Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > उन्हाळ्यात युरिन इन्फेक्शनचा त्रास वारंवार होतो? ८ उपाय, स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात....

उन्हाळ्यात युरिन इन्फेक्शनचा त्रास वारंवार होतो? ८ उपाय, स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात....

How To Prevent A Urinary Tract Infection In Summer Season : अनेक महिलांना उन्हाळ्यात वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होतो, त्यासाठी हे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2023 06:45 PM2023-03-30T18:45:45+5:302023-03-30T19:06:02+5:30

How To Prevent A Urinary Tract Infection In Summer Season : अनेक महिलांना उन्हाळ्यात वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होतो, त्यासाठी हे उपाय

How To Prevent A Urinary Tract Infection In Summer Season | उन्हाळ्यात युरिन इन्फेक्शनचा त्रास वारंवार होतो? ८ उपाय, स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात....

उन्हाळ्यात युरिन इन्फेक्शनचा त्रास वारंवार होतो? ८ उपाय, स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात....

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीतील महिलांमध्ये UTI (युरीनल ट्रॅक इन्फेक्शन) अर्थात मुत्रमार्गातील संसर्ग ही सर्वात मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. पुरुषांपेक्षा महिलांना याचा अधिक त्रास होतो. नोकरीनिमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये ही समस्या वाढताना दिसत आहे. शक्यतो उन्हाळ्याच्या ऋतूत बहुतेकवेळा महिलांना यूटीआय संसर्ग झाल्याचे लक्षात येते. उन्हाळ्याच्या दिवसात लघवीच्या जागी संसर्ग होणे ही सर्रास आढळून येणारी आणि अतिशय वेदनादायक समस्या आहे. याचा त्रास कोणालाही होऊ शकतो, उन्हाळ्यात याचे प्रमाण खूप जास्त वाढते. उन्हाळ्यातील उष्ण व आर्द्र हवामानामुळे हा त्रास होण्याचा धोका वाढतो.

बहुतांश महिलांना उन्हाळ्यांत लाघवीसंदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे त्रास जाणवतात. खूप वेळा लघवीला होणे, लघवीच्या जागी जळजळ होणे. काही महिलांना तर वारंवार लघवीला झाल्यासारखं वाटतं आणि जेव्हा लघवीला जातो तेव्हा संपूर्ण लघवी होत नाही, अशा अनेक समस्यांचा महिलांना उन्हाळ्याच्या ऋतूत सामना करावा लागतो. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मूत्रमार्गाचा संसर्ग मूत्रपिंडात पसरतो आणि वेळेवर उपचार न केल्यास गंभीर गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात. नवी मुंबईतील, मेडिकोव्हर हॉस्पिटल्सचे प्रसूती सल्लागार आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनु विज यांनी महिलांना उन्हाळ्यात होणाऱ्या यूटीआय संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत त्या लक्षात ठेवू(How To Prevent A Urinary Tract Infection In Summer Season).

मूत्रमार्गाचा संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी नक्की काय करता येईल ? 

१. हायड्रेशन ही गुरुकिल्ली आहे :- मूत्रमार्गाचा संसर्ग रोखण्यासाठी भरपूर पाणी पिणे हा एक सर्वोत्तम उपाय आहे. महिलांनी UTI (युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन) यांसारख्या समस्येपासून दूर राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. लघवी केल्याने बहुतेकवेळा आपल्या शरीरातील विषारी घटक हे लघवीवाटे शरीराच्या बाहेर टाकले जातात. पाणी पिण्याने लघवी पातळ होण्यास मदत होते आणि वारंवार लघवी केल्यामुळे संसर्ग सुरू होण्यापूर्वी मूत्रमार्गातून बॅक्टेरिया बाहेर काढण्यास मदत होते. यासाठी महिलांनी UTI (युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन) यांसारख्या समस्येपासून दूर राहण्यासाठी भरपूर पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवले पाहिजे.  

२.  वेळोवेळी लघवीला जाणे :- जेव्हा जेव्हा लघवीला आली आहे असे वाटेल तेव्हा प्रत्येकवेळी वॉशरूमला जाऊन यावे. लघवी खूप काळ रोखून धरल्यास मूत्रमार्गात जिवाणूंची संख्या अनेक पटींनी वाढू शकते. यामुळे आपल्याला UTI (युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन) यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.    खासकरून संभोग किंवा व्यायाम केल्यानंतर लघवीला जाऊन यावे. जास्त काळासाठी लघवी अडवून धरु नये. हे आपल्या शरीरासाठी हानीकारक ठरु शकते. 

