जेव्हा शरीरात कोणताही आजार उद्भवतो तेव्हा वेगवेगळे संकेत द्यायला सुरूवात होते. जेव्हा महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशींची वाढ होते तेव्हा सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. सामान्य समजून काही लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे समस्या वाढू शकते. कॅन्सरच्या लक्षणांकडे सुरूवातीला लक्ष दिलं तर मोठा आजार होण्यापासून टाळता येऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला अशीच काही सुरूवातीची लक्षणं सांगणार आहोत. ज्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. वॉर्कहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथिल कंसल्टेंट ऑल्कोलॉजिस्ट डॉक्टर प्रीतम जैन (Consultant Oncologist Dr Pritam Jain Wockhardt Hospital, Mumbai Central) यांनी महिलांमधील कॅन्सरच्या सुरूवातीच्या लक्षणांबाबत सांगितले आहे.
डॉ. प्रीतम जैन म्हणतात की, ''पुरुषांपेक्षा महिलांना कॅन्सरचा धोका जास्त असतो. स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सरचा सर्वात सामान्य आहे. यानंतर गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. आपल्यालाही काही असामान्य लक्षणे दिसल्यास आपण त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.''
मानेत सुज येणं
जर तुमच्या मानेवर सुज आली असेल तर अधिक सावध राहण्याची गरज आहे. कारण हे ब्रेस्ट कॅन्सरचं सुरूवातीचं लक्षणं असू शकतं. जगभरात सर्वाधिक महिला या ब्रेस्ट कॅन्सरनं बाधित आहेत. सूज येणं हे या प्रकारच्या कॅन्सरचं सुरूवातीचं लक्षण आहे. याव्यतिरिक्त ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर स्तनांमध्ये गाठ येणं, निप्पलमधून पाणी बाहेर येणं, भूक कमी लागणं, हाडांमध्ये वेदना होणं, श्वास घ्यायला त्रास होणं ही लक्षणं दिसून येतात. इतकंच नाही तर मानेवर सूज येणं लंग्स कॅन्सरचंही लक्षण असू शकतं. यामुळे छातीत वेदना होतात, कफ बाहेर पडतात याशिवाय श्वास घ्यायलाही त्रास होतो.
शरीरसंबंधादरम्यान वेदना
खरं पाहता शरीर संबंधादरम्यान वेदना होण्याची अनेक कारणं असू शकतात. पण हे सर्वाईकल कॅन्सरचं सुरूवातीचं लक्षण आहे. ग्रामीण भागात राहत असलेल्या महिलांना या प्रकारच्या कॅन्सरचा सामना करावा लागतो. हा सगळ्यात सामान्य प्रकार आहे. या प्रकारात सुरूवातीला महिलांना शरीर संबंधादरम्यान वेदना जाणवतात. योनी स्त्राव आणि मेनोपॉजनंतर ब्लिडिंगचा सामना करावा लागतो. अशा स्थिती लक्षणांकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. तरच कँन्सरच्या गाठींचा प्रसार होण्यापासून रोखता येऊ शकतं.
वारंवार लघवी येतेय असं वाटणं
वारंवार लघवी होणे मधुमेहाचे लक्षण आहे. परंतु बर्याच बाबतीत हे कॅन्सरचे लक्षण देखील असू शकते. हे लक्षण बहुधा गर्भाशयाच्या कॅन्सरचे असते. यासह, पेल्विक क्षेत्रामध्ये किंवा ओटीपोटात वेदना होणे, ओटीपोटात सूज येणे आणि योनीतून बाहेर पडणे देखील ओव्हेरियनं कॅन्सरचे लक्षण असू शकते. परंतु सुरुवातीला हे वारंवार लघवी येण्याचे लक्षण असू शकते. जर आपल्याला ही लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मेनोपॉजनंतर ब्लिडिंग होणं
मेनोपॉजनंतर रक्तस्त्राव होणे सामान्य नाही. अशा परिस्थितीत, जर आपल्याला स्वत: मध्ये ही लक्षणे दिसली तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. कधीकधी हे गर्भाशयाच्या कॅन्सरचे लवकर लक्षण असू शकते. यासह, योनीतून स्त्राव, ओटीपोटात वेदना आणि ओटीपोटाच्या भागात वेदना, दबाव ही देखील त्याची लक्षणे आहेत. महिलांच्या कॅन्सरचे बरेच प्रकार आहेत.
अशा परिस्थितीत अशी काही लक्षणे त्यांच्या शरीरात अनेकदा दिसतात, जी कॅन्सरची लक्षणं असू शकतात. कोणत्याही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे दिसताच ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि उपचार करवून घ्या.