Join us   

Gallbladder Stone : गडद रंगाची लघवी अन् आंबट ढेकर ठरू शकतात या गंभीर आजाराचं लक्षणं; वेळीच जाणून घ्या बचावाचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 11:59 AM

Gallbladder Stone : जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हळूहळू कमी करा. वेगानं वजन कमी केल्यास पित्त स्टोन आणि इतर आरोग्याच्या समस्या होण्याचा धोका वाढतो. 

ठळक मुद्दे बहुतेक स्टोन पित्तामध्ये जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल असताना तयार होतात. हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशनच्या मते, 80 टक्के पित्त कोलेस्ट्रॉलचे बनलेले आहेत. आणखी 20 टक्के पित्ताशय कॅल्शियम मीठ आणि बिलीरुबिनपासून बनलेले असते.जोपर्यंत आपल्याला तीव्र वेदना होत नाहीत तोपर्यंत आपल्याला उपचारांची आवश्यकता असू शकत नाही. कधीकधी स्टोन सुद्धा नकळतपणे लघवीतून स्वतःहून निघून जातात.

पित्ताच्या पिशवीत स्टोन म्हणजे गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन होणं खूप सामान्य समस्या आहे. महिला आणि लठ्ठपणाचे शिकार असलेले लोक याशिवाय वयस्कर लोक तसंच लहान मुलांनाही या आजाराचा सामना करावा लागतो. हा आजार जीवघेणा नसला तरी कारणं आणि लक्षण जाणून घेतल्यास या आजारापासून लांब राहण्यास मदत होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया गॉल ब्लॅडर स्टोन नक्की काय आहे. 

पित्ताशयाच्या पिशवीच्या वरच्या भागात डाव्या बाजूला लिव्हरच्या खाली एक लहानसा अवयव असतो. याचं काम पित्ताशयाला व्यवस्थित ठेवण्याचे असतं. त्यामुळे अन्न पचनातही मदत होते. हाच अवयव लिव्हरमधील गॉल ब्लॅडर स्टोनचं कारण  ठरू शकतं.  जर्नल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अमित अग्रवाल स्पष्ट करतात की, बहुतेक स्टोन पित्तामध्ये जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल असताना तयार होतात. हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशनच्या मते, 80 टक्के पित्त कोलेस्ट्रॉलचे बनलेले आहेत. आणखी 20 टक्के पित्ताशय कॅल्शियम मीठ आणि बिलीरुबिनपासून बनलेले असते.

बिलीरुबिन हे एक केमिकल आहे. जेव्हा आपले लिव्हर जुन्या लाल रक्त पेशी नष्ट करते तेव्हा बनते. रक्ताचा विकार यासारख्या काही विशिष्ट परिस्थितींमुळे लिव्हरला जितके बिलीरुबिन पाहिजे त्यापेक्षा जास्त तयार होऊ शकते. जेव्हा पित्ताशय जास्त बिलीरुबिन तोडू शकत नाही. तेव्हा स्टोन  तयार होतात. हे कठोर स्टोन बहुधा तपकिरी किंवा काळ्या रंगाचे असतात. निरोगी राहण्यासाठी आणि योग्यरित्या कार्य करण्यासाठी आपल्या पित्ताशयाला पित्त रिकामं करणे आवश्यक आहे. जर ती पित्त सामग्री रिक्त करण्यात अयशस्वी ठरली तर पित्त जास्त प्रमाणात जमा होते, ज्यामुळे स्टोन तयार होतात.

लक्षणं

गोल ब्लॅडर स्टोनमुळे उजव्या ओटीपोटात अधूनमधून वेदना होऊ शकतात. जेव्हा आपण जास्त चरबीयुक्त खाद्यपदार्थ खाल तेव्हा असे होते. तथापि, ही वेदना एक किंवा दोन तासांपेक्षा जास्त काळ टिकत नाही. मळमळ, उलट्या, गडद लघवी, मातीच्या रंगाचे मल, ओटीपोटात वेदना, बर्पिंग, अतिसार आणि आंबट ढेकर, डोकेदुखी या लक्षणांचा समावेश आहे.

उपचार

जोपर्यंत आपल्याला तीव्र वेदना होत नाहीत तोपर्यंत आपल्याला उपचारांची आवश्यकता असू शकत नाही. कधीकधी स्टोन सुद्धा नकळतपणे लघवीतून स्वतःहून निघून जातात. आपल्याला वेदना होत असल्यास डॉक्टर तात्पुरते आराम मिळण्यासाठी इंजेक्शन्स देतात पण अनेकदा सर्जरीची गरजही भासू शकते.  क्वचित प्रसंगी, डॉक्टर औषध देतात. जर शस्त्रक्रिया आपल्यासाठी धोकादायक असेल तर ड्रेनेज ट्यूब त्वचेच्या माध्यमातून पित्ताशयामध्ये ठेवली जाऊ शकतात. इतर वैद्यकीय परिस्थितींचा उपचार करून जोखीम कमी होईपर्यंत आपण शस्त्रक्रिया पुढे ढकलू शकता.

बचावाचे उपाय

वजन नेहमी नियंत्रणात ठेवायला हवं

एंटी इन्फेमेटरी डाएटचा आहारात समावेश करा.

नियमित व्यायाम करायला हवा.

वेगानं वजन कमी होऊ देऊ नका.

आपण इच्छित असल्यास, आपण व्हिटॅमिन सी, लोह आणि लेसिथिनसह काही पौष्टिक पूरक आहार देखील घेऊ शकता. एका विश्लेषणामध्ये असे आढळले आहे की पित्ताशयाच्या स्टोनगडांचा धोका कमी करण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि लेसिथिन प्रभावी आहेत. 

शक्यतो बॅड फॅट्सचे सेवन कमी प्रमाणात  करा. 

मल व्यवस्थित बाहेर पडण्याासाठी आहारात फायबर्सयुक्त पदार्थांचा समावेश करा. 

कॅफीनयुक्त ड्रिंक, हाई फॅट डेयरी प्रोडक्ट्स अशा पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन करू नका. 

पचण्यास जड असलेले पदार्थ वारंवार खाऊ नका. 

जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा. 

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हळूहळू कमी करा.

वेगानं वजन कमी केल्यास पित्त स्टोन आणि इतर आरोग्याच्या समस्या होण्याचा धोका वाढतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समहिला