स्तनांच्या आरोग्याकडे अजूनही बऱ्याच महिला दुर्लक्ष करतात. ब्रेस्टचा आकार, अंतवस्त्रे यांबाबत अनेकांच्या मनात गैरसमज असतात. स्तनांच्या चांगल्या आरोग्यासाठी ब्राची सुद्धा महत्वाची भूमिका असते. काळ्या रंगाची ब्रा घातल्यानं ब्रेस्ट कॅन्सर होतो किंवा घट्ट ब्रा मुळे स्तनांचा कॅन्सर होऊ शकतो असे अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहेत. याबाबतचे फॅक्ट्स या लेखात समजून घेऊया. (Can Wearing a Black Bra Cause Breast Cancer)
1) अंडरवायर ब्रा मुळे कॅन्सर होतो का?
अंडरवायर ब्रा स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढत नाहीत. अंडरवायर ब्राच्या कपमधील तारा स्तनातील लिम्फ द्रवपदार्थाचा प्रवाह प्रतिबंधित करू शकतात ज्यामुळे त्या भागात विषारी द्रव्ये तयार होतात. ब्राचा प्रकार ब्राचा आकार किंवा स्तनाचा आकार यांचा स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असल्याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत.
2) काळ्या रंगाची ब्रा घातल्यानं ब्रेस्ट कॅन्सर होतो?
तुमच्या ब्राच्या रंगाचा स्तनाच्या कर्करोगाशी काहीही संबंध नाही. झोपताना रिलिफ मिळण्यासाठी ब्रा न घालण्याचा सल्ला दिला जातो. काळ्या रंगाची ब्रा घातल्यानं कॅन्सर होतो याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. डॉ. क्युटरस यांनी आपल्या इंस्टाग्रामपोस्टमध्ये सांगितले की, ''काळ्या किंवा डार्क रंगाच्या ब्रा घातल्यानं ब्रेस्ट कॅन्सर होतो हे तुम्ही खूपदा ऐकलं असेल. अशा ब्रा घातल्यानं स्तन जास्त प्रमाणात उष्णता शोषून घेतात असा गैससमज आहे. स्तन हे मायक्रोव्हेव्हमधले बन्स नाहीत त्यामुळे उष्णता शोषत नाही. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर आणि डार्क रंगाच्या ब्रा घालण्याचा काही संबंध नाही.''
3) फक्त महिलांनाच ब्रेस्ट कॅन्सर होतो?
स्तनाचा कर्करोग पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकतो, परंतु स्त्रियांमध्ये तो जास्त प्रमाणात आढळतो.
ब्रा ची निवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा
1) स्तनांच्या आकारानुसार योग्य ब्रा ची निवड करा. जास्त घट्ट किंवा जास्त लूज ब्रा घालू नका.
2) दरवर्षी स्तनांचा आकार मोजून ब्रा विकत घ्या
३) जॉगिंग करताना स्पोर्ट्स ब्रा घाला - जॉगिंग किंवा स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी दरम्यान स्पोर्ट्स ब्रा घालण्याचा सल्ला दिला