलेपणानं बोलत नाही. अनेकदा स्वत:च्या शरीराबद्दल त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. (Breast asymmetry) तरूण वयापासूनच अनेक मुलींना आपल्या स्तनांचा आकार समान नसल्याचं जाणवतं. स्तन आकारानं लहान मोठे असतात. कधी कधी हा फरक जास्त नसतो तर कधी सहज दिसून येईल इतका फरक आकारात जाणवतो. (Is it normal for one of your breast to be bigger than the other) आपलेच सत्न असे आहेत का? आपल्याला कुठला आजार तर नाही ना, असे त्रासदायक प्रश्न पडतात.
डॉ. क्यूटरस यांनी शेअर केलेल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार, ''एक ब्रेस्ट दुसऱ्या ब्रेस्टपेक्षा मोठी दिसणं हे सामान्य आहे. दोघांपैकी एका स्तनाचा आकार थोड्या फार प्रमाणात लहान किवा मोठा असणं तितकंच साधारण आहे. अनेक महिलांमध्ये डाव्या बाजूच्या स्तनांचा आकार मोठा असतो. (Why Are My Breasts Different Sizes)
पण जर तुमच्या उजव्या स्तनाचा आकार मोठा असेल तर यात काळजी करण्यासारखं काही नाही. हा फरक एका कपाच्या आकाराएव्हढा असू शकतो. पण स्तनांमध्ये अचानक मोठा बदल किंवा वेदना जाणवत असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा ब्रेस्ट २ बहिणींप्रमाणे आहेत पण त्या ट्विंन्स नाहीत त्यामुळे सारख्या आकाराच्या नसतील काळजी करू नका.''
मेडीकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार स्तनांच्या असामान आकारामुळे चिंताग्रस्त होण्याचं काही कारण नाही. स्तनाची विषमता खूप सामान्य आहे आणि अर्ध्याहून अधिक स्त्रियांना प्रभावित करते. हार्मोनल बदल, वयानुसार शरीरात होणारा बदल यामुळे स्तनांचा आकार बदलतो. ओव्हुलेशन काळात, प्रेंग्नसीच्यावेळी, स्तनपान करताना तुमचे स्तन अनेकदा भरल्यासारखे, जड वाटतात.
असमान स्तनांचे आणखी एक कारण म्हणजे जुवेनाईल हायपरट्रॉफी ऑफ ब्रेस्ट. हे दुर्मिळ असले तरी, यामुळे एक स्तन दुस-यापेक्षा लक्षणीय वाढू शकतो. हे शस्त्रक्रियेने दुरुस्त केले जाऊ शकते, परंतु यामुळे अनेक मानसिक समस्या आणि असुरक्षितता वाटू शकते.
स्तनांमधील बदलांसह वेदना जाणवत असतील त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्तनांचे स्क्रीनिंग करून घ्यायला हवं. स्तनांचे मेमोग्राम, अल्टासाऊंड टेस्टींग रिपोर्टंच्या मदतीनं डॉक्टर यावर योग्य उपचार सुचवू शकतात.
काही संशोधकांना असे आढळून आले आहे की असमान स्तन हे स्तनाच्या कर्करोगासाठी धोकादायक घटक असू शकतात.
ना मावा ना साखरेचा पाक; फक्त १ कप दुध वापरून करा १ किलोंची स्वादीष्ट मिठाई
कर्करोगाच्या 2015 च्या अभ्यासात असमान स्तनांचा स्तनांच्या कर्करोगाच्या जोखमीवर होणारा परिणाम तपासला गेला. या अभ्यासात असे आढळून आले की ज्या महिलांचे स्तन 20% भिन्न आकाराचे होते त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. स्तनाची विषमता आणि स्तनाच्या कर्करोगाच्या जोखमीमधील भूमिका याबाबतअजूनही मोठ्या प्रमाणात गैरसमज आहे.