Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > उन्हाळ्यात नाजूक जागेचे इन्फेक्शन टाळा, योनी मार्गाची स्वच्छता राखण्यासाठी ४ गोष्टी विसरू नका...

उन्हाळ्यात नाजूक जागेचे इन्फेक्शन टाळा, योनी मार्गाची स्वच्छता राखण्यासाठी ४ गोष्टी विसरू नका...

how to wash your vagina in the right way an expert tells : नाजूक जागांची दुखणी बायकांना छळतात पण त्याकडे दुर्लक्ष होते, आजार वाढतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2023 04:53 PM2023-05-27T16:53:17+5:302023-05-27T17:00:44+5:30

how to wash your vagina in the right way an expert tells : नाजूक जागांची दुखणी बायकांना छळतात पण त्याकडे दुर्लक्ष होते, आजार वाढतात

Here's Exactly How to Clean Around Your Vagina And Vulva, According To Experts | उन्हाळ्यात नाजूक जागेचे इन्फेक्शन टाळा, योनी मार्गाची स्वच्छता राखण्यासाठी ४ गोष्टी विसरू नका...

उन्हाळ्यात नाजूक जागेचे इन्फेक्शन टाळा, योनी मार्गाची स्वच्छता राखण्यासाठी ४ गोष्टी विसरू नका...

आपण आपल्या शरीराची स्वच्छता कायम ठेवत असतो. निरोगी राहण्यासाठी शरीराची आतून बाहेरून स्वच्छता ठेवणे खूपच गरजेचे असते. संपूर्ण शरीर स्वच्छ असणे याचे महत्व आपण जाणतोच. शरीराच्या विविध अवयवांची स्वच्छता करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचा वापर करतो. केसांच्या स्वछतेसाठी आपण शँम्पूचा वापर करतो, चेहेऱ्याच्या स्वछतेसाठी आपण फेसवॉशचा वापर करतो. शरीराचे अवयव स्वच्छ करण्यासाठी साबण वापरला जातो. चेहेऱ्याच्या त्वचेची देखभाल करणं जेवढं आवश्यक आहे, तितकेच प्रायव्हेट पार्ट स्वच्छ ठेवणंही गरजेचं आहे. आपल्या प्रायव्हेट पार्टची जागा अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे तिची नेमकी स्वच्छता कशी ठेवावी असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. 

शरीराचे प्रत्येक अवयव स्वच्छ केले तरीही प्रायव्हेट पार्टची जागा कशी स्वच्छ करावी याबाबत महिलांच्या मनात असंख्य प्रश्न असतात. प्रायव्हेट पार्टची जागा नेमकी कशी स्वच्छ करावी ? तेथील त्वचेची नेमकी कशी काळजी घ्यावी याबाबत डॉ. गुलबहार अन्सारी (BUMS) यांनी योनीची स्वच्छता आणि संरक्षण करण्याचे अनेक पर्याय सुचवले आहेत. डॉ.गुलबहार अन्सारी सांगतात की, योनीमार्ग स्वच्छ न ठेवल्यास अनेक गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे योनीमार्ग का आणि कसे स्वच्छ करता येईल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे(Here's Exactly How to Clean Around Your Vagina And Vulva, According To Experts).

  योनीमार्ग व प्रायव्हेट पार्टची जागा स्वच्छ ठेवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ?  

१. केमिकलयुक्त साबणांचा वापर करणे टाळा :- आजकाल बाजारात विविध प्रकारचे साबण उपलब्ध आहेत, ज्यामध्ये कठोर रसायने वापरली जातात. या असंख्य प्रकारच्या साबणांमध्ये नानाविध केमिकल्स मिसळलेले असतात. या साबणांची पीएच पातळी खूप जास्त असते, जी प्रायव्हेट पार्टसाठी हानिकारक असते. विशेषत: योनी हा एक अतिशय संवेदनशील भाग आहे आणि रासायनिक साबण वापरल्याने योनीची pH पातळी बिघडू शकते. खराब पीएचमुळे योनी मार्गाचे संतुलन बिघडून चिडचिड सारख्या समस्या उद्भवतात. 

नाजूक जागेचे केस काढल्यानंतर पुळ्या, खाज येते? रेजर बम्प्स टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला...

२. इंटिमेट वॉश प्रॉडक्ट्सचा वापर करावा :- व्हजायनल वॉश हे योनिमार्गाची जागा स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे एक सौम्य क्लींजर असते. मात्र काही स्त्रियांना याचा वापर कसा आणि कुठे करावा याबद्दल योग्य माहिती नसते. व्हजायनल वॉश हे डायरेक्ट व्हजायनावर वापरले जात नाही. व्हजायना हा आतील भाग असतो तर व्हल्व्हा हा बाहेरील भाग असतो. हे व्हजायनल वॉश केवळ बाहेरच्या बाजूस वापरले जाते. आतमध्ये याचा वापर केल्यास अनेकदा इन्फेक्शन होण्याची देखील शक्यता असते.

३. कॉटन पँटी वापरा :- योनीमार्गाचा भाग किती नाजूक असतो याची जाणीव सर्वांनाच आहे. म्हणूनच मासिक पाळीत कॉटन पॅन्टीज निवडणे आवश्यक आहे. यामुळे आराम तर मिळेलच पण खाज येण्यासारखी समस्याही उद्भवणार नाही. इतर कापडांमुळे दुर्गंधी किंवा चिडचिड यासारख्या सर्व प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात, विशेषतः उन्हाळ्यात. म्हणूनच कॉटन पँटीज वापरणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

व्हजायनल डिस्चार्जचा बदललेला रंग सांगतो गंभीर आजारांचा धोका, ४ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं अत्यंत धोक्याचं!

४. लघवी केल्यानंतर पाण्याने धुण्यास विसरू नका :- आजकाल टॉयलेटमध्ये टिश्यू पेपर किंवा टॉयलेट पेपर यांसारख्या अनेक गोष्टींचा वापर वाढलेला दिसून येतो. शक्यतो आपण लघवी किंवा मलत्याग झाल्यानंतर टिश्यू पेपर किंवा टॉयलेट पेपरचा सर्रास वापर करतो. याचबरोबर लघवी झाल्यानंतरही आपणं योनीमार्ग पाण्याने स्वच्छ करून मग टिश्यू पेपरने आपल्या प्रायव्हेट पार्टची जागा पुसून घेऊ शकतो. योनीमार्ग पाण्याने धुतल्याने प्युरीनमध्ये अडकलेले लघवीचे सर्व थेंब साफ होतात, परंतु योनीमार्ग ओला राहते आणि त्यात ओलावा टिकून राहतो. त्यामुळे बॅक्टेरिया वाढण्याचा धोका जास्त असतो. यामुळेच लघवी झाल्यानंतर योनीमार्ग पाण्याने स्वच्छ धुवून मग टिश्यू पेपरने पुसून व्यवस्थित कोरडा करून घ्यावा.

Web Title: Here's Exactly How to Clean Around Your Vagina And Vulva, According To Experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.