३. सुरक्षित लैंगिक संबंध :- महिलांनी UTI (युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन) चा धोका टाळण्यासाठी सुरक्षित लैंगिक संबंध करण्यावर जास्त लक्ष द्यावे. महिलांनी संभोग करण्याच्या आधी आणि नंतर जननेंद्रिये स्वच्छ करणे खूपच आवश्यक आहे. जननेंद्रियाच्या भागांतील मूलभूत स्वच्छतेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. जोडीदाराशीर लैंगिक संबंध ठेवताना सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे आवश्यक आहे.  

४. प्रोबायोटिक्सचे सेवन करा :-  प्रोबायोटिक्स हे प्रामुख्याने मानवी शरीराच्या संरक्षणासाठी वापरले जातात. प्रोबायोटिक्समुळे आतड्यातील निरोगी जिवाणू वाढवण्यास मदत होते. आतड्यातील हे निरोगी जिवाणू हानिकारक जिवाणूंपासून आपला बचाव करतात. दही, पनीर, ताक, चीज असे अनेक प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थ खाण्यावर जास्त भर दिला पाहिजे. यूटीआय संसर्ग टाळण्यासाठी प्रोबायोटिक्सयुक्त अन्नपदार्थ खाणे गरजेचे असते. दही यामध्ये प्रोबायोटिक घटक आढळतात. हे आपल्या पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवतात. म्हणून आहारात दररोज प्रोबायोटिक्सचा समावेश करा.

५. योनीमार्गात रासायनिक उत्पादने वापरणे टाळा :- योनीमधील जिवाणूंचे नैसर्गिक संतुलन बिघडेल अशी कोणतीही स्वच्छता उत्पादने वापरणे टाळा. योनीमार्ग स्वच्छ करण्यासाठी बाजारात विकल्या जाणाऱ्या रासायनिक उत्पादनांचा वापर टाळा. योनीची स्वच्छता करण्यासाठी योग्य फेमेनाईन प्रोडक्ट्सचा (Use Feminine Products) वापर करा. सेटेंड स्प्रेज किंवा सेेटेंड पावडरचा वापर टाळा.

६. योनीमार्ग स्वच्छ करण्याची पद्धत :- लघवी केल्यानंतर योनी मार्गाची योग्य स्वच्छता करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. योनीमार्ग स्वच्छ केल्यानंतर तो तो पुसण्याची एक विशिष्ट्य पद्धत महिलांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे. लघवी केल्यानंतर पुढून पाठपर्यंत सर्व भाग स्वच्छ करा, असे केल्यास गुद्द्वारातील जिवाणू मूत्रमार्गात पसरणे टाळता येईल. योनीमार्ग पुसताना पुढून पाठीमागे अशा पद्धतीनेच पुसावा असे केल्याने गुद्द्वारातील जिवाणू मूत्रमार्गात पसरले जात नाहीत. जेव्हा जेव्हा आपण लघवीला जाल तेव्हा ती जागा व्यवस्थित पाण्याने किंवा टिश्यूने पुढून मागच्या दिशेने नक्की वाईप करुन घ्यावी त्यामुळे बॅक्टेरियाचा फैलाव होणार नाही.

७. पोषक आहार घ्यावा :- फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेतल्यास शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते, मूत्रमार्गात आरोग्यदायक जिवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे मूत्रमार्गात संसर्ग होणे टाळता येऊ शकते. दैनंदिन आहारात तंतुमय अन्न पदार्थ जसे की केळी, मसूर, सोयाबीन, नट, ओट्स आणि इतर संपूर्ण धान्य  यांचा समावेश करावा. 

८. सैल कपडे वापरावे :- गुप्तांगांना व्यवस्थित हवा लागण्यासाठी तसेच मूत्रमार्ग कोरडा राहण्यासाठी शक्यतो आतले कपडे सैल असावेत. गरजेपेक्षा जास्त फिटिंचे किंवा घट्ट कपडे घालणे टाळावेत.

Web Title: How To Prevent A Urinary Tract Infection In Summer Season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.