Join us   

नाजूक जागेचे केस काढल्यानंतर पुळ्या, खाज येते? रेजर बम्प्स टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 5:24 PM

How to get rid of ingrown hair know the effective tips : रेझर बंम्पच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी वॅक्सिंग टाळा. महिन्यातून दोनपेक्षा जास्त वॅक्स करू नका.

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नाजूक अवयवांची काळजी घेणं, स्वच्छता ठेवणं महत्वाचं असतं. नाजूक भागांवर केस काढण्यासाठी बरेचजण रेजर वापरतात. (How to avoid razor bumps after shaving pubic hair) रेजरनं केस काढल्यानंतर खाज येणं, पुळ्या येणं असा त्रास उद्भवतो. रेजरचा वापर त्रासदायक ठरतो आणि केस काढण्याकडे दुर्लक्ष केलं जातं.  शेव्हींगनंतर पिंपल्स, खाज टाळण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया. (How To Shave Your Bikini Line Without Getting Razor Bumps)

इन्ग्रोथ केसांमुळे हा त्रास उद्भवतो. शेविंग केल्यानंतर केस सरळ वाढतात पण काहीवेळा केसांची वाढ व्यवस्थित न होता ते फोल्ड होतात. त्यामुळे त्या जागेवर पिंपल्स येतात. यावर उपाय म्हणून प्युबिक हेअर्स काढताना  शेव्हींगऐवजी ट्रिमिंगचा अवलंब करा. ट्रिमिंग करण्याआधी त्वचा ओली असेल याची खात्री करा. जर तुम्ही शेविंग करत असाल तर ज्या दिशेने केसांची वाढ होतेय. त्याच्या विरुद्ध बाजूनं शेव्हिंग करू नका. यामुळे फक्त क्लिन त्वचा मिळणार नाही तर त्वचेवर येणाऱ्या पुळ्यांपासून सुटका मिळू शकते. 

रेझर बंम्पच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी वॅक्सिंग टाळा. महिन्यातून दोनपेक्षा जास्त वॅक्स करू नका.  तुमचा रेझर वेळोवेळी बदलत राहा. रेझर बंप्स झाल्यास त्वचेवर स्वच्छ आणि मऊ ब्रश वापरा. यामुळे मृत त्वचा निघून जाईल आणि छिद्रे उघडतील.  यानंतर पिंपल्सवर क्रीम लावा. वॅक्सिंगनंतर हात किंवा पायांच्या त्वचेवर पिंपल्स दिसल्यास स्क्रब करा. वॅक्सिंगनंतर थंड पाणी किंवा बर्फाचा पॅक वापरा. बर्फाचे पॅक लावल्यास रेझर बंप्म्स होत नाहीत. वॅक्सिंगनंतर त्वचेवर होणारा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही आइस पॅक देखील वापरू शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्सस्त्रियांचे आरोग्य