Join us

Contraception And Preventing Pregnancy : शरीरसंबंधांपूर्वी गोळी घेतली, गर्भधारणेचं टेंशन नाही; शास्त्रज्ञांचा नव्या गर्भनिरोधक औषधाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 15:49 IST

Contraception and Preventing Pregnancy : नुकत्याच प्रसिध्द झालेल्या एका अभ्यासानुसार गर्भनिरोधक गोळी एका नव्या स्वरुपात उपलब्ध होऊ शकेल, अशी चिन्हं आहेत.

गर्भनिरोधक साधनं वापरणं ही अजूनही दबक्या आवाजात बोलण्याची, त्यातही ती सारी साधनं महिलांनीच वापरायची, गोळ्या घ्यायच्या असेच अजूनही जगभर सर्वत्र चित्र आहे. त्यात आयपील्स आल्यानंतर सेक्सनंतर गर्भधारणा नको असेल तर हार्मेानल गोळ्या ओव्हर द काऊण्टर मिळू लागल्या. (Preventing Pregnancy) आता एका नव्या गर्भनिरोधक गोळीच्या अभ्यासाची चर्चा आहे.  शरीरसंबंधांपूर्वी ही गोळी घेतली तर गर्भधारणा टाळता येऊ शकते असं आता हे संशोधन म्हणते. ( Research is underway on a new drug to prevent pregnancy)

सध्याच्या आपत्कालीन गर्भनिरोधक औषधांमध्ये युलिप्रिस्टल एसीटेट ट्रस्टेड सोर्स (UA), लेव्होनॉर्जेस्ट्रेल आणि सायक्लो-ऑक्सिजनेज-2 (COX-2) इनहिबिटर यांचा समावेश आहे. मात्र कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये नुकत्याच झालेल्या क्लिनिकल चाचणीमध्ये, UA आणि COX-2 इनहिबिटर मेलॉक्सिकॅम हे नवीन औषध सुरक्षित ठरल्यानं गर्भनिरोधक म्हणून वापरले जाऊ शकण्याचा दावा करण्यात आला आहे. मेडिकल न्यूज टू डे च्या अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भातील अधिक माहिती देण्यात आली आहे. या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका डॉ. एरिका काहिल आहेत. (Easy Ways to Prevent Pregnancy)

स्टॅनफोर्ड येथील प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्राच्या क्लिनिकल सहाय्यक प्राध्यापक. डॉ. काहिल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी UA प्लस मेलॉक्सिकॅम ओव्हल्यूशेन कशाप्रकारे लांबणीवर टाकता येऊ शकते हे पाहण्यासाठी एक अन्वेषण चाचणी केली. COX-2 मेलॉक्सिकॅमपासून बनवलेले नवीन गर्भनिरोधक औषध सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. 'बीएमजे सेक्शुअल अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ' या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.

उन्हाळ्यात टाकीतलं पाणी खूप तापतं? पाणी थंडगार ठेवण्यासाठी ४ टिप्स

डॉ. काहिल आणि त्यांच्या टीमने विशिष्ट ओव्हुलेशन पॅटर्न ओळखण्यासाठी बेसलाइन सायकलद्वारे प्रत्येक सहभागीचे निरीक्षण केले. पुढे, दुसऱ्या उपचार चक्राच्या “fertile window”” दरम्यान सहभागींना UA आणि मेलॉक्सिकॅमचा एक-वेळचा डोस मिळाला. शास्त्रज्ञांनी अल्ट्रासाऊंड चालवले आणि ल्युटिनायझिंग हार्मोनची पातळी मोजली.

डॉ. एरिका काहिल म्हणाल्या, असे अनेक लोक आहेत ज्यांच्या गर्भनिरोधक गरजा पूर्ण होत नाहीत. अनेक महिलांना, जेव्हा त्या लैंगिकदृष्ट्या सक्रिय असतात तेव्हा गर्भनिरोधक वापरण्याची इच्छा नसते. सतत गोळ्या खाणं त्यांना नको वाटतं. त्यांच्यासाठी ही गोळी सोयीची आहे. या अभ्यासात १८ ते ३५ वयोगटातील नऊ महिलांच्या दोन महिन्यांच्या कालावधीचा अभ्यास करण्यात आला. मात्र डॉ. रुईझ यांनी सांगितले की, यावर खूप मोठ्या अभ्यासाची गरज आहे कारण सध्याचे संशोधन हे "मूळत: अशा औषधाचा अभ्यास करत आहे जे ओव्हल्यूशन विलंब करण्यासाठी आणि आपत्कालीन गर्भनिरोधक वापरासाठी खूप चांगले काम करेल.

 रात्री डास अजिबात झोपू देत नाहीत? फक्त ४ झाडं लावा; डास, माश्या घरापासून राहतील लांब

पुरुषांसाठी कंडोम आणि नसबंदी हे प्राथमिक गर्भनिरोधक पर्याय राहिले आहेत. पुरुष गर्भनिरोधक विकसित करण्याचे प्रयत्न अनेक दशकांपासून प्रगतीपथावर आहेत, ज्याला जागतिक आरोग्य संघटनेनं पाठिंबा दिला आहे. अलीकडील प्राण्यांच्या अभ्यासात नवीन पुरुष गर्भनिरोधक गोळ्यांचेही आशादायक परिणाम दिसून आले आहेत.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यप्रेग्नंसीगर्भवती महिलास्त्रियांचे आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला