Join us   

Breast Care Tips :  प्रेग्नंट नसतानाही स्तनांमधून पांढरं पाणी येतं? दुर्लक्ष करण्याआधी 'या' आजारांची लक्षणं जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 5:47 PM

Breast Care Tips : ज्या महिला गर्भवती नाहीत किंवा स्तनपान करत नाहीत त्यांच्यात प्रोलॅक्टिन, मासिक पाळीच्या समस्या, वंध्यत्वाचं कारण ठरू शकते.  

प्रसूतीनंतर स्तनातून दूध बाहेर पडणे सामान्य आहे. प्रत्येक महिलेच्या प्रसूतीनंतर स्तनातून दूध बाहेर पडतं, पण काही महिलांमध्ये गर्भधारणा नसतानाही स्तनातून दूध बाहेर येतं. हे सामान्य नाही, परंतु काही समस्यांचे लक्षण असू शकते. या परिस्थितीत महिलांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. डिलिव्हरीनंतर महिलांच्या निपल्लमधून पांढरा तरल पदार्थ म्हणजेच दूधाचा स्त्राव होतो.  याला निपल्स डिस्चार्ज असं म्हणतात. तर काहीवेळा प्रेग्नंट नसतानाही महिलांच्या निपल्समधून पांढरा स्त्राव बाहेर पडतो.  प्रसूती आणि स्त्री रोग विशेषज्ञ डॉक्टर गांधली देवरुखकर यांनी ही लक्षणं, संबंधीत आजारांबाबत अधिक माहिती दिली आहे. (Breastmilk before delivery causes)

प्रेग्नंट नसताना दूध का बाहेर येतं?

डॉक्टर गांधली देवरुखकर सांगतात की, महिलांच्या स्तनांमध्ये अतिरिक्त प्रोलॅक्टिनमुळे दूधाचं उत्पानद वाढतं. ज्या महिला गर्भवती नाहीत किंवा स्तनपान करत नाहीत त्यांच्यात प्रोलॅक्टिन, मासिक पाळीच्या समस्या, वंध्यत्वाचं कारण ठरू शकते.  

अनियमित मासिक पाळी

आजकाल अनियमित पिरियड्सची समस्या खूपच सामान्य झाली आहे.  प्रत्येक महिलेला मासिक पाळीची समस्यांचा सामना करावा लागतो. मासिक पाळीतील अनियमितता अनेक आरोग्यविषयक समस्यांचं कारण ठरू शकते.  पिरिएड्स अनियमित काही शारीरिक लक्षणं दर्शवते ज्यात स्तनांमधून दूध बाहेर येण्याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त पिंपल्स, सूज, स्तनांमध्ये वेदना, सूज, वजन वाढणं, डोकेदुखी, थकवा येणं, मूड स्विंग्स, डिप्रेशन अशी लक्षणं जाणवतात. 

वंध्यत्व

सध्याच्या लाईफस्टाईलमुळे महिलांमध्ये वंध्यत्वाची तक्रार जाणवते. त्यामुळे मुली खूपच मानसिक तणावाखाली असतात. प्रेग्नंट नसताना स्तनांमधून दूध बाहेर येणं वंध्यत्वाचं लक्षण असू शकतं. सुरूवातीच्या स्टेजला डॉक्टरांचा सल्ला घेऊन यावर उपचार करता येऊ शकतात. याव्यतिरिक्त केस गळणं, अनियमित पिरिएड्स, शारीरिक संबंधात रस नसणं अशी लक्षणं जाणवतात.

गॅलेक्टोरिया 

प्रेग्नंसीशिवाय दूध बाहेर येणं गॅलेक्टोरियाचं संकेत असू शकतात. प्रेग्नंट नसताना स्तनांमधून दूध बाहेर येणं याला वैद्यकिय परिभाषेत गॅलेक्टोरिया म्हणतात. ब्रेस्ट टिश्यूंमध्ये वाढ होणं, भीती वाटणं, पिंपल्स, डोकेदुखी, केस गळणं, अनियमित पिरिएड्स अशी लक्षणं जाणवतात.   

टॅग्स : हेल्थ टिप्सस्त्रियांचे आरोग्यआरोग्य