Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > ओरल सेक्समुळे घशाचा कॅन्सर होतो का? डॉक्टर सांगतात, हे खरं की खोटं..

ओरल सेक्समुळे घशाचा कॅन्सर होतो का? डॉक्टर सांगतात, हे खरं की खोटं..

Does oral sex cause throat cancer : या प्रकारच्या कॅन्सरला ओरोफॅरेजियल कॅन्सर (oropharyngeal Cancer) असं म्हणतात. Oro- तोंड (mouth)+ Pharynx - घसा (Throat)

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 04:16 PM2023-05-15T16:16:59+5:302023-05-15T16:44:35+5:30

Does oral sex cause throat cancer : या प्रकारच्या कॅन्सरला ओरोफॅरेजियल कॅन्सर (oropharyngeal Cancer) असं म्हणतात. Oro- तोंड (mouth)+ Pharynx - घसा (Throat)

Does oral sex cause throat cancer : Is Oral sex is now the leading risk factor for throat cancer | ओरल सेक्समुळे घशाचा कॅन्सर होतो का? डॉक्टर सांगतात, हे खरं की खोटं..

ओरल सेक्समुळे घशाचा कॅन्सर होतो का? डॉक्टर सांगतात, हे खरं की खोटं..

ओरल सेक्स (Oral Sex) संदर्भात अनेक उलटसुलट गैरसमज दिसतात. त्यातून होणारे आजार, अपेक्षा आणि आनंद यासंदर्भात शास्त्रीय माहिती नसल्याने समाजमाध्यमात व्हायरल होणाऱ्या चर्चा, रिल्स आणि व्हिडिओ यातून जी माहिती मिळते ती खरी मानली जाते. त्यातून जोडप्यांमध्ये ताण वाढतो आणि वैवाहिक आयुष्यातले तणावही. ओरल सेक्सच्या संदर्भात खरंतर पार्टनरच्या स्वच्छतेच्या संबंधित गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. ओरल हायजिन हा प्रश्न, त्यासंदर्भातली किळस हे मुद्देही एकमेकांशी बोलून सोडवले पाहिजे. मात्र  पॉर्न, रिल्सच्या माध्यमातून आणि मित्रमैत्रिणींकडून अनेक गोष्टी समजल्याने योग्य, अयोग्य, लैगिंक आरोग्याचे धोके याबाबत विचार केला जात नाही. (Common Myths & Facts on Oral sex know Oral Sex Good or Bad) न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिननेही याबाबत संशोधन प्रकाशित केले होते. त्यानुसार सेक्स आणि मल्टीपल पार्टनरसह ओरल सेक्समुळे घशाच्या कॅन्सरचा धोका वाढतो आहे. (Oral sex is now the leading risk factor for throat cancer)

ओरल सेक्समुळे घश्याचा कॅन्सर होतो अशी माहिती गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डॉ. तनाया यांच्यामते हे काहीप्रमाणात सत्य आहे. कारण ओरल सेक्समुळे तुमच्या घश्याच्या मागच्या बाजूला कॅन्सर होऊ शकतो. या प्रकारच्या कॅन्सरला ओरोफॅरेजियल कॅन्सर (oropharyngeal Cancer) असं म्हणतात. अन्प्रोटेक्टेट ओरल सेक्समुळे हा त्रास होऊ शकतो.

फ्लेवर्ड कंडोम ओरल सेक्ससाठी बनवण्यात आलेले असतात. हे कंडोम्स पेनिट्रेटिंग व्हजायनल सेक्ससाठी बनवलेले नसतात. सेक्शुअली ट्रांसमिटेड आजार कोणत्याही प्रोटेक्टशनशिवाय केलेल्या ओरल सेक्समुळे उद्भवू शकतात.  

मेडिकल न्यूज टु डे च्या रिपोर्टनुसार ओरल सेक्समुळे थेट घशाचा कॅन्सर होत नाही, पण तो HPV पसरवू शकतो. एचपीव्हीमुळे पेशींमध्ये कर्करोगापूर्वीचे बदल होऊ शकतात ज्यामुळे नंतर घशाचा कर्करोग होऊ शकतो. धूम्रपान आणि मद्यपानामुळे एचपीव्ही संसर्गाचा कर्करोग होण्याचा धोका आणखी वाढतो. एचपीव्ही संसर्गामुळे थेट तोंडाचा कर्करोग होत नाही. विषाणू संक्रमित पेशींमध्ये बदल घडवून आणतात. HPV चे काही  घटक तोंडात आणि घशात कॅन्सरच्या गाठी वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. 

अहवालानुसार, एकापेक्षा अधिक ओरल सेक्स पार्टनर असलेल्या लोकांना हा कर्करोग होण्याची शक्यता 8.5 पट जास्त असते.  ओरल सेक्स आजकाल तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. ओरल सेक्स करताना लैंगिक संक्रमित संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. दोघांपैकी एकालाही या प्रकारच्या सेक्सची घृणा, किळस वाटत असेल किंवा शारीरिक त्रास होत असल्यास असा  सेक्स टाळलेलाचा बरा. 

Web Title: Does oral sex cause throat cancer : Is Oral sex is now the leading risk factor for throat cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.