शरीराची काळजी प्रत्येक महिलेने घेतलीच पाहिजे. आपण चेहर्याची काळजी घेतो. त्वचेची काळजी घेतो. पोटाची काळजी घेतो.(Change your 5 habits, Keep your private parts clean) इतर सगळी काळजी घेतो. पण जननेंद्रियांची काळजी घ्यायला विसरून जातो. अशी काळजी खरी रोजच्या रोज घ्यायला पाहिजे. जननेंद्रिय फार नाजूक असतात. प्रत्येक वेळी काही वेगळी काळजी घ्यायला हवी असे नाही. (Change your 5 habits, Keep your private parts clean)फार कष्ट न घेता काही साध्या सवयी आहेत, त्या बदलून घ्या.
१. रात्री झोपताना कपडे काढून झोपा. ऐकायला फार विचित्र वाटले तरी ते महत्त्वाचे आहे. भारतात स्वतंत्र खोल्यांमध्ये राहण्याची पद्धत नाही. एकत्र राहण्याची पद्धत आहे. त्यामुळे असं कपडे काढून झोपणं शक्य नाही. पण मग अशावेळी कॉटनचे पातळ कपडे वापरायचे. आणि ब्रेसियर काढून झोपायचे. (Change your 5 habits, Keep your private parts clean)त्यानेही उपयोग होतो. शरीराचा जो भाग दिवसभर झाकलेला असतो, त्याला वारा लागणे गरजेचे आहे. सतत बंद-बंद राहिल्यास जननेंद्रियांमध्ये खाज येते. अवयव लाल होतात.
२. शरीर साफ करण्यासाठी जर लुफा वापरत असाल, तर तो वापरणं बंद करा. लुफा शरीर जरी साफ करत असला तरी, त्यामध्ये बॅक्टेरिया अडकून राहतो. जननेंद्रियांवर त्याचा जास्त लवकर परिणाम होतो. लुफा धुतला तरी तो पूर्ण साफ होत नाही. त्याऐवजी हातानेच अंग स्वच्छ धुवा. तीच पद्धत योग्य आहे. शरीर ओरबाडलेही जात नाही.
३. जननेंद्रियावरील केस सतत कापू नका. ते अवयवांचे रक्षण करतात. ते कापण्यासाठी चांगल्या रेझरचाच वापर करा. कोणताही स्वस्तातला वापरू नका. एकदा वापरलेला रेझर तसा खराब होत नाही. पण जननेंद्रियांसाठी वापरताना प्रत्येक वेळी नवीनच वापरा. त्यामुळे अनेक त्रास टाळता येतील.
४. शरीरावरील डेडस्किन स्क्रबचा वापर करून साफ करा. चांगल्यातील स्क्रब वापरा. अशा मेलेल्या त्वचेमुळे अवयव काळवंडतात.
५. जननेंद्रियांना लावण्यासाठी वेगवेगळ्या क्रिम मिळतात. त्या वापरु नयेत. साध्या किंवा फारतर कोमट पाण्यानं नाजूक जागा धुणे पुरेसे आहे.