अभिनेत्री हिना खान हिला जेव्हा कॅन्सर झाल्याचं समजलं तेव्हा तिचे चाहते अक्षरश: हादरून गेले होते. कायम हसत असणारी, आनंदी राहणारी हिना त्यांना सोशल मिडियावर नेहमीच दिसायची. त्यावेळी तिला पाहताना असा एखादा मोठा आजार तिला विळखा घालत असेल असं ना कधी तिला वाटलं ना तिच्या चाहत्यांना.. हिना खूप हिंमतीने या सगळ्या गोष्टींना तोंड देत आहे. तिच्या आजारपणाबद्दल वेळोवेळी माहिती देऊन अनेक महिलांना या आजाराविषयी जागरुकही करत आहे. पण तरीही ज्या चुका बहुसंख्य महिलांकडून कॅन्सरच्या सुरुवातीच्या स्टेजला होतात, त्याच चुका हिनाकडूनही झाल्या (Hina Khan Says She Ignored Breast Cancer Signs). त्याविषयीची माहिती तिने स्वत:च फराह खानने घेतलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे.(breast cancer symptoms)
तज्ज्ञ डॉक्टर नेहमीच सांगतात की कॅन्सर काही एकदम तिसऱ्या स्टेजला जात नाही. तो पहिल्या स्टेजला असतो तेव्हाच तुम्हाला काही ना काही सूचना देत असतो. तुमच्या शरीरात काही बदल घडवून आणत असतो.
घरात झुरळ, मुंग्या वाढण्याचं 'हे' आहे छुपं कारण- स्वयंपाकघर आवरताना ४ गोष्टींकडे विशेष लक्ष द्या
पण आपलं कधी कळत असून तर कधी नकळतपणे त्या बदलांकडे दुर्लक्ष होत जातं आणि मग आजार अगदी शेवटच्या स्टेजला गेल्यावर तो कॅन्सर असल्याचं आपल्या लक्षात येतं. हिना खानही नेमकं हेच सांगत आहे. ती म्हणते की मलाही जाणवत होतं की मला थोडा त्रास होतो आहे, शरीरात काही बदल होत आहेत. पण त्याला मी कधीच सिरिअसली घेतलं नाही. साधं इन्फेक्शन असेल असं समजून त्याकडे दुर्लक्ष केलं, शुटिंगमधून वेळ काढून डाॅक्टरांकडे जाऊन तपासून घ्यावं असंही मला वाटलं नाही. इथेच मी चुकले आणि मग आजार थेट तिसऱ्या स्टेजला गेल्यावर लक्षात आला..
ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवातीला दिसणारी लक्षणं
हिनाचा हा अनुभव ऐकून सगळ्याच महिलांनी स्वत:च्या आरोग्याबाबत अधिक जागरुक होणं गरजेचं आहे. त्यामुळेच ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवातीच्या काळात दिसून येणारी ही लक्षणं जाणून घ्या आणि दरवेळी स्वत:च स्वत:ची परीक्षा करा. डॉ. पंकज गोयल यांनी ब्रेस्ट कॅन्सरची सांगितलेली लक्षणं टाईम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केली आहेत.
स्तनांमध्ये गाठ जाणवणे, एक स्तन दुसऱ्यापेक्षा थोडा मोठा वाटणे, स्तनांना खूप खाज येणे, त्यांच्यातून द्रव पदार्थ बाहेर येऊन स्तनाग्र लालसर होणे, खूप थकवा जाणवणे, प्रयत्न न करताही वजन आपोआप कमी होणे, अशी काही लक्षणं गांभिर्याने घेणं गरजेचं आहे